शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय साहित्यापोटी दिले चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:12 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना वैयक्तीक शौचालय उभारणीचे साहित्य दिल्याच्या मोबदल्यात ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरून वितरित करण्यात आला असून, आणखी १ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपयांचा निधी संबंधितांना देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना वैयक्तीक शौचालय उभारणीचे साहित्य दिल्याच्या मोबदल्यात ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरून वितरित करण्यात आला असून, आणखी १ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपयांचा निधी संबंधितांना देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली़स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय उभारणीसाठी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदानाची रक्कम देण्याचे शासनाचे आदेश आहेत़ परभणी जिल्हा परिषदेने मात्र वेगळाच पायंडा पाडत प्रत्येक लाभार्थ्याला ५ हजार रुपये अगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेतला़ असे असले तरी सदरील रक्कम थेट लाभार्थ्यांना देण्याऐवजी ती खाजगी दुकानदारांना देवून संबंधित दुकानदारांकडून त्या रकमेचे साहित्य लाभार्थ्यांना देण्याची पद्धत पंचायत समितीस्तरावर पार पाडण्यात आली़ ही पद्धत नियमबाह्य असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ विशिष्ट खाजगी दुकानदारांनाच सदरील रक्कम का दिली गेली? संबंधित दुकानांची निवड कोणी केली? लाभार्थ्यांना थेट अनुदान देण्याबाबत शासनाचा एक निर्णय असताना पंचायत समितीस्तरावर हा निर्णय डावलून दुकानदारांना सदरील निधीचा धनादेश कसा काय दिला गेला? अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत़ या अनुषंगाने माहिती घेतली असता जिल्हा परिषदेने वैयक्तीक शौचालयाचे साहित्य लाभार्थ्यांना दिल्या प्रकरणी ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपये आतापर्यंत ७ पंचायत समित्यांच्या माध्यमातून दिले असल्याचे समोर आले आहे़ त्यामध्ये गंगाखेड पंचायत समितीने ५ हजार शौचालय साहित्यांची मागणी असताना १७२० लाभार्थ्यांचे साहित्य दिले असून, त्यापोटी ८५ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ जिंतूर पंचायत समितीने ६ हजार लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली होती़ त्यापैकी ८२२ लाभार्थ्यांना ४१ लाख १० हजार रुपये वितरित करण्यात आले़ मानवत पंचायत समितीने १३२५ लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ प्रत्यक्षात १७६० लाभार्र्थ्यांना ४४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ४३ लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़ पालम पंचायत समितीने ३ हजार ५०० लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ त्यापैकी २ हजार ९०० लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़ त्या बदल्यात १ कोटी ८ लाख ७० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ३६ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़परभणी पंचायत समितीने २ हजार लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ त्यापैकी ५६२ लाभार्थ्यांना १४ लाख ४५ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ आणखी १३ लाख ६५ हजार रुपयांचा निधी देणे बाकी आहे़ पाथरी पंचायत समितीने १२०० लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली होती़ त्यापैकी १४२५ लाभार्थ्यांपोटी ३९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ३१ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़ सोनपेठ पंचायत समितीने २१०० लाभार्थ्यांच्या निधीची मागणी केली़ त्यापैकी १६८१ लाभार्थ्यांना ८४ लाख ५ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.