शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप वर्तन असभ्य आहे का?- या 8 गोष्टी तपासून पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 14:57 IST

व्हॉट्सअ‍ॅप तर अनेकजण वापरतात, पण ते सभ्यपणे कसं वापरावं, हे माहिती आहे का?

ठळक मुद्देग्रुप्सवर आपण कसे व्यक्त होतो, कसे वागतो यावरुनही आपली बरीच परीक्षा केली जाते.

निशांत महाजन

अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सचे सेटिंग्ज गेल्या आठवडय़ात बदलले.अ‍ॅडमिन ओन्ली असं सेटिंग झाल्यानं बहुतांश ग्रुप्स एकदम मुकेच झाले. कुणीच काही टुकटुकत नसल्याने आणि आला फॉरवर्ड धाड पुढे कार्यक्रम बंद झाल्यानं व्हॉट्सअ‍ॅपवर शांतता पसरली आणि अनेकांच्या पहिल्यांदाच लक्षात आलं की ही शांतता चांगली आहे. आपण रोज अकारण, तासन्तास चर्चेत वेळ वाया घालवतो. सारखं सारखं फोन उचलून व्हॉट्सअ‍ॅप पाहतो, कोण ऑनलाइन आहे, कुणाचं स्टेटस काय, कुणी डीपी बदलला, कुणी फिल्टर बदलला या सार्‍याची आपल्याला चोख माहिती असते आणि त्याचा विचार करण्यातही बराच वेळ वाया जाताना दिसतो. या सार्‍यात आपण चुकून कधी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप वर्तनाचा विचारही करत नाही. आपल्या फोनची बॅटरी व्हॉट्सअ‍ॅप सतत वापरल्यानं जशी पटकन उतरते तशी आपल्या विचारांची बॅटरीही काही आपल्या या वर्तनावर प्रकाश पाडत नाही. या अ‍ॅडमिन ओन्ली नियमानं जरा उसंत मिळाली असेल तर आपल्या या व्हॉट्सपीय वर्तनावरही जरा नजर घालू आणि आपल्यासह अनेकजण काय काय चुका करतात हे जरा एकदा तपासून पाहू.आजकाल सगळीकडेच सॉफ्टस्किल्स, सॉफ्टपॉवर, सोशल इम्प्रेशन या शब्दांची चर्चा आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिगत म्हणजे नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी सोडूनही असलेले अनेक कार्यालयीन कामाचे ग्रुप्सही असतात. त्या ग्रुप्सवर आपण कसे व्यक्त होतो, कसे वागतो यावरुनही आपली बरीच परीक्षा केली जाते.त्यामुळे या काही गोष्टींवर नजर घाला आणि ठरवा आपले व्हॉट्सअ‍ॅप वर्तन सभ्य आहे का?

1. ग्रुप असला कुणीतरी दोघे किंवा तिघे एका विषयावर काहीतरी रंजक , माहितीपूर्ण चर्चा करत आहेत. तर नेमकं त्याचवेळी त्या चर्चेत जाऊन काहीतरी मस्करी करणं, भंपक प्रश्न विचारणं, विषय बदलायचा वारंवार प्रय} करणं किंवा तुम्ही कसे बोअर मारताय हे सांगणं हे काही बरे नाही. अनेकांच्या लक्षातही येत नाही की ते असं काही वागतात.2. ग्रुपमधल्या चर्चेत कुणी तुम्हाला काही विचारलं तर उत्तर द्या त्यांच्याकडे लक्ष द्या. तसं न करणं म्हणजे आपण प्रत्यक्ष आयुष्यात कुणीतरी आपल्याला काही विचारत असताना स्वतर्‍च बडबडत राहणं किंवा निघून जाणं असं होय. त्यामुळे निदान त्या व्यक्तीला ‘अ‍ॅकनॉलेज’ तरी करा.3. तुम्ही ग्रुप कसा सोडता यावरही बरंच काही सांगता येऊ शकतं, ते ही तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी. अनेकजण भांडण झाला, राग आला तरी ग्रुप सोडतात. काहीजण सगळा संताप व्यक्त करतात. काहीजण काहीही न बोलता सरळ लेफ्ट होतात. हे काही योग्य नाही. आपण एरव्हीही निरोप सन्मानानं घेतो, देतो. त्यामुळे ग्रुप सोडताना सभ्यपणे कारण सांगावं, रजा मागावी आणि मग ग्रुप सोडावा. तसं न करणं म्हणजे असभ्यच नव्हे तर उद्धट मानलं जातं.4. ग्रुपमध्ये विषय काहीही असो, व्यक्तिगत की राजकारण, खेळ की सिनेमा किंवा नुस्तं फॉरवर्ड तुम्ही प्रत्येक गोष्टीवर वाद घालता का? भांडायलाच लागता का? हमरीतुमरीवर येता का? माझाच मुद्दा खरा असा तुमचा सूर असतो का, तपासा.5. अनेकजण कायम वाद घालतात. त्यांना कुणाचीच मतं, म्हणणं मान्य नसतं. ते मान्य नसणंही ठीक मात्र अगदी समोरच्याला शिव्या घालणं, जाहीर अपमान करणं इथवर काहीजण जातात. आपल्या व्यक्तिमत्वाचं दर्शनच त्यामुळे होतं.6. ग्रुपमधले सगळेच लोक काही आपल्याला आवडत नाही. पण जे आवडत नाहीत त्यांना काही लोक सतत येताजाता टोमणे मारतात. डिवचून बोलतात. हे वागणं योग्य नाहीच.7. सतत इमोजींचा वापर, अतिरेक आणि वाट्टेल ते इमोजी टाकणं हे ही अशिष्ट मानलं जातं.8. सतत फॉरवर्ड पीजे पाठवणारे, सतत प्रत्येक गोष्टीवर हसणारे, काहीही झालं तरी मत मांडणारेही अनेकजण असतात. ते स्वतर्‍ची शोभा करुन घेतात. आणि मग त्यांच्या या वागण्याचे प्रत्यक्ष जगातही अनेकजण तिखटमीठ लावून वर्णन करतात.