शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Yes U R addict

By admin | Updated: June 19, 2014 21:54 IST

काय म्हणता, आपल्याला नाही ‘तसलं’ काही अँडिक्शन? चेक धिस. मोबाइलच्या व्यसनानं तुम्हाला पुरतं गिळलंय, हे सांगणारी २0 लक्षणं

काय म्हणता, आपल्याला नाही ‘तसलं’ काही अँडिक्शन? चेक धिस. मोबाइलच्या व्यसनानं तुम्हाला पुरतं गिळलंय, हे सांगणारी २0 लक्षणं
---------
‘कसला रे तो पडीक असतो तासन्तास फेसबुकवर. आणि किती बोअर मारतो तेच ते पीजे फॉरवर्ड करत व्हॉट्स अँपवर. टेकबेवडा झालाय त्याचा नुसता.’
-असं आपण दुसर्‍याविषयी सहज बोलतो. तो किंवा ती जरा जास्तच ऑनलाइन असते, 
फार वेळ वाया घालवते असं आपलं ठाम मतच असतं.
पण ‘आपलं’ काय?
आपणही ‘त्यातलेच’, ते आपल्या कसं लक्षात येत नाही. कसं येईल? आपल्याला काही ‘नेट किंवा टेक अँडिक्शन’ नावाचा आजार होऊ शकतो हेच आपल्याला मान्य नसतं, आपलं सगळं ‘कण्ट्रोल’मध्येच आहे असं आपलं ठाम मत. पण ते खरंच तसं आहे का.? कसं तपासणार?
स्वत:च स्वत:ची एक टेस्ट करून पाहिली तर.?  त्यासाठीच ही एक टेस्ट. 
--------------------------
> तुमचा फोन सापडत नसेल किंवा कुठं  ठेवला हेच आठवत नसेल तर तुम्ही पॅनिक होता.सैरभैर व्हायला लागता.?
 
मग एकदम तुम्हाला आठवतं की आपण तर आज फोन घरीच विसरलो, जाम म्हणजे जाम अस्वस्थ व्हायला होतं, एकदम चिडचिडच होते तुमची.
 
> तुम्ही तुमचा फोन उशाजवळच्या एखाद्या कॉर्नरवर ठेवून झोपता, का थेट उशाशीच, उशीखाली किंवा डोक्याजवळच ठेवता.
 
> ‘काम असतं, अर्जण्ट फोनबिन येतात ऑफिसमधून’ असं ढुसकं कारण सांगत तुम्ही सतत फोन स्वत:जवळ बाळगता, अगदी संडासातही फोन घेऊनच जाता.
 
> तुमच्या फोनवर डाऊनलोड केलेल्या ‘अँप्स’ची तुम्ही जिवापाड काळजी घेता, सरकारी तिजोरी सांभाळाल तेवढे सावध असता.
 
> सकाळी उठल्यापासून तुम्ही कुणाला  तरी एसएमएस पाठवत असता किंवा सतत एखादं अँप्स टाकत कुणाशी तरी बिनकामाचं बोलत असता.
 
> आठवड्यातून एकदा तरी तुमचा फोन सापडत नाहीच, तुम्ही शोधता आणि मग 
तो तुमच्या हातात किंवा पॅण्टच्या खिशातच सापडतो.
 
> फोन स्विच्ड ऑफ करा, असं तुम्हाला कुणी सांगितलं की  तुमचा संताप होतो.
 
> बंद फोन चालू केल्यावर तुम्हाला भयंकर आनंद होतो, ढीगभर नोटिफिकेशन्स, 
मिसकॉल, अँप्स पाहून जाम गुदगुल्या होतात.
 
> चालता चालता एसएमएस करतो मी, अवतीभोवतीचे लोक काय बोलतात याकडे मेसेज टाईप करतानाही माझं लक्ष असतं असं तुम्ही सांगता, पण ते खरं नाही, नसतंच हे तुम्हाला 
पक्कं ठाऊक असतं.
 
> कित्येक महिने झाले तुम्ही तुमचा फोन ‘स्विच्ड ऑफ’ केलेला नाही, फोन बंद करा असा आदेश आला की तुम्ही फोन फक्त सायलेण्टवर टाकता, बंद करतच नाही.
 
> करावा फोन एकदाचा बंद, बसावं जरा शांत असं तुम्हाला फार वाटतं, सिनेमाला, गाण्याच्या कार्यक्रमाला जाता तेव्हा तर फारच वाटतं पण नाहीच करत तुम्ही फोन बंद.
 
> त्रास होता तुम्हाला तुमच्याच या मूर्खपणाचा, पण तरीही.
 
> तुम्ही फोन सायलेण्टवर टाकता, तीन तास सिनेमा पाहता, मित्रांबरोबर जेवायला जाता, गप्पा मारतात  आणि मग फोन उचलून पाहता तर एकही मिसकॉल, एकही नवा मेसेज नाही. त्रास होतो तुम्हाला. कसंसंच वाटतं. एकदम लेफ्ट आऊट फिलिंग येतं.
 
> फोन बिघडला की तुमचं डोकंच उठतं, दोन तीन दिवस फोन रिपेअरला टाकायचा या भावनेनंच तुम्ही फार पॅनिक होता, टेम्पररी दुसरा फोन शोधता, भयानक म्हणजे भयानकच वाटतं तुम्हाला.
 
> नेहमीच्या कट्टय़ावर मित्र उशिरा आले, तुम्ही एकटेच वाट पाहत बसला तरी आता तुमची पूर्वीसारखी चिडचिड नाही होत, तुम्ही तुमच्या व्हॉट्स अँपवर कनेक्टेडच असता. मित्र आल्यावर तुमचं इंटरेस्टिंग बोलणं संपल्याचा तुम्हाला त्रासही होतो अनेकदा.
 
> शंभर वेळा तुम्ही व्हॉट्स अँप उघडता, बंद करता. जुनी पुरानी चॅट वाचता, बंद करता.
 
> ते वाचताना आपण या वाक्याऐवजी हे वाक्य टाकायला हवं होतं, असं तुम्हाला सतत वाटतं.
 
>समोर मी बसलीये आणि तू मोबाइलवर गेम खेळतोय, व्हॉट्स अँपवर बोलतोय, मग मला 
कशाला भेटतोस असं म्हणत तुमची गर्लफ्रेण्ड तुमच्याशी सतत भांडते.
 
> या लक्षणांपैकी एक जरी लक्षण तुमच्या वागण्यात आढळून आलं तरी तुम्ही अँडिक्ट 
होण्याच्या मार्गावर आहात असं खुशाल समजा.