शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

परभणीत मोफत शाळा प्रवेशासाठी आले ८०३ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:50 IST

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. 

परभणी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. 

राज्य शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांनाही मोफत शिक्षण मिळावे, यासाठी २५ टक्के कोट्यातून खाजगी शाळेमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यांपासूनच प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये १५२ शाळांची निवड २५ टक्के प्रवेशासाठी करण्यात आली आहे. १५२ शाळांमधूून १ हजार ५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. गतवर्षी अनेक पालकांना मोफत प्रवेशाविषयी वेळेवर माहिती मिळाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली.

१० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. आॅनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. २५ फेब्र्रुवारीपर्यंत जिल्हाभरातून ८०३ पालकांनी आपल्या पाल्यांचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकूण जागेच्या तुलनेमध्ये अर्जांची संख्या निम्मीच आहे. आणखी तीन दिवसांमध्ये किती अर्ज सादर होतील, याकडे लक्ष लागले आहे. 

कागदपत्रे: काढण्यासाठी धावपळआॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी पालकांची धावपळ होत आहे. शहरातील महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी दिसत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसामध्ये अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.