शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

इगो हर्ट झालाय का? होऊ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:31 IST

इगोनं घात केला असं आपण किती सहज म्हणतो, पण हर्ट झालेला इगो अपयशाला कशी प्रतिक्रिया देतो यावर यश-अपयश ठरतं तेव्हा?

ठळक मुद्देआपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार? की आपल्या इगोला देणार आव्हान?

अनन्या भारद्वाज

तरुण मुलं एक प्रश्न हमखास विचारतात. खरंतर ‘कारण’ सांगतात. एक वाक्य ठरलेलं असतं. ‘माझी  लाइफस्टाईलच अशी आहे, घरची परिस्थितीच अशी आहे की, मी नाही काही करु शकत.!’ हे वाक्य खोटं असतं का? तर नाही. खोटं नसतंच. पण ते पूर्ण सत्यही नसतं. कारण आजवरचा जग बदलून टाकणारा इतिहास असं सांगतो की, ज्यांचे हाथ परिस्थितीनं बांधुन टाकलेले होते त्याच माणसांनी ते बंध झुगारुन देत नवं जग घडवलं. सगळं मस्त चाललेलं असताना लोक जग बदलायला जात नाहीत. त्यामुळे माझ्या घरची परिस्थितीच अशी की, त्यामुळं काही जमलं नाही करायला हे वाक्य म्हणजे जे आपल्याला जमलं नाही, त्यावर घातलेलं पांघरुण असतं. -जरा कटूच वाटेल हे वाचताना पण हे खरं आहे. बराक ओबामा काय आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला माणूस, त्यानं कसं बदलून टाकलं जग अवतीभोवतीचं? स्टिव्ह जॉब्ज, फार सुखी आयुष्य आलं होतं का त्याच्या वाटय़ाला, पण तो रडत बसला की पुढं सरकला? विल्यम्स भगिनी काय परिस्थितीतून जगज्जेत्या बनल्या?अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील, पण त्या यादीपेक्षा आपल्या अवतीभोवतीच्या जगातले आपलेच दोस्त पहा. त्यांचा आणि आपला प्रवास कदाचित एकाचवेळी सुरु झालेला असतो, काहीजण फक्त तक्रार करतात आणि अ‍ॅँग्री यंग मॅन मोडवर असतात. पण करत काहीच नाहीत. काहीजण त्यांच्यासारखेच चिडलेले असतात परिस्थितीवर मात्र तो आग, तो संताप योग्य जागी लावतात आणि त्या ऊर्जेवर पुढं निघतात.हा बदल नक्की कसला?मानसिकतेतला आणि कारणं न सांगता  झगडत राहण्याच्या वृत्तीचा.अलिकडेच प्रसिद्ध झालेला एक अभ्यासही हे सांगतोच. जर्मनीतल्या सारालॅण्ड विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यास जरा चक्रावणारे निष्कर्ष मांडतो आहे. इगो, माणसांचं वर्तन, त्यामुळे होणारं नुकसान किंवा त्यातून होणारे फायदे यासंदर्भातली मनाची आणि प्रसंगी शरीराचीही प्रतिक्रिया यासार्‍याचा तपशिलवार अभ्यास करण्यात आला. आधीच्या अभ्यासातले अनेक दावे या अभ्यासानं मोडीत काढलेले आहेत. म्हणजे आधी असं मानलं जात होतं की, इगोमुळे माणसांचं नुकसानच होतं. त्याच्या प्रतिक्रिया चुकतात आणि इतर लोकांशी त्याचे संबंध बिघडतात. हा अभ्यास म्हणतो योग्य ठिकाणी लावलेला इगो तात्पुरत्या अपयशाचं रुपांतर यशात करु शकतो. अर्थात याविषयी मानसअभ्यास तज्ज्ञांत   अनेक मतभेदही निर्माण झाले आहेत. मात्र त्यातला महत्वाचा भाग म्हणजे माणसाचा इगो आणि त्याची झुंजत प्रतिक्रिया देण्याची वृत्ती कशी बदलते, अपयशाला तो कशी प्रतिक्रिया देतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा वरकरणी जे अपयश वाटतं ते त्याक्षणी अपयश नसतंच, ते एक पाऊल मागे जाणं किंवा खरंतर पुढं न जाणं असतं.मात्र होतं काय, त्याचवेळी माणसाचा इगो आड येतो आणि त्या अपयशाला भयाण अपयश, हार समजण्याची चूक तो इगो करतो. काहीजण तिथंच शसत्र टाकून देतात आणि त्यांची प्रगती खुंटते.काहींचा इगो मात्र त्या अपयशानं भारी हर्ट होतो. ते अपयश अत्यंत पर्सनली घेतात आणि पेटून उठल्यासारखे परत कामाला लागतात. त्यातून होतं असं की, ते अपयश हीच त्यांची शक्ती बनतं. आपण महान माणसांचे अनेक अनुभव ऐकतो, प्रेरणादायी भाषणं ऐकतो ते सांगतात एका अपयशानंतर पालटलेली त्यांच्या आयुष्याची दिशा! त्यावेळी अनेकदा वाटतंही की, नशीबानं साथ केली म्हणून यांना जमलं हे करणं, नसतंच जमलं आणि पुढं सारं चुकतच गेलं असतं, तर त्या अपयशाचं एवढं कौतुक झालं असतं का?हा अलिकडेच प्रसिद्ध झालेला अभ्यास म्हणतो, कौतुक अपयशाचं नसतंच. त्या अपयशाला दिलेल्या प्रतिक्रियेचं असतं, त्यांच्या इगोचं नसतं, त्या इगोनं योग्यवेळी केलेल्या कृतीचं असतं. आणि माणसांच्या यशापयशात ही प्रतिक्रियाच बदल घडवते. आणि कदाचित म्हणूनच आपल्या अवतीभोवती गरीबीतून अत्यंत कष्टानं देदीप्यमान यश मिळवणारी माणसं दिसतात. एखादा धोनी मोठा स्टार झालेला दिसतो, आयपीएलसह अनेक खेळात अनेक खेळाडू मोठं यश संपादन करतात. मोठे उद्योगपती यशाच्या कहाण्या सांगतात आणि जगभरात नवीन राजकीय नेतृत्व करणारेही एकेकाळी आपल्या वंचित आयुष्याविषयी बोलतात.आपण कशाविषयी बोलणार?आपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार?की आपल्या इगोला देणार आव्हान?-उत्तर आपलं आपण द्यायचं आहे.