शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात तीन गावांसाठी २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:49 IST

अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक बहुल भागाचा विकास व्हावा, तेथे मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येतो. या अंतर्गत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येतो़ परभणी तालुक्यातून पेगरगव्हाण, तरोडा येथे अल्पसंख्यांक वस्तीतील सिमेंट रस्ता कामासाठी निधीस मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता़ तसेच गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील नवी अबादी कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा़, असा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला होता़ या प्रस्तावांना शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली असून, पेगरगव्हाण व तरोडा येथील कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये तर राणीसावरगाव येथील कामासाठी ५ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे़ यामुळे विकास कामे मार्गी लागणार आहेत़बदल करण्याचे : अधिकार जिल्हाधिकाºयांनामंजूर करण्यात आलेल्या ठिकाणी इतर योजनेतून कामे करण्यात आलेली नाहीत, याची शहानिशा व खातरजमा जिल्हाधिकारी यांना करावी लागणार आहे़ तसेच या ठिकाणी इतर योजनेतून कामे मंजूर झाल्यास त्या बदल्यात इतर काम मंजूर निधीच्या मर्यादेत राहून बदल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत़ कामाच्या बदल्यात इतर काम करणे शक्य नसल्यास वितरित केलेला निधी शासनाला जमा करावा लागणार आहे़ तसेच या कामाचे अंदाजपत्रक सा़बां़ विभागाकडून घेऊन अटी व शर्तीनुसार कारवाईनंतर जिल्हा परिषदेकडे निधी सुपूर्द करण्यात येणार आहे़ मंजूर झालेला निधी त्याच कामासाठी ग्रामपंचायतींना वापरावा लागणार आहे़