शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ५ हजार मनुष्यबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

परभणी: कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरी भाग ...

परभणी: कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागात शासकीय आणि खासगी असे मिळून ५ हजार ५७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाने जिल्ह्यासह राज्यभरात धुमाकूळ घातला. आता जिल्ह्यातील संसर्ग कमी झाला असून कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, एएनएम, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे कर्मचारी अशा शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदवावा लागणार आहे. जिल्ह्यात ५ हजार ५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागेल, असा अंदाज असून त्याचा अहवालही वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परभणीचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागात १ हजार ५७, पाथरी ४१३, पूर्णा ६४८, सेलू ५१९, सोनपेठ ३०९, गंगाखेड ६६०, जिंतूर ६६२, मानवत ३५८ आणि पालम तालुक्यामध्ये ४७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. तशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

साडेसातशे कर्मचारी प्रशिक्षित

लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्यासाठी ५ हजार ५७ कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असली तरी प्रत्यक्षात त्यातील ७७८ कर्मचारीच लसीकरणासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. उर्वरित ४ हजार ३०९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगानेही जिल्हा परिषद प्रशासन तयारी करीत आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये गंगाखेड तालुक्यात ७५, जिंतूर १०१, मानवत १०३, पालम ३३, परभणी २८०, पाथरी २७, पूर्णा ५९, सेलू ४७ आणि सोनपेठ तालुक्यात ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लसीचे पहिले हक्कदार

लसीकरण मोहिमेसाठी ५ हजार ५७ कर्मचाऱ्यांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीकरण केले जाणार असून हे कर्मचारी लसीचे हक्कदार ठरणार आहेत.

असे लागणार कर्मचारी

वैद्यकीय अधिकारी ३२६, क्षेत्रीय कर्मचारी ४ हजार २३३, परिचारिका, पर्यवेक्षक १७३, वैद्यकीय कर्मचारी ६८, सहकारी कर्मचारी १०१, प्रशासकीय कर्मचारी १५६