शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांवर ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:50 IST

येथील जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली असून, विविध प्रकारची ७० नियतकालिके, २५ वर्तमानपत्रे, सद्यस्थितीला या ग्रंथालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा ग्रंथालयात ६१ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध झाली असून, विविध प्रकारची ७० नियतकालिके, २५ वर्तमानपत्रे, सद्यस्थितीला या ग्रंथालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी दिली़येथील ग्रंथालय अधिकारी कार्यालयात नुकताच वाचन दिन कार्यक्रम पार पडला़ या प्रसंगी कथाकार राजेंद्र गहाळ, कवी उद्धव परभणीकर, चित्रपट दिग्दर्शक अशोक आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती़ कातकडे म्हणाले, केरळ राज्य शासनामार्फत १९६६ पासून १९ जून हा वाचन दिन म्हणून साजरा केला जात आहे़यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिनाचे उद्घाटन करताना वाचन अभिरुची वाढविण्यासाठी ३ कोटी लोकांपर्यंत वाचन उपक्रम पोहचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे़ याच अनुषंगाने परभणी शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी नवनवीन पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध केली आहेत़ शहरातील वाचकांसाठी सकाळी १०़३० ते ५़३० यावेळेत हे ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध आहे़ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कातकडे यांनी केले आहे़ कार्यक्रमात उद्धव परभणीकर यांनी कवितेचे सादरीकरण केले़ राजेंद्र गहाळ यांनी रांजनातील पाय ही विनोदी कथा सादर केली़प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ़ एस़आऱ रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ बी़एस़ देवणे यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंभोनाथ दुभोळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले़ कार्यक्रमास विद्यार्थी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीlibraryवाचनालय