शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात कारवाई: कृषी विभागाने केली औषधी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:01 IST

शहरातील उघडा महादेव परिसरातील एका दुकानातून शेतीशी निगडित १० प्रकारची औषधी व एक प्रकारचा खत १५ डिसेंबर रोजी कृषी विभागाने कारवाई करत जप्त केला असून या औषधींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील उघडा महादेव परिसरातील एका दुकानातून शेतीशी निगडित १० प्रकारची औषधी व एक प्रकारचा खत १५ डिसेंबर रोजी कृषी विभागाने कारवाई करत जप्त केला असून या औषधींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविली आहेत.मागील काही वर्षांपासून जिल्ह्यासह परजिल्ह्यात बनावट कीटकनाशक औषधी व खते तयार करुन शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी विक्री केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या खरीप हंगामाच्या तोंडावर परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात पोलीस प्रशासन व कृषी विभागाने बनावट औषधी व खते निर्माण करणाºया कारखान्यावर धाड टाकली होती. या कारखान्यातून २० प्रकारच्या औषधींचे नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगाशाळेकडे पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेले नमुने दोन्ही प्रयोगशाळेने बोगस असल्याचा अहवाल कृषी व पोलीस प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बोगस कंपन्यांकडून शेतकºयांची फसवणूक होत असल्याचेच समोर आले आहे.कृषी विभागाने १५ डिसेंबर रोजी उघडा महादेव परिसरातील एका दुकानाची तपासणी केली. या तपासणीत कृषी क्षेत्राशी संबंधित १० प्रकारची औषधी व एका प्रकारचा खत आढळून आला. विशेष म्हणजे कृषी निविष्ठा विक्री करण्याचा कोणताही परवाना या दुकानदाराकडे आढळून आला नाही. कृषी विभागाने जप्त केलेली औषधी व खताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. कृषी विभागाने केलेल्या कारवाईच्या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, सामाले, जिल्हा कृषी विकास अधिकारी ममदे, नागोरे, पं.स.चे शिसोदे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे ही कारवाई होऊन १५ दिवस उलटले आहेत. मात्र कृषी विभागाकडून या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आल्याने जिल्हाभरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेती