शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

तू असशील शाहरूख, लेकिन मै भी तो हूं..

By admin | Updated: October 17, 2014 09:04 IST

माझा मुलगा आर्यन. ‘स्टार-किड’ असण्याचं प्रेशर-बिशर सोडाच, आपला बाप शाहरूख खान नावाचा एक सुपरस्टार आहे, याचं त्याला काही म्हणजे काहीही वाटत नाही. तो त्याच्या जगात मस्त असतो.

- शाहरूख खानहल्ली सगळ्यांना वाटतं, तसंच माझं मत होतं आधी.- की हल्लीची टीनएजर मुलं फार बेपर्वा आणि उद्धट असतात.माझ्या घरात तेच बघत होतो मी. माझा मुलगा आर्यन. ‘स्टार-किड’ असण्याचं प्रेशर-बिशर सोडाच, आपला बाप शाहरूख खान नावाचा एक सुपरस्टार आहे, याचं त्याला काही म्हणजे काहीही वाटत नाही. तो त्याच्या जगात मस्त असतो. अभ्यास, मित्र,मजा आणि करिअर.  इतकंच.. बाकी घाणेरड्या चपला घालेल, मळके टी शर्ट आणि एवढुशी चड्डी घालून घरात फिरेल.त्याचे मित्र घरी येतात, तेही तसेच असतात. त्याच्यासारखेच गचाळ-ढगळे कपडे घालून वावरतात. त्यांनी तरी मला भाव द्यावा..? पण शून्य! मी दिसलो की हसून हॅलो अंकल म्हणतील, माझ्याबरोबर खातील-पितील-मजा करतील, पण तेवढंच!आर्यन त्यांचा मित्र आणि शाहरूख खान आर्यनचा बाप! बस, एवढाच माझा संदर्भ असतो त्यांच्यासाठी.माझा बंगला, त्यातलं मी कमावलेलं ऐश्‍वर्य, माझं स्टारडम यातल्या कशाचंही त्यांच्यावर साधं इम्प्रेशनसुद्धा पडत नाही. -वैसे अपने बच्चे तमीजवाले हैं, मला ‘अंकल’ तरी म्हणतात!तिकडे युरोप-अमेरिकेत भेटणारे टीनेजर इंडियन्स तर नुस्तं ‘हाय शारूक’ म्हणून पुन्हा आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर डोळे खुपसतात. आधी मला वाटे, एवढा कसला माज या एवढुशा मुलांना?- आता कळायला लागलंय, की हा उद्धटपणा नाही. वरवर उद्धट वाटणारा अतिशय ठाम, पक्का आणि शांत असा आत्मविश्‍वास आहे हा!म्हणजे, तू असशील शाहरूख खान, लेकिन मै भी तो हूं!आपण शाहरूख खानचा मुलगा आहोत याचा माझ्या मुलाला अभिमान जरूर आहे, पण त्यामुळे काहीतरी  ‘स्पेशल’ वाटून घेणं त्याला जरूरीचं वाटत नसावं. त्याची म्हणून जी काही आयडेण्टिटी आहे, ती तो माझ्यासाठी म्हणून अजिबात बदलत नाही. माझ्याकडे कुणी पाहुणे आले, ‘हाय हॅलो’ करायला चल म्हटलं तर विचारतो, हेच कपडे चालतील, की बदलू? तुला एम्बॅरसिंग होणार असेल तर बदलतो..मी म्हणतो कशाला, चल तसाच! आपला बाप अँक्टर आहे म्हणून आपणही अँक्टरच झालं पाहिजे असलं काही त्याच्या डोक्यात नाही. आवडतील त्या विषयात आधी शिकू, म्हणजे मग त्यातून आपल्याला आपली दिशा सापडेल, हे त्याला माहिती आहे.आर्यन आणि सुहाना दोघेही माझ्याबरोबर सिनेमा-बिनेमाला, डिनरला जायला तयार नसतात. मला सरळ सांगतात, तू नंतर ये आणि आलास तरी तुझं हुडी तोंडावर ओढून घे आत येताना.. पीपल विल ट्रबल अस!विचार करायला लागलो, तसं जाणवलं, ही नव्या भारतात जन्माला आलेली नवी कॉन्फिडंट पिढी आहे. त्यांचा आत्मविश्‍वासच वेगळा आहे. दुसर्‍या कुणाचं यश, पैसा, प्रसिद्धी याचा त्यांच्यावर फार प्रभाव पडत नाही. ती पोझिशनला घाबरून माना तुकवत नाहीत की लाळ घोटत नाहीत. ही कार्टी नालायक आहेत, कामचुकार, ऐदी आहेत, असा आरोप करणं सोपं आहे.. पण तशी नाहीत ही मुलं.माझ्या वडिलांची पिढी वाट बघण्याला त्रासलेली, संतापाने धुमसणारी होती. माझ्या पिढीला घाई होती सगळ्याची. माझ्या मुलाच्या पिढीकडे कुणालाही हेवा वाटावा असा आत्मविश्‍वास आहे. माझ्या पिढीतली माणसं कायम स्वत:चं घर, परमनण्ट नोकरी, दारापुढे र्मसिडिज या साच्यातल्या स्वप्नांमागे धावली.आता ही मुलं अशी वेड्यासारखी धावत नाही सुटत. त्यांना वाटतं मिळेल नोकरी, घेऊ गाडी, होईल घर.. आणि नाही झालं तर भाड्याच्या घरात राहू! स्मार्ट आहेत ही मुलं, पण ते कबूल करायची तयारी नसते त्यांच्या आईबापांची.