शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रगत जनुकीयविज्ञान विवाहसंस्थेतला अडसर ठरेल का?

By admin | Updated: July 21, 2016 12:45 IST

भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते.

 - मयूर देवकर

भविष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते. या चर्चेला आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होताना दिसत आहे. पुलित्झर प्राईज विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी यांचे दुसरे पुस्तक ‘द जीन : अ‍ॅन इंटिमेट हिस्ट्री’ नुकतेच प्रकाशित झाले. जनुकीयविज्ञानाचा इतिहास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. जनुके म्हणजे काय? मानवाच्या विकासात त्यांचा वाटा काय? मानवी अस्तित्त्वाचे भविष्य काय? अशा अनेक गोष्टींचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अनुवंशिकशास्त्र किंवा जननशास्त्राच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवाला होणाऱ्या लाभांसोबतच काही गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.मुखर्जी म्हणतात, कल्पना करा की पेशींची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, तुमच्या होणाऱ्या बाळाला न्युरोडिजनेरेटिव्ह डिसिज् (मेंदूतील चेतापेशींचा आजार) होण्याची शक्यता आहे. अशावेळी तुमच्या लग्नावर, नातेसंबंधावर या माहितीचा कसा परिणाम होईल? तुम्ही कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट होणार? यामुळे आपला एकेमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार का? जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर होणाऱ्या परिणामांवर विचार केला असता हा मुद्दा किती गंभीर आहे हे कळेल. खरंच किती अवघड होऊन बसेल जर एखाद्या व्यक्तीला कळले की, त्याच्या जनुकांमुळे त्याला होणारे मूल आजारांनी ग्रस्त असेल तर? सकारात्मकदृष्ट्या पहायचे झाले तर भविष्यात काय होणार हे आपल्याला आधीच कळाले तर आपण त्यावर तोडगा म्हणून आतापासूनच उपाय करू शकू. परंतु प्रश्न उपाय किंवा तोडगा काढण्याचा नाहीए. प्रश्न आहे तो नातेसंबंधावर पडणाऱ्या फरकाचा.जोडीदार निवडताना एकमेकांविषयी सत्यता माहित असणे गरजेचे आहे. मग जर मला माहित आहे की, माझ्या कुटुंबामध्ये आनुवंशिक आजार आहे. तो मी होणाऱ्या जोडीदाराला सांगणार का? होणाऱ्या बाळाला दुर्धर आजार होण्याची ४०-५० टक्के शक्यता आहे. मग या शक्यतेवर आपले नाते अवलंबून असणार का? बाळाला जन्म द्यायचा की नाही हा निर्णय घेताना काय विचार करणार? पुस्तकात मुखर्जींनी लिहिले आहे की, माझ्या पत्नीला जेव्हा मी कुटुंबातील अनुवंशिक आजराबद्दल सांगितले तो क्षण खरंच खूप अवघड आणि निर्णायक होता. अशा कबुलीमुळे माझ्या नात्यावर काय परिणाम होणार याचे निश्चित असे उत्तर माझ्याकडे नव्हते. पण न सांगणे मला पटत नव्हते.एखाद्या अनाथ मुलाची जनुकीय मॅपिंग केली असता क ळाले की, त्याला एखादा आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याला कोणी दत्तक घेईल का? असे असंख्य प्रश्न आणि जर-तरच्या गोष्टी भविष्यात आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. यावर मुखर्जी म्हणतात की, सर्व पूर्वज्ञान झिडकारून आपण दुर्लक्ष क रण्याचा पर्याय स्वीकारू शकतो. पण आता मात्र तसे करणे शक्य नाही.