पार्किंगचा बोजवारा
परभणी : येथील बसस्थानकात पार्किंगसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे वाहनधारक व शहरातील नागरिक आपली वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे येथील बसस्थानकात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मांडाखळी रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील परभणी ते मांडाखळी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाल्याने वाहनधारकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्याचबरोबर धुळीचे प्रमाणही वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे जि. प. च्या बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
‘पिकांचे पंचनामे करा’
परभणी : जिल्ह्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस झाला. या पावसात रबी हंगामातील ज्वारी, हरभरा व गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाच्या वतीने अद्यापही या पिकांचे पंचनामे सुरू केलेेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यामंधून पंचनाम्याची मागणी होत आहे.