शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याततूर उत्पादकांचे दहा कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ हमीभाव तूर खरेदी केंद्रावर १५ मार्चपर्यंत १८ हजार ४४३ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप १ हजार १९२ तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची देयके अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे नाफेडकडे जिल्ह्यातील तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. परिणामी तूर उत्पादक अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात यावर्षी तूर मोठ्या प्रमाणात उत्पादित झाली आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. तुरीची आवक वाढल्याने खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भावाने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परभणी तालुक्यासाठी शहरातील एमआयडीसी परिसरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात नाफेडच्या वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार ४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. १५ मार्चपर्यंत या केंद्रावर १ हजार ९९४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यासाठी जिंतूर शहरात हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून या केंद्रावर आतापर्यंत १ हजार ५३५ शेतकºयांनी नोंदणी केली असून या केंद्रावर सर्वाधिक ५ हजार २७३ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. गंगाखेड केंद्रावर २ हजार ६५७ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत या केंद्रावर ३ हजार ४२० क्विंटल ५० किलोची खरेदी झाली आहे. पूर्णा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यातील ७६८ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून आतापर्यंत ३ हजार ४९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २ हजार ६२६ तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली असून १५ मार्चपर्यंत ४६७ क्विंटल तुरीची सर्वात कमी खरेदी झाली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक २ हजार ९२६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून आतापर्यंत ४ हजार २३९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.१५ मार्चपर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार तूर उत्पादकांपैकी १ हजार १९२ शेतकºयांची तूर केंद्राच्या वतीने खरेदी करण्यात आली आहे. या तूर उत्पादकांचे १० कोटी ५१ लाख ४ हजार ३५० रुपये थकले आहेत. त्यामुळे नाफेडकडे थकलेल्या तूर उत्पादकांची देयके तत्काळ देण्यात यावीत, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.शुक्रवारच्या पावसाचा बसला फटकाशुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात रिपरिप पाऊस होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी झाली नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांना शुक्रवारच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसाळ्यासाठी तीन महिन्याचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात जमिनीची मशागत करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी तूर उत्पादक शेतकºयांतून होत आहे.