त्यांना वाटतं, वाया गेली कार्टी. सारखी टीव्हीसमोर पडीक असतात. अरे यार, आप बच्चे थे, तो आपने क्या किया? आठवड्यातून एकदा रविवारी संध्याकाळी ब्लॅक अँण्ड व्हाईट टीव्हीवर पिर यायचा, चित्रहार लागायचा, आधा है चंद्रमा रात आधी..डोळे ताणून ताणून, शेजारपाजारी जाऊन आम्ही ते कार्यक्रम पहायचो. त्यांची जेवायची वेळ झाली की, ते हाकलून द्यायचे. थोड्या वेळानं परत जाऊन बसायचो. दुसरा चॉईस तरी काय होता? चॉईस असता तर मीही नसताच पाहिला चित्रहार !  काहीतरी जास्त चांगलं पाहिलं असतं.हे ‘चॉईसवालं’ जग आपण मुलांना दिलंय तर ते पर्याय निवडणारच!शाहरूख खान या माणसाबद्दल/या माणसातलं लोकांना काय आवडतं?- हे, की मी हसरा आहे, गमतीजमती करतो, चार्मिंग.. स्वीट.. हॅपी गो लकी आहे. कसलीतरी पॉझिटिव्ह एनर्जी देतो.मला बघायला पैसे मोजून येणारे लोक मनात म्हणत असतात, ये लडका ठीकठाक है.. मजा आता है यार इसके साथ!- ही ‘मजा’ संपेल, त्या दिवशी शाहरूख खान या नावातली जादू ओसरेल, हे मला माहिती आहे. जो मनको अच्छा लगा, वही किया.. हे म्हटलं तर माझ्या यशाचं रहस्य! मार्केटमध्ये काय चालतं, समीक्षक काय म्हणतात यावर मी माझे निर्णय, चॉईस ठरवत नाही. चलो, एक दोसौ करोडवाली फिल्म करले, एक सिरीयस मेसेजवाली करले, एक बेस्ट अँक्टरवाली, एक नॅशनल अवार्डवाली बना लेते हैं, एक कॉमेडी करते हैं.. असली गणितं मला येत नाहीत. माझा माझ्यासाठी एक साधा नियम आहे, मी आजवर जे केलं नाही ते मी करीन. मागच्या वेळी केलं त्यापेक्षा बेटर करीन. माझा मुलगा आर्यन एकदा मला म्हणाला, पापा, अगर उसान बोल्टके साथ कम्पीट करना है, तो यू हॅव टू रन लाईक हिम. उससे बेटर नही दौडोगे, तो उसे कैसे हराओगे? मी म्हटलं, चूक. पहले तुमको खुदसे बेटर दौडना पडेगा!आज उसान दहा सेकंदांत शंभर मीटर धावतो, म्हणून तुम्ही दहा सेकंदांत धावायला जाल, तर तो उद्या आठ सेकंदांत धावायला लागेल.. मग? परवा कदाचित त्याचं टायमिंग बारा सेकंदांवर घसरेल. तो आठ सेकंदात धावला, तर तुमको लगेगा की तुम स्लो हो. त्याने बारा सेकंद घेतले, तर तुमको लगेगा की तुम फास्ट हो!- उसान बोल्टला तुम्ही ओळखत नाही. तो उद्या काय करील, हे तुमच्या हातात नाही. त्यामुळे आपण आपलं टायमिंग सुधारण्यासाठी झगडावं.स्वत:ला हरवणारा माणूसच उसान बोल्टला हरवण्याची हिंमत करू शकतो. मी कधीही माझं आयुष्य असं ‘दुसरा काय करतो’ याच्यावर बेतलं नाही. लोकांच्या मागे झोळी घेऊन भिकार्‍यासारखा का फिरू मी?अलीकडेच मला माझ्या स्टाफमधल्या कुणीतरी म्हटलं, सर, आजकल सब हिरो मसलवसल दिखाते हैं, आपकोभी करना चाहिये.मी म्हटलं, आप दुसरा हिरो मत दिखाओ, मसलवाला शॉट दिखा दो मेरे को.. मै जान ले डालूंगा बॉडीकी!कुणाला पटो अगर न पटो, ‘पैसा’ हे या दुनियेतलं विनिमयाचं एकमेव साधन आहे ना? बार्टर तो नही कर सकते, की भय्या, मेरी एक कहानी सुनो और मुझे खाना दो..?- उपाशी पोटी कलानिर्मितीच्या गप्पा बकवास असतात. पोट नीट भरलेलं असेल, तर आणि तरच डोकं नीट काम करू शकतं.ते मला विचारतात,तुम वो ‘स्वदेस’ जैसी मेसेजवाली फिल्में क्यूं नही करते?मी म्हणतो, ते तुम्ही कोण ठरवणार? मला काय करायचंय ते मी ठरवीन. अगर इतनीभी चॉईस नही होगी, तो लानत है मेरे स्टारडमपर!पुढच्या किमान 400 पिढय़ा आरामात जगतील एवढा पैसा नक्कीच आहे माझ्याकडे!- आणि आता मला सापडलेली श्रीमंतीची व्याख्या सांगतो.- एक शर्ट घ्यायचा असताना आवडलेले दोन विकत घेणं ज्याला परवडू शकतं, तो श्रीमंत!आपल्याजवळ असणार्‍या पैशातून विकत घेता येणारा मॅक्झिमम आनंद हा एवढाच असतो! अनेक धडपडणारी तरुण पोरं हल्ली मला मोठय़ा श्रद्धेने, आदराने आणि अपेक्षेने विचारतात,‘सर, अँक्टर बनना है, कुछ कर दिखाना है, सर.. क्या करूं?’या प्रश्नाला कोणतेही आईवडील देतात तसं एकच बोअरिंग उत्तर आहे माझ्याकडे.-‘काम करो यार, और क्या करोगे?’