शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांच्या जिवावर सतत मजा मारणारं तारुण्य, बाहेरच्या जगात लढाईच का हरतं आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:32 IST

स्वतंत्र दिसणारी तरुण मुलं प्रत्यक्षात बांडगूळ होऊ लागली आहेत का?

ठळक मुद्देअवतीभोवती सध्या चित्र असं आहे की, अनेक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची एकतर जाणीव नाही आणि त्याची कदरही नाही.

विकास बांबल 

मी ‘वक्त’ नावाचा एक हिंदी चित्नपट बघितला होता, ज्यामध्ये अक्षय कुमारने मुलाची तर अमिताभ बच्चन यांनी वडिलांची भूमिका निभावली. फार देखणा आणि मार्मिक सिनेमा. तर त्या चित्नपटात वडील खूप कष्टानं श्रीमंत झालेले असतात. आपल्या मुलाला त्रास नको म्हणून ते मुलाचे एवढे लाड करतात की मुलाचे पाय दुखायला नकोत म्हणून प्रसंगी मुलाला पाठीवर घेऊन फिरतात. त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून स्वतर्‍च अभ्यास करून देतात. त्याचे सगळे लाड पुरवतात. त्याला त्नास होऊ नये, जास्त श्रम पडू नयेत म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतर्‍ करतात.मग मुलगा जसा जसा पुढे मोठा होतो तसा तो वडिलांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. वडीलसुद्धा आता उतरतीला आलेले असतात, त्यांच्याकडून आधी सारखं त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करणं जमत नाही.मुलगा खूपच परावलंबी झाला म्हणून वडिलांना राग येतोय. स्वतर्‍चे कामदेखील त्याला स्वतर्‍ला करता येत नाही, लगA करून येतो तर बायकोची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही. म्हणून वडील चिडतात. आपल्या पश्चात या मुलाचं कसं होणार, कसा हा स्वतर्‍च्या पायावर उभा राहणार असं वाटून छातीवर दगड ठेवून मुलाला घराबाहेर काढतात.त्यातून त्यांच्यात रागलोभ होतात. पण मुलगा स्वतर्‍च्या पायावर उभं राहायला शिकतो. म्हणायला हा सिनेमा असला तरी आपल्या अवतीभोवती हे दृश्य आपण कमीअधिक फरकाने पाहतोच आहोत. वयाची पंचविशी येते तरी मुलं आपल्या पालकांवरच अवलंबून दिसतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,‘मुलगा होतो ठोंब्या-भोपळ्या, अतिलाडाने निकामी !’तेच होतं आहे का अवतीभोवती? पालक मुलांचे इतके लाड करतात, त्यांना त्रास नको म्हणून स्वतर्‍ इतका त्रास करून घेतात, की मुलांना त्याची जाणीवही नसते. मुलांना सर्व आयतं देऊन त्यांची संघर्ष करण्याची शक्ती हिरावली जाते. कुंभार मातीच्या मडक्याला राग येतो म्हणून वरून चापट मारत नाही, किंवा एखादा शिल्पकार वेडा झाला म्हणून दगडाला हातोडय़ाने मारत नाही, तर कुंभाराला टिकाऊ मडके आणि शिल्पकाराला सुंदर शिल्प घडवायचे असते.अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती त्यामध्ये एका रस्त्यावरून एकाच कॉलनीमध्ये राहणारे श्रीमंत व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारा नोकर हे दोघेही घरी लावण्यासाठी रोपवाटिकेतून लहान रोप आणतात.श्रीमंत व्यापार्‍याच्या घरी उत्तम  निगराणी, सर्व मुबलक त्यामुळे बाल्कनीत ठेवलेल्या कुंडय़ामधील झाडांना वेळोवेळी मुबलक विकत आणलेले खत आणि पाणी दिले जात होते.ऊन आले की सावलीत ठेवणं, पाऊस आला की घरात ठेवणं अगदी वातानुकूलित वातावरणात ते झाड वाढत होते.याउलट त्या नोकरांच्या घरी खाली जमिनीत ते झाड लावलं, त्याला विकतचे खत आणणे परवडणारे नव्हते म्हणून शेणखत वापरून त्याची निगराणी ठेवली जात होती.ऊन, वारा, पाऊस यामध्ये ते झाड जगण्याचा प्रयत्न करत होते. एकाच दिवशी आणलेली झाडे; पण व्यापार्‍याचे झाड उत्तम बहरले, दिसायला सुंदर याउलट स्थिती नोकराच्या घरच्या झाडाची होती.वर्ष दोन वर्षे गेली,एके दिवशी सोसाटय़ाचा वारा आला, व्यापार्‍याच्या घरातील झाड कुंडीमधून पूर्णपणे उखडून वार्‍याबरोबर उडून गेले; पण नोकराकडील झाड तग धरून जमिनीत आपली पाळंमुळं रोवून घट्ट उभे होते.हाच फरक मुलांमध्ये असतो, असं म्हणतात. मातीत खेळलं नाही, उन्हात फिरलं नाही, पावसात भिजलं नाही, थंडीत त्रास झाला नाही, स्वतर्‍च्या कष्टानं काही कमावलं नाही तर शेवट काय होणार, एकतरी परावलंबी तरी होणार नाही तर बांडगूळ तरी ! आईवडिलांची साथ असणं वेगळं आणि त्यांच्याच जिवावर तरुणांनी मजा मारणं वेगळं.अवतीभोवती सध्या चित्र असं आहे की, अनेक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची एकतर जाणीव नाही आणि त्याची कदरही नाही. त्यामुळे बाहेरच्या जगात जेव्हा ते एकटय़ानं काही करू पाहतात, तेव्हा हरतात. किंवा लढण्यापूर्वीच शस्रं टाकून देतात.हे असं होणं किती वाईट आहे.