शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही २३ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण ...

परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण करून घेतले नाही. कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांचा निष्काळजीपणा होत असल्याने हा आकडा वाढला आहे.

मागील महिनाभरापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. मात्र आतापर्यंत दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.

दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक

n कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरच लस परिणामकारक ठरणार आहे.

n शरीरात पूर्णत: ॲण्टीबॉडीज् वाढण्यासाठी दोन्ही डोस घ्यावे लागतील. तरच कोरोनापासून नागरिक सुरक्षित होऊ शकतात.

नेमकी अडचण काय?

जिल्ह्यात मागील महिन्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तारीख आल्यानंतरही अनेकांना लस घेता आली नाही. काही जण जास्तीत जास्त उशिरा लस घेतली तर चांगला परिणाम होतो, अशा समजुतीतून उशिरा लस घेत आहेत. तर कोरोना कमी झाल्याने नागरिकांची भीती कमीही कमी झाली आहे. त्याचाही परिणाम लसीकरणावर होत आहे.

चार दिवसांपूर्वीच जिल्ह्याला ९० हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीची कमतरता भासणार नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

- डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख