शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बीटीचे १० लाख पाकिटे

By admin | Updated: May 14, 2014 01:12 IST

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बीटी कापसाचे ९ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली

परभणी : जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बीटी कापसाचे ९ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३८ हजार २१० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी प्रस्तावित कापूस लागवडीचे क्षेत्र १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगामामध्ये बीटी-१ व बीटी-२ या कापसाच्या वाणाची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाने तब्बल ९ लाख ५० हजार बीटी कापसाचे पाकिटाची मागणी केली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये बीटी कापसाचे पाकेट उपलब्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून परभणी जिल्ह्यात बीटी-१ व बीटी- २ या कापसाचे पाकिटे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावर्षीही शेतकर्‍यांना कृषी दुकानांवर रांगा न लावता बीटी कापसाचे पाकिटे उपलब्ध होण्यासाठी नियोजन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी) खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टरवर होणार पेरा परभणी जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी प्रस्तावित ५ लाख ३८ हजार २१० हेक्टरवर पेरा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस लागवडीचे क्षेत्र म्हणजे १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. त्या खालोखाल सोयाबीन १ लाख ८० हजार हेक्टर, तूर ८५ हजार हेक्टर, उडीद ८ हजार हेक्टर, मूग ३५ हजार हेक्टर, ज्वारी ३० हजार हेक्टर, मका २ हजार हेक्टर, बाजरी २ हजार हेक्टर असे पेर्‍याचे क्षेत्र आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणार्‍यांवर होणार कारवाई खरीप हंगाम अवघ्या २० ते २५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कृषी विभागाने खरीप हंगामातील सर्व बियाणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे कृषी दुकानदार बियाणांची कृत्रिम टंचाई करतील, अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाचे जी.एस.हांडे यांनी दिली.