- अभिजित पानसे
‘‘कोण जिंकतंय?’’‘‘मी फक्त भारत पाकिस्तानच्या मॅचेस बघते!’’‘‘सचिन रिटायर झाला आणि मी क्रि केट बघणं सोडलं!’‘‘धोनी कित्ती हँडसम आणि क्युट आहे!’’ ‘‘मी फक्त विराट आणि धोनीसाठी मॅच बघते!’’- अशा प्रतिक्रिया बहुतेकवेळी तरुण मुलींकडून अनेकदा ऐकायला मिळतात. अर्थात अपवाद आहेतच, ज्यांना उत्तम क्रिकेट कळतं आणि खेळात रसही आहे.मात्र क्रिकेटमध्येच फक्त रस आहे असं अनेकदा नसतंही. त्यात सर्वसामान्य कुटुंबात एरव्ही मुलांनाच खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळतं तिथं मुलींचा ओढा क्रिकेटकडे कमीच असतो.मुली व्हॉलीबॉल, रनिंग, जिम्नॅस्टिक्स यांत शाळा -कॉलेजपासून भाग घेतात; पण क्रिकेटमध्ये सर्वसामान्यपणो कमीच. क्रिकेट खेळणा:या मुलग्यांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच म्हणायची.त्यातही अनेकजणी खेळल्या. भारतासह जगभर महिला क्रिकेटने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली.पण एकूणच महिला क्रिकेटला कित्येक वर्षे ‘ग्लॅमर’ नव्हतं. शिवाय पुरु ष क्रि केटकडे संपूर्ण ओढा, ग्लॅमर, स्टारडम असल्यामुळेही महिला क्रिकेटकडे लोकांचा विशेषत: भारतात प्रेक्षकांचा रस कमी होता. पण आता गोष्टी बदलल्या आहेत..2क्17मध्ये झालेल्या महिला वनडे क्रिकेट वर्ल्डकपपासून महिला क्रिकेट टीम संबंधित गोष्टी बदल्यात.कपिल देवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेला 1983चा वल्र्डकप भारताने जिंकल्यावर भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ बनला. खेळात पैसा आला. तशाच प्रकारे 2क्17च्या इंग्लंडमधील वर्ल्डकपनंतर महिला क्रिकेट मॅचेसही चॅनल्स आता नियमितपणो -प्रसंगी लाइव्हही दाखवू लागलेत. आजवर मिताली राज, झुलन गोस्वामी, अंजुम चोप्रा याच खेळाडू त्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळेच लोकांना माहीत होत्या. पण आता स्मृती मानधना, जेनिमा रोड्रिक्स, शेफाली वर्मा, तानिया भाटिया, रिचा घोष या स्टार खेळाडू आहेत. त्यांना लोक ओळखायला लागले आहेत. महिला क्रिकेट इतिहासचा विचार केल्यास क्रि केटमधील बॉल थेट सतराव्या शतकात इंग्लंड येथील ससेक्स गावात जाऊन पडतो. महिला क्रिकेटचा प्रथम सामना तेथे खेळला गेला. अर्थातच इंग्लंड हा क्रि केटचा जन्मदाता असल्याने महिला क्रिकेटही तेथेच जन्माला आलं.स्कर्ट्स परिधान करून तत्कालीन महिला प्रथम क्रिकेट सामना खेळल्या होत्या.इंग्रजांनी जगात जेथे जेथे राज्य स्थापन केले तेथे क्रिकेट आणि चहाचं व्यसन लागत गेलं. इंग्रज गेले; पण क्रिकेट आणि चहा मागे ठेवून गेले. पुढे देशोदेशी क्रि केट बहरत गेलं. स्री-पुरु ष भेदाच्या पलीकडे गेलं.
****
सध्या भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू आहे ती सांगलीची स्मृती मानधना. जेनिमा रॉड्रिक्स ही एक अत्यंत गुणवान मुंबैया खेळाडू. शिखा पांडे ही भारतीय वायुसेनेत काम करते. ती वेगवान गोलंदाज आहे. पूनम यादव ही भारतीय संघातील लेग स्पिनर आहे. अनुजा पाटील ही आणखी एक मराठी खेळाडू भारतीय संघात आहे. ती अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाजी ती करते.पूजा वस्रकारही अजून एक उत्तम खेळाडू.वेदा कृष्णमूर्ती ही आघाडीची फलंदाज आहे. आणि हरमनप्रीत कौर! ही पंजाबी कुडी टीममधील अँग्री यंग वुमन आहे. ती अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. वर्ल्डकपमध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरु द्ध सेमिफायनलमध्ये काढलेले शतक प्रसिद्ध आहे. हरमनप्रीत कौर ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कर्णधार आहे. या महिला क्रिकेटपटू आता जाहिरातींमध्येही मोठय़ा प्रमाणात दिसायला लागले आहेत. प्रेक्षक आणि टीव्ही ब्रॉडकास्टर्स आता महिला क्रिकेटला गांभीर्याने घेताहेत.