शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:11 IST

संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  दोन दिवसांचा संप पुकारला आहे

परभणी : पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी शुक्रवारी संपावर गेल्याने जिल्ह्यात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प पडला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  दोन दिवसांचा संप पुकारला असून, या संपात परभणी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. दररोज बँकांमधून होणारे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. त्यात आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरन्स, खात्यामधून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे ही सर्व कामे दिवसभर ठप्प पडली. त्यामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी इंडिया बँकेच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महात्मा फुले यांचा पुतळा, जिल्हा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.  जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकंदर बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प पडल्याचे दिसून आले.

वीस बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचा सहभागपरभणी जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँका असून या बँकांच्या १६४ शाखा जिल्हाभरात विखुरलेल्या आहेत. या सर्व शाखांमधील सुमारे ३ हजार कर्मचारी आजच्या संपामध्ये सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. काय आहेत मागण्या पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, स्पेशल अलाऊन्स हा बेसिकमध्ये समाविष्ट करावा, एनपीएस योजना निकाली काढावी, पेन्शनमध्ये सुधारणा करा, अधिकार्‍यांसाठी कामाचे तास निश्चित करावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँकparabhaniपरभणीbusinessव्यवसाय