शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

World Vegan Day 2019 - विराट कोहलीसारखं वेगन व्हायचं ठरवलंय तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 13:13 IST

विराट कोहलीनं नुकतंच सांगितलं की, मी वेगन झाल्यानं माझं वर्ष फार आनंदात गेलं ! अ‍ॅथलिट, खेळाडू, अभिनेते यासह तरुण मुलांचा ‘वेगन’ होण्याचा ट्रेण्ड जगभर वाढतोय, तो का?

ठळक मुद्दे1 नोव्हेंबर- वेगन दिनानिमित्त बदलत्या आहाराची ही चर्चा.

-चिन्मय लेले

विराट कोहली गेल्या आठवडय़ात काय म्हणाला ते वाचलं असेलच तुम्ही.त्याचं आणि अनुष्का शर्माचं ट्विट. त्याच्यावरून बरीच चर्चा  झाली.आणि पुन्हा एकदा खेळाडू, व्यायाम आणि प्रोटीन डाएट हा विषय चर्चेला आला.त्या चर्चेचं अजून एक निमित्त म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी जगभर साजरा होणारा वेगन डे.हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की, विराट कोहली गेले वर्षभर पूर्णतर्‍ शाकाहारी जेवतो. त्यातही तो आता ‘वेगन’ झाला आणि म्हणजे दूध-पनीर असे प्राणीजन्य प्रोटीन पदार्थही तो खात नाही. एकतर पंजाबी त्यात बटर चिकन नाही आणि आता पनीरही खात नाही यावरून मोठी चर्चा झाली. मात्र विराट कोहली हे जाहीरपणे सांगतोय की, व्यायाम करण्याचा आणि शाकाहारी असण्याचा काही संबंध नाही. त्याच्याइतका फीट अ‍ॅथलिट असं म्हणतोय म्हटल्यावर त्याचीही चर्चा झालीच. मात्र तो आणि अनुष्का आपल्या वेगन असण्यावर मोकळेपणानं बोलत राहिले.अलीकडेच त्यानं एक ट्विट केलं, ज्यात तो असं म्हणतो की, मी नेटफ्लिक्सवर ‘द गेम चेजर’ ही डॉक्युमेण्टरी पाहिली आणि खरोखर इम्प्रेस झालो. जगभरात लोक डाएटचा कसा विचार करतात हे कळलं आणि मलाही माझ्या शाकाहारी असण्याचा अभिमान वाटला, गेलं वर्षभर मला फार छान वाटतं आहे.विराटनं असं म्हणण्याचा अवकाश, फुटबॉल संघाचा कप्तान सुनील छेत्री यानंही जाहीर केलं की, मी माझ्या खाण्यापिण्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आता मी पूर्णतर्‍ वेगन झालो आहे. लिस्बनमध्ये राहूनही मी पूर्ण शाकाहार घेतोय आणि माझ्या पचनसंस्थेकडे बारकाईनं पाहतोय तर मला त्याचा फार लाभ होताना दिसतो आहे.ही झाली दोन उदाहरणं आपल्याकडची. ज्यांनी गेल्या आठवडय़ातच आपल्या ‘वेगन’ असण्याविषयी मोकळेपणानं काही गोष्टी सांगितल्या.मात्र आता जगभरात विशेषतर्‍ तरुण मुलांमध्ये या वेगन डाएटची मोठी क्रेझ आहे. आणि जो तो आपण वेगन डाएटवर आहोत असं सोशल मीडियातही जाहीरपणे सांगतो आहे. त्याचा परिणाम असा झाला की जगभरातली आकडेवारी उपलब्ध नसली तरी अमेरिकेत तरुण मुलांचं वेगन होण्याचं प्रमाण गेल्या तीन वर्षात 600 टक्के वाढलं आहे असं आकडेवारी सांगते. द इकॉनॉमिस्ट या मासिकात जॉन पार्कर यांनी लिहिलेल्या लेखानुसार 2019 हे वर्ष वेगन इयर म्हणून त्यांनी नोंदवलं आहे. कारण 25 ते 24 या वयोगटातील सर्वाधिक तरुणी-तरुणी याच वर्षी वेगन झाले असं त्यांचं म्हणणं आहे.आपल्याकडेही सोशल मीडियातले अनेक डाएट ग्रुप पाहिलं तर वेगन होणार्‍यांचं मोठं प्रमाण दिसतं  आहे.अर्थात या ट्रेण्डविषयी अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. त्याविषयी वाद आहेत. आक्षेप आहेत. मात्र तरीही नव्या जगात आहार स्वातंत्र्य मान्य करताना वेगन होऊ पाहणार्‍यांचंही निवड स्वातंत्र्य जगभर मान्य केलं जात आहे.आणि त्यामुळेच तरुण जगात वेगन होण्याची एक नवीन लाटही दिसते आहे.

**************

वेगन डाएट फॅड की उत्तम आहार?

या प्रश्नाचं एकच एक उत्तर देता येणार नाही. कारण वेगन डाएट करण्यात काही गैर नाही. कुणी मांसाहार करत नाही, कुणी फक्त प्रोटीन खाऊन जगतं, कुणी कार्ब अजिबातच खात कुणी दुग्धजन्य पदार्थ खात नाही हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय म्हणून हल्ली सोडूनही देता येऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाचं आहार स्वातंत्र्य मान्य केलं तर.मात्र वेगन होणं हे काही सगळ्यानांच परवडेल असं नाही, हापण एक मुद्दा आहे. कारण मग प्रोटीन शरीराला कुठून मिळणार?उसळी हाच एक त्यातल्या त्यात सोपा पर्याय उरतो.मात्र काही वेगन डाएट करणारे बदामाचं दूध पितात, काही फक्त सुकामेवा भरपूर खातात, काहीजण सोया मिल्क पितात त्यामुळे हे डाएट करताना आपली आर्थिक स्थितीपण बघा असं आम्ही सांगतो.बाकी भरपूर भाज्या, भात, भाकरी, उसळी खाऊन कुणाला पूर्णतर्‍ वेगन डाएट करायचं असेल तर तीन वेळा पोटभर जेवूनही ते करता येऊ शकतं.फक्त कुठलीही गोष्ट आपली शारीरिक ठेवण, व्यायाम आणि पचनशक्ती यांचा विचार करून, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच करावी, असं मात्र आवजरून सांगायला हवं.

- अक्षिता पटवर्धन(आहार तज्ज्ञ)