शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

विकिलिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:12 IST

मानव जातीच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासामध्ये मानवानं जेवढे बदल पाहिले नसतील तेवढे बदल आपण गेल्या १०-१५ वर्षांत पाहिले.

 - प्रज्ञा शिदोरेमानव जातीच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासामध्ये मानवानं जेवढे बदल पाहिले नसतील तेवढे बदल आपण गेल्या १०-१५ वर्षांत पाहिले. या बदलांचं सर्वात मोठं कारण म्हणजे इंटरनेट. या माध्यमामुळे मानवी व्यवहारांमध्ये एक प्रकारची आभासी पारदर्शकता आली असं ‘विकिलिक्स’चा जनक ज्युलियन असांज म्हणतो. खरंतर तुम्ही हे नाव १०० टक्के ऐकलं असणार. जगात सध्या अशा काही घटना घडत आहेत ना की या अवलियाची आणि त्याच्या कामाची आठवण पुन्हा पुन्हा होते. काय आहे हे विकिलिक्स? जर तुम्हाला एखादी माहिती एखाद्या शासकीय संस्थेने काही अंतस्थ हेतूंनी जनतेपासून लपवून ठेवली आहे असं लक्षात आलं आणि जर ती माहिती तुम्हाला उपलब्ध असली तर ती तुम्ही इथे आणून देऊ शकता. इथे म्हणजे ‘विकिलिक्स’ नावाच्या वेबसाइटवर. ही माहिती विकिलिक्सकडे कशी आली याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला जात नाही. खुद्द विकिलिक्सलाही नाही याची खबरदारी घेतली गेली आहे. २००६ साली ज्युलियन असान्जने याच पद्धतीने अनेक बलाढ्य राष्ट्रांची गुपिते विकिलिक्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणायला सुरुवात केली. या सगळ्या प्रकारामध्ये त्याचं प्रमुख लक्ष आहे ती म्हणजे आपल्याकडील गुप्त माहितीच्या आधारे जगावर सत्ता गाजवणारी अमेरिका.असान्जवर अमेरिकेने आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. पण असान्ज त्यांना भीक घालत नाही. सध्या असान्ज हा इंग्लंडमध्ये आहे. आणि त्याने सार्वजनिक आयुष्यातून जवळजवळ संन्यास घेतलेला दिसतो. पण हा एक असान्ज माहीत आहे हो, काय माहीत, आपल्यापैकी कोणीतरी माहितीला मुक्त करण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करत असेल किंवा सिटिझन्स जर्नालिस्ट म्हणून काम करत असेल, हो ना? ज्युलियन असान्ज काय किंवा विकिलिक्स काय, ही केवळ एक व्यक्ती किंवा एक वेबसाइट नाही. हा एक विचार आहे. माहितीला मुक्त करण्याचा. गुप्त माहितीच्या आधारे जे राजकारण सुरू असतं त्या माहितीला मुक्त करण्याचा. तेव्हा नक्की वाचा या वेबसाइटवरची माहिती-https://wikileaks.org 

जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...अमेरिका जशी स्वत:ला आर्थिक दृष्टीने अग्रगण्य म्हणवते तशीच ती टाळल्या जाऊ शकणाऱ्या काही आजारांतही सर्वात पुढे आहे. आणि त्यात सर्वात पहिला नंबर लागतो तो म्हणजे लठ्ठपणाचा. ज्याला ओबेसिटी म्हणतात तिकडे. अमेरिकेला आज याचमुळे आर्थिक संकटाबरोबरच या आरोग्य संकटानं ग्रासलं आहे. अमेरिका हा देश जगात सर्वात ‘लठ्ठ’ राष्ट्र बनत चालला आहे. या लठ्ठपणाचं मुख्य कारण म्हणजे तेथील फास्ट-फूड चेन्स.याच ‘नव्या अमेरिकन खाद्यसंस्कृती’चा अभ्यास केला मोर्गन स्परलॉक या लघुपट निर्मात्याने. त्यानं फक्त मॅकडोनाल्ड्समधलं अन्न खाल्लं आणि स्वत:च्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यात असं लक्षात आलं की वजनात, चरबीत वाढ, यकृत खराब होणं अशा शारीरिक परिणामांबरोबरच डिप्रेशन-उत्साह न वाटणं इत्यादी मानसिक आजारही झाले. या ‘फास्ट-फूड्स’मध्ये पोषक अन्नाचं प्रमाण अत्यल्प आणि शरीराला घातक अशा चरबीयुक्त पदार्थांचं प्रमाणाच जास्त आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ‘फास्ट-फूड चेन्स’ लहान मुलांना कधी खेळणं देऊन, तर कधी विदूषकाबरोबर छायाचित्र काढून देऊन भुलवतात आणि मुलांना ते पदार्थ लहानपणापासूनच आवडू लागतात. कमी पोषण देणारं अन्न खाण्याची सवय लागल्यानं मुलांचं आरोग्य फोफसं होत आहे.भारतामध्येही आता अशा ‘फास्ट-फूड चेन्स’ उघडत आहेत. म्हणून आपण ग्राहक म्हणून योग्य निवड केली पाहिजे!या अन्नानं नक्की शरीरावर कसा फरक पडतो, यावर आधारित आर्थिक हितसंबंध समजून घेण्यासाठी नक्की पहा ‘Super Size me’ हा लघुपट.यासाठी यू ट्यूबवर Super Size me असं सर्च करा.