शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

जो जिता..  नही !! जो खेला वही सिकंदर? कसा? - हे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:37 IST

आपल्याला नेहमी विजयाच्या गोष्टी ऐकायची सवय असते. जो जिंकतो तोच हिरो असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जरा हार खाल्ली, एक डाव हरला की आपण गळपटतो. हरलो म्हणून खेळणं कसं थांबवता येईल.

ठळक मुद्देम्हणून , लोकशाहीचा खेळ खेळत राहू. 

- मिलिंद थत्ते

जेव्हा जेव्हा एखादा तरुण किंवा तरुणी, नागरिक माहिती अधिकार वापरायला निघतात. तेव्हा चार शहाणे आजूबाजूला नक्की उगवतात, ऑख वसकन ओरडतात, ‘हट, याने काय होणारे? काही फरक पडणार नाही’. जेव्हा एखादा युवक ग्रामसभेत प्रश्न विचारतो, एखाद्या अर्धवट झालेल्या कामाचा हिशेब मागतो, तेव्हा गुरगुरणारे अनेक आवाज गोळा होतात, ‘चार बुकं शिकला तर शिंगं आली का रे तुला? आसं होत नसतंय? उगा फालतू प्रश्न विचारलेस तर तुला ग्रामपंचायतीतून दाखले मिळणार नाहीत..’ घरचे लोक पण म्हणतात, तुला कशाला गावाची चिंता? तुझं तू बघ!काहीवेळा असंही होतं की, माहिती हातात येते तरीही काही बदल घडत नाही. गावगाडा चालायचा तसाच चालत राहतो. मग काय करायचं प्रश्न पडतो. शिव्याच मिळतात आपल्याला, जिंकायचे तर चिन्ह नाहीच. मग काय करू आता? चालू द्या भ्रष्टाचार, चालू द्या खराब बांधकामं, जाऊ द्या आमच्या वाटच्या योजना दुसर्‍याच्या घशात, लागू द्या वाट समद्यांची.. मी बसून फक्त बघत राहतो. जळतंय सारं! जळत जळत माझ्या बुडाशी येईल तोवर बसून राहील. अन् लागला बुडाशी चटका की पळून जाईन. पळून पळून जाईन कुटं? .. इथवर आली विचाराची गाडी की रूतते बघा कशात तरी.. नि फिरून पहिल्या स्टेशनवर येतंय डोस्कं!मित्नांनो, आपल्याला नेहमी विजयाच्या गोष्टी ऐकायची सवय असते. जो जिंकतो तोच हिरो असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जरा हार खाल्ली, एक डाव हरला की आपण गळपटतो. जो जो जिंकलेला असतो, तो त्याआधी किती वेळा हरला हेही आपण ऐकले पाहिजे. दुसर्‍या महायुद्धात जपान हरला. नुसता हरलाच नाही तर बेचिराख झाला. जपानी माणसे अत्यंत स्वाभिमानी, ताठर! त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. याच काळात फुजियामा गावातला फुरूहाशी हा एक वेगात पोहणारा तरुण होता. महायुद्धाची शिक्षा म्हणून 1948 साली जपानला ऑलिम्पिकमध्ये खेळू दिले नव्हते. तेव्हा फुरूहाशी अमेरिकेतल्या वैश्विक जलतरण स्पर्धेत पोहायला गेला. या स्पर्धेआधी एका अपघातात त्याच्या हाताचे बोट तुटले होते. जलतरणपटूचे बोट तुटणं ही मोठी अडचण होती; पण तरीही तो खेळायला गेला. तिथल्या खेळात तो जिंकला नाही. पण त्याचा वेग आणि शैली यामुळे त्याला अमेरिकन जनतेची वाहवा मिळाली. तो हरला आणि जपानला परतला, तेव्हा जपानच्या विमानतळावर लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले. हरलेल्या खेळाडूचे स्वागत? कारण बेचिराख झालेल्या घरादारातून पुन्हा जोमाने उठू पाहणार्‍या जपानी जनतेला तो आपला हिरो वाटला. विपरीत परिस्थितीत जिगर न हरता तो खेळला, लढला, तसेच आम्हीही उभे राहू पुढे जाऊ, खेळत राहिलो तर एक ना एक दिवस जिंकू - असा विश्वास त्याच्या खेळातून जपानी जनतेत निर्माण झाला. काही वर्षातच ‘मेड इन जपान’ वस्तूंनी अमेरिकन मार्केट पादाक्रांत केले. आणि  फुरूहाशी पुढच्या काळात जिंकत गेला. 33 विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. ‘फ्लाइंग फिश ऑफ फुजियामा’  या नावाने जगानं  त्याला डोक्यावर घेतलं. आताही या शब्दांनी गुगलवर शोधलेत तर त्याच्या विजयाच्या कहाण्या, व्हिडीओ सगळे सापडेल. पण त्याच्या हरण्याची गोष्ट सापडणं मुश्कील. जपान देश मात्न त्याच्या हरण्यातून प्रेरणा घेऊन उभा राहिला.म्हणून , लोकशाहीचा खेळ खेळत राहू. जो जिता.. नही नही यारों.. जो खेला वही सिकंदर!