शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मन दुखतंय तुमचं!

By admin | Updated: December 11, 2015 14:17 IST

चेहरा एकदम काळवंडतो, काळे पॅच दिसू लागतात, त्वचेवर डाग येतात, केस गळतात, कोंडा वाढतो केसातलाही नेमकी कशाची लक्षणं?- स्ट्रेस वाढल्याची! टेन्शन घेतल्याची!!

तुम्ही मान्य करा न करा, पण शरीर सांगतंच की, मनाचं काहीतरी बिघडलंय!
 
कधी कल्पना केलीय, तुमच्या आयुष्यातला स्ट्रेस, टेन्शन तुमच्या त्वचेवर रिफ्लेक्ट होत असेल? 
तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल आपलं टेन्शन वा कामाचा ताण दुस:यापासून लपवून ठेवायचा, त्यासाठी तुम्ही अगदी हसतखेळत वावरतही असाल, तुमच्याकडे पाहून कुणाला कळणारही नाही की तुम्हाला आतल्या आत काय छळतंय किंवा काय डाचतंय ते.
पण म्हणून काही ते तुमच्या अंगावर दिसणारच नाही असं होत नाही. तुम्ही कितीही नाकारलं तरी तुमच्या चेह:यावर किंवा त्वचेद्वारे त्या गोष्टी दिसतातच. जे तुम्ही बोलून सांगत नाही, तेही शरीर बाहेर टाकतंच. 
विश्वास नाही बसत ना, पण असं होतं खरं!
कधी तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी, कुटुंबातल्यांपैकी कोणी बोललंय, ‘का रे आज तुझा चेहरा इतका ओढलेला, ताणलेला का दिसतोय?’ किंवा एखाद्या स्पा, मसाज सेंटरमध्ये गेल्यावर हेड मसाज घेताना कोणी म्हटलंय की, ‘काही टेन्शन आहेत का, खूप विचार करता का, डोक्याची स्कीन खूपच टाइट झालीय.’ 
कुठलीही व्याधी जडली की तिचा परिणाम आधी त्वचेवर दिसून येतो. टेन्शन, स्ट्रेसचंदेखील तसंच आहे. अनेकदा तर आपण एखाद्या स्ट्रेसमधून जातोय, याची जाणीव आपल्यालाही नसते. पण अशावेळी आपली त्वचाच तशी सूचना देण्याचं काम करू लागते. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर केसातला डँड्रफ. 
केसात डँड्रफ होणं हेदेखील आपल्याला असणा:या टेन्शनचं, तणावाचं प्रतिबिंबच! 
स्ट्रेस म्हणजे नेमकं काय?
स्ट्रेस मॅनेजमेंट सोसायटीने स्ट्रेसची केलेली साधी सोपी व्याख्या अशी की, ‘जेव्हा एखाद्या व्यक्तीबाबत केलेल्या अपेक्षा तिची क्षमता आणि मर्यादा यांच्या पलीकडे जातात तेव्हा त्या व्यक्तीवर येणारा ताण म्हणजेच स्ट्रेस.’ एवढंच नाही, तर कोणत्याही बाह्य कारणांमुळे शरीर, मन, भावना, विचार यांच्यातील समतोल कमी होतो किंवा ढासळू लागतो तेव्हा स्ट्रेस वाढत जातो. अशा ताणाची कारणं असंख्य असू शकतात. अगदी नोकरीच्या ठिकाणचं काम, तिथले व्याप, व्यवसायातील नुकसानीपासून आणि कुटुंबातील भांडणं ते  प्रेमभंगार्पयत प्रत्येक गोष्ट स्ट्रेसला कारणीभूत ठरू शकते. 
पण या सर्वांचं मूळ अपेक्षांच्या ओङयाशी येऊन ठेपतं. आधुनिक जगात प्रत्येक गोष्ट जशी वाढत चालली आहे, तशाच अपेक्षादेखील कित्येक पटीने वाढत चालल्या आहेत. माणसानेही मशीनइतक्या वेगाने काम केलं पाहिजे असं वाटून घडय़ाळाच्या काटय़ावर धावत राहायचं, बॅटरी संपेपर्यंत काम करत राहायचं अशा अपेक्षा डिजिटल युगात सर्रास आपल्याही वाटय़ाला येऊ लागल्या आहेत. 
एवढंच कशाला, झपाटय़ाने बदलणा:या जगासोबत राहायचं म्हणून आपणही व्हॉट्सअॅपवर आलेला एकूणएक मेसेजही न वाचता सोडत नाही. एखादा मेसेज वाचला नाही तर आपलं मोठं नुकसान होईल, आपण काहीतरी हरवून बसू अशी भीतीच माणसाला छळत असते. मग सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट वाचण्यासाठी आपला आटापिटा चालतो. तिथं आपली मतं व्यक्त करून आपण किती अपडेट आहोत हे इतरांना दाखवण्याचा सोस वाढतो. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या फोन पाहायची सवय जडली आहे. तेथूनच दिवसाच्या ताणाला सुरु वात होते. यात वेळ खर्ची होतोच, पण इतक्या मोठय़ा प्रमाणात माहितीचा मारा झाला की, आपल्या मेंदूलाही अपचन होणं स्वाभाविकच आहे. असा अस्वस्थ  मेंदू आपल्याला तरी कशी विश्रंती घेऊ देईल बरं?
आधुनिक जगात स्ट्रेसचं आणखी एक कारण म्हणजे यशाचे बदललेले निकष. तुम्ही यशस्वी कधी ठरता जेव्हा तुम्ही लाखोंच्या घरात कमवता. कामाचं समाधान या शब्दाला काडीचीही किंमत नाही. उलट पगार, नफा, गाडय़ा, घरे, बँक बॅलन्स हेच जास्त महत्त्वाचं मानलं जाऊ लागलंय. साहजिकच जिथे या गोष्टी मिळवण्यासाठी आपली धडपड सुरू होते तिथूनच मग स्ट्रेसचाही प्रवास सुरू होतो.
अर्थात तरीही या सा:याकडे पाहायला आपल्याला वेळ नसतो.
पण आपलं शरीर बोलत असतं! आपल्याला सूचना देत असतं. ते प्रयत्न करत असतं, स्ट्रेस कमी करून जरा शांत राहण्याचा. मात्र त्यासाठी आपल्याला या सूचना कळायला तर हव्यात!
 
कदाचित तुमचा स्ट्रेस/टेन्शनही वाढलेलं असेल, जरा बघा.
1) केस खूप गळताहेत का?
2) केसांचा पोत बदलतोय का?
3) केसांत कोंडा वाढलाय? 
4) टाळूची त्वचा खूप घट्ट झालीये?
5) स्नायूंची लवचिकता कमी झालीये?
6) चेह:यावर पिंपल्स, काळी वतरुळे वाढताहेत?
7) चेह:यावर काळवंडल्याचे पॅच दिसताहेत?
8) काही त्वचारोग अचानक उद्भवले आहेत, तसे काही डाग त्वचेवर दिसताहेत?
 
 
- अर्चना राणो-बागवान