शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करावर एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 17:47 IST

वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. 

सोनपेठ ( परभणी ), दि. २६ : वाळू तस्करांवर सातत्याने कारवाई करुनही तस्करी कमी होत नसल्याने प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत तालुक्यात वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्या महिनाभरापासुन वाळू चोरी व तस्करी करणाऱ्याविरुध्द सोनपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. यातून मोठा दंड ही वसुल करण्यात आला. या कारवाईची तमा न बाळगता तस्करी जोमात होती. यामुळे प्रशासनाने तस्करांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोनपेठ तालुक्यात वाळू तस्करीचे अनेक गुन्हे असलेल्या अनंता कचाले (३४,  रा वैतागवाडी ता.सोनपेठ ) याच्या विरुध्द सोनपेठ येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे पाठवला.

या प्रस्तावास पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी मान्यता देऊन पुढील कारवाई साठी जिल्हाधिकारी पी शिवाशंकर यांच्याकडे पाठवला होता. वाळू तस्करांवर कठोर कारवाई करणाऱ्या पी. शिवशकर यांनी सदर प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन कचाले विरोधात एक वर्ष स्थानबध्दतेचा आदेश दिला. आदेश प्राप्त होताच सपोनि सदानंद येरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कचाले यास ताब्यात घेतले व एक वर्षाच्या स्थानबध्दतेसाठी औरंगाबाद येथील  कारागृहात त्याची रवानगी केली आहे. महसुल व  पोलिस प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.