शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आपला कपिल शर्मा होतोय का?

By admin | Updated: April 5, 2017 18:01 IST

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?महिनाभरापूर्वी कुणी म्हटलं असतं की, तुझा कपिल शर्मा होतोय..तर आपण किती आनंदानं बेभान झालो असतो..कपिल शर्मा इतकी लोकप्रियता, त्याचं ग्लॅमर, त्याचा पैसा, त्याचं यश, बड्या वर्तुळातली त्याच्याच नावाचे चर्चे, त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आतुरलेले बडे सेलिब्रिटी..हे असं काही आपल्याला मिळालं तर कुणाला नको होतं?पण आज काय चित्र आहे?सोशल मीडीयात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजमध्ये यासंदर्भात अत्यंत उद्बोधक चर्चा पहायला मिळते आहे. ती रंजक तर आहेच, पण अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे..आजच्या इन्स्टण्ट जगात लोकप्रियता आणि लोकांचं वेडं प्रेम हे किती क्षणिक असतं याचं ते एक उदाहरणही आहे..म्हणूनच आपण जेव्हा आपलं करिअर करतो, यश मिळावं म्हणून मेहनत करतो तेव्हा अवतीभोवतीच्या या गोष्टीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं..म्हणूनच तर निनावी फॉरवर्ड होत असलेला एक इंग्रजी मेसेज ७ पॉईण्टसमध्ये कपिलच्या निमित्तानं काही लाईफस्किल्स, सॉफ्ट स्किल्स सांगताना दिसतो..त्याचा हा काहीसा भावानुवाद..१)उगवलेला सूर्य मावळतोच, त्यामुळे आपण खूप वेगानं उंच जातोय तर आपण खालीही येवू कधी ना कधी याचं भान ठेवायला हवं.२) सतत आपल्या टीम मेट्सचा, सहकाऱ्यांचा, सोबत्यांचा अपमान करुन तुम्ही यश नाही कमावू शकत आणि कमावलं तरी ते टिकवून नाही ठेवू शकत३) ज्या टीमबरोबर आपण यश कमावलं ती टीम मोडूतोडू नये.४)लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, हे कायम लक्षात ठेवावं.५) दारू आणि इगो हे दोन्हीही तब्येतीसाठी वाईटच, हे कायम लक्षात ठेवलेलं बरं..६) आपली रेप्युटेशन, प्रतिष्ठा आणि नाव कमावण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागते, पण गमवायला एक क्षण पुरेसा असतो.७) आणि तुम्ही तुमची प्रतिष्ठा गमावली तर त्यामागोमाग तुम्ही बाकी सारंच गमावून बसता?