- निशांत महाजनमोठमोठ्या गॅजेट्सची खूप चर्चा असते. ते जवळ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण.पण अगदी साधे, पण अत्यंत महत्वाचे असे तीन गॅजेट्स आपल्या फार कामाचे आहेत. वाचताना ते फुटकळ वाटतीलही, पण त्यांच्या मदतीनं आपलं आयुष्य फार सोपं होऊ शकतं.१) ओटीजी पेनड्राईव्हआता पेनड्राईव्ह ही किती कामाची गोष्ट आहे, हे काय सांगायला हवं. पण फुटकल १ -२ जीबीचे नको चांगले १६ -१६ जीबींचे ओटीजी पेनड्राईव्ह आपल्याकडे हवेत. आपल्या फोनवरचा बॅकप या पेनड्राईव्हमध्ये सतत घेत राहिला तर आपला फोन रिकामा राहतो, आणि माहिती पेनड्राईव्हसह खिशात!२) वायरलेस माऊसअनेकजण असे असतात ज्यांचा हात माऊस नसला की मोडूनच जातो. माऊसशिवाय लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर कामच करता येत नाही. त्यांच्यासाठी आता मस्त स्लिम वायरलेस माऊस बाजारात मिळतात. वायरची अडगळ नाही, मस्त इटुकला माऊस सोबत घेऊन फिरायचं.३) लॅपटॉप स्टॅण्डखरंतर या गोष्टीला गॅजेट म्हणू नये. पण ठीके. हल्ली सर्वत्र हे छोटे लॅपटॉप स्टॅण्ड मिळतात. हलके, घडक्ष घालून कुठंही नेता येतील असे.ते सोबत हवे, म्हणजे लॅपटॉपच्या हिटिंगची आणि आपल्या पाठीची कुरकुर सुरू होत नाही.
3 गॅजेट्स आपल्याकडे हवेतच!
By admin | Updated: June 21, 2016 08:42 IST