शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

साई मंदिराचा १९३ कोटी विकास आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

‌पाथरी येथील साईबाबांच्या जन्मभूमीचा विकास आराखडा मागील दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गतवर्षी विकास आराखड्यास चालना मिळाल्यानंतर कोरोनामुळे ...

‌पाथरी येथील साईबाबांच्या जन्मभूमीचा विकास आराखडा मागील दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गतवर्षी विकास आराखड्यास चालना मिळाल्यानंतर कोरोनामुळे या प्रक्रियेला ब्रेक बसला होता. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक घेण्यात आल्यानंतर २९ जानेवारी रोजी विकास आराखड्यातील संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आ. बाबाजाणी दुर्राणी यांच्यासोबत पाथरी येथील साई मंदिराला भेट देऊन आराखड्यातील प्रस्तावित कामांची पाहणी केली.

‌त्यानंतर साई संस्थानमध्ये प्रशासकीय अधिकारी साई संस्थान यांच्या विश्वस्तासोबत बैठक घेण्यात आली. बैठकीला आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी निकाळजे, तहसीलदार श्रीकांत निळे, संजय भुसारे, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे आदींची उपस्थिती होती.

‌ पहिल्या टप्प्यासाठी ७० कोटी प्रस्तावित

१९३ कोटींचा तयार करण्यात आलेल्या साईबाबा मंदिर आणि पाथरी विकास आराखड्यातील असणाऱ्या त्रुटी दुरूस्ती सुचविण्यात आल्या. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात ७० कोटी प्रस्तावित असून, त्यात मुख्यत्वे ७५० भक्त बसतील एवढे भक्त निवास आणि मंदिर परिसर असणाऱ्या जागेचे अधिग्रहण ही दोन कामे करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर २ डीपी रस्ते आणि इतर ६ अंतर्गत रस्ते ही कामे होणे आवश्यक असल्याची चर्चा झाली. ‌‌साईबाबा मंदिर विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्ती करून हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून १५ फेब्रुवारीपूर्वी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल, असे यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

विकास आराखड्याच्या कामाला आवश्यक असणारी अधिग्रहण करण्यासाठी जागा आणि रस्त्याच्या कामासाठी लागणारी जागा सर्वच व्यापारी आणि नागरिक यांची सहमती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत. लवकर निधी उपलब्ध झाल्यास तातडीने कामे मार्गी लागतील.

आ. बाबाजानी दुर्राणी