कोरोना संसर्ग लक्षणीयरीत्या घटला असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाला सोमवारी २ हजार ५३७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ६७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार १४७ अहवालांमध्ये ५४ आणि रॅपिड टेस्टच्या ३९० अहवालांमध्ये १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ५० हजार २५९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी ५७ हजार ८४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २४९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या १ हजार १६२ रुग्ण उपचार घेत आहेत.
१२२ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील १२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बाधित रुग्णांची घटलेली संख्या आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता कोरोनाचा आलेख घसरत आहे.