शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या २३ दिवसात १५ हजार रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने कोरोना संसर्ग वाढत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मागील २३ दिवसांमध्ये तब्बल १५ हजार ११६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. कारण नसतानाही रस्त्यांवरून फिरणार्‍या नागरिकांना कोणीही अडवत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन संचारबंदीचे आदेश काढून मोकळे झाले; परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र गप्प आहे. ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली, तो उद्देश अजूनही साध्य झालेला नाही. उलट संचारबंदी काळातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

संचारबंदी कळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, घराबाहेर का फिरत आहात, याची साधी विचारणाही होत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत आहेत. भाजी विक्रीची दुकाने बंद असतानाही मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांवर सर्रास भाजीविक्री होत आहे. त्यामुळे जी गर्दी व्हायची ती होतच आहे. केवळ आदेश काढून प्रशासन मोकळे झाले आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विपरित परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

३० मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४ हजार ८५७ एवढी होती; परंतु १ ते २३ एप्रिल या २३ दिवसांमध्ये १५ हजार ११६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २९ हजार ९७१वर पोहोचली. संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली; परंतु त्याउलट संचारबंदी काळातच रुग्णसंख्या वाढली आहे.

२३ दिवसांत ३३१ मृत्यू

संचारबंदी काळातील २३ दिवसांमध्ये ३३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा संसर्ग किती गंभीर रूप धारण करत आहे, हे लक्षात येते; परंतु नागरिक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. ३० मार्चपर्यंत जिल्ह्यात ४२३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. २३ एप्रिलपर्यंत ही संख्या ७५४वर पोहोचली आहे.