शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठा झाला बंद; थकबाकीमुळे महावितरणने वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 18:49 IST

गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे.

परभणी : गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

महावितरणचे तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. अनेक महिन्यांपासून वीज बिलाचा भरणा केला नसल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. त्यामुळे महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील उंडेगाव, धारासूर, महातपुरी, पिंपळदरी, खळी, सुप्पा, कुंडगीरवाडी, चिंचटाकळी, मरडसगाव, राणीसावरगाव, लिंबेवाडी, रुमणा जवळा, डोंगरगाव, डोंगरजवळा, डोंगर पिंपळा, गौळवाडी, दामपुरी आदी ४७ गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या गावातील पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत़ त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़

इतर ग्राहकांकडेही थकले वीज बिलतालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीकडे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच नगर परिषदेकडे पथदिव्याची तसेच, कृषी ग्राहक, औद्योगिक व घरगुती विजेचा वापर करणार्‍या ग्राहकांकडेही थकबाकी आहे. महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली  आहे. ही कारवाई उपविभागीय अभियंता साहेबराव सोनवणे, सहाय्यक अभियंता एन.सी. भसारकर, एस.यु.गिरी, पी.जी.ढोणे, कनिष्ठ अभियंता धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गाव पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांची वसुली वेळेवर होत नसल्याने वीज बिल भरणा करण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती राणीसावरगावचे सरपंच सोमनाथ कुदमुळे यांनी दिली. 

ग्रा.पं.च्या स्वखर्चातून वीज बिल भरणा करावाग्रामपंचायतस्तरावर पथदिवे, पाणीपुरवठा विभागाच्या वीज बिलाचा भरणा यापूर्वी वित्त आयोगाच्या निधीतून केला जात होता. मात्र यावर शासनाने निर्बंध लावून कृती आराड्यानुसार वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच ग्रा.पं.कडे वीज बिलाची रक्कम थकली आहे. ही रक्कम ग्रा.पं.च्या स्व उत्पन्नातून भरणा करावी, अशा सूचना ग्रामसेवकामार्फत दिल्या आहेत. - टी.बी. शिंदे, गटविकास अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी