शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

तोमोईच्या शाळेत येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:28 PM

शिक्षणाकडे पाहण्याची नजर बदलणारं पुस्तक- तोत्तोचान

ठळक मुद्देहिरोशिमा-नागासाकी आणि दुसरं महायुद्ध याबद्दल यू टय़ूबवर भरपूर डॉक्युमेण्टरीज आहेत. त्या बाउझ करून बघायला विसरू नका! 

- प्रज्ञा शिदोरे 

ऑगस्ट जवळ आला ना की मला कायम दोन पुस्तकं आठवतात. एक म्हणजे भा. द. खेर यांनी लिहिलेली हिरोशिमा नावाची कादंबरी. या कादंबरीत त्यांनी 1939 पासूनचा कालखंड रंगवलेला आहे. जपानने पर्ल हार्बरवर दिलेली धडक, अणुबॉम्बनिर्मितीचे प्रयोग, जपानवर बॉम्बफेक, त्यामुळे भाजून निघालेले तेथील नागरिकांचे जीवन आणि अखेर हिरोशिमा, नागासाकीवर कोसळलेले अणुबॉम्ब हा चित्तथरारक भाग कादंबरीत वाचायला मिळतो. युद्धानंतरचे जपान आणि  राखेतून फिनिक्सप्रमाणे झेप घेतलेला जपानही आपल्याला अनुभवायला मिळतो. या पुस्तकानं तुमचा युद्ध, अणुबॉम्ब, मानवता याबद्दलची मतं खूप पक्की घडतात असं वाटतं. संहाराचं चित्न पक्कं होतं. आणि वैर्‍यावरही येऊ नये असं वाटतं. जपानचं या मोठय़ा संहारातून बाहेर पडून असा विकास करणं हे ही आश्चर्यकारक वाटत.  दुसरं पुस्तक म्हणजे ‘तोत्ताेचान’. एका लहान मुलीची, तिच्या शाळेची गोष्ट आहे ही. आणि बॅकग्राउंडला अर्थातच दुसरं महायुद्ध आणि बॉम्ब. मूळ लेखिका तेत्सुको कुरोयानागी हिनं तिच्या स्वतर्‍च्याच आयुष्यावर लिहिलेलं पुस्तक.तोत्ताेचान ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, तिची लाडकी तोमोई शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्र म, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास. हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं ‘तोत्ताेचान’ हे पुस्तक. कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतर्‍ चांगलीच असतात. तो चांगुलपणा रूजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्र ीडा, संगीत, निसर्ग, चित्नकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्र म पाठय़पुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्र म, खेळ, गमती आपल्या शिक्षण पद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही एका वेगळ्या पद्धतीच्या शाळेबद्दल वाचायचं असेल तर हे पुस्तक नक्की नक्की वाचा!या पुस्तकामधून या शाळेबरोबरच जपान कळायला मदत होईल. ‘तोत्ताेचान’चा  मराठीमध्ये उत्कृष्ट अनुवाद चेतना सरदेशमुख यांनी केला आहे. 

हिरोशिमा-नागासाकी आणि दुसरं महायुद्ध याबद्दल यू टय़ूबवर भरपूर डॉक्युमेण्टरीज आहेत. त्या बाउझ करून बघायला विसरू नका!