शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

टेस्ट करायची कशासाठी?

By admin | Updated: May 14, 2015 20:04 IST

अॅप्टिटय़ूड टेस्ट करायची म्हणजे नक्की करायचं काय? नक्की कशाचं मोजमाप करतात या टेस्टमध्ये? आणि निकाल म्हणून करिअर निवडून देतात का?

अमित, बोर्डात आला. मार्क्‍स 98 टक्क्यांच्या पुढेच काही पॉइण्ट्स. सगळ्यांना वाटलं आता हा सायन्सलाच जाणार, मेडिसिन नाही तर इंजिनिअरिंगच करणार. पण अमितने बॉम्ब फोडला, म्हणाला मला सगळ्या भाषा आवडतात मी त्याच क्षेत्रत काहीतरी काम करीन, परफॉर्मिग आर्ट्स हेच माझं फिल्ड!
वाद झाला आणि मग पालक त्यांना करिअर गायडन्ससाठी आमच्याकडे घेऊन आले. त्यांना वाटलं की, आपला मुलगा एवढा हुशार, त्याला नक्की इंजिनिअरिंग, मेडिकलकडे कल असणार. याच्या डोक्यात काहीतरी खूळ भरलेलं आहे इतकंच म्हणून मग ते म्हणाले चलं तुझी अॅप्टिटय़ूड टेस्टच करू. करिअर गायडन्स घेऊ.
हा असा वाद हल्ली घरोघर होतो आणि मग पालक मुलांना घेऊन येतात टेस्टसाठी. किंवा हल्ली मुलं स्वत:हून म्हणतात की, कन्फ्यूज आहे, मला अनेक गोष्टी आवडतात. त्यातून मी काय निवडायचं हे माझं मला ठरवता येत नाहीये!
खरं तर या टप्प्यावर टेस्ट करून घेण्यास काहीच हरकत नाही!
मात्र हे लक्षात ठेवायला हवं की, या टेस्ट आपला कल कुठं आहे, हे सांगणार आहेत. आपल्या व्यक्तिमत्त्वातली शक्तिस्थानं आणि कमकुवत दुवे सांगतात. त्यातून आपली वाट आपल्यालाच निवडावी लागते.
अॅप्टिटय़ूड म्हणजे नक्की काय?
या अॅप्टिटय़ूड टेस्ट करायच्या म्हणजे नक्की करायचं काय?
नक्की कशाचं मोजमाप केलं जात यासा:यात?
खरं तर आपल्यात जी काही बुद्धिमत्ता असते, काही विशेष क्षमता असतात, त्यांच्या जोरावर आपण काही गोष्टी करतो, काही गोष्टी शिकतो, त्या शिकणं किंवा न शिकणं आपल्याला सोपं जातं! काही गोष्टी करायला मनापासून आवडतात.
आणि व्यवसाय-उद्योग-नोकरी करताना यासा:या क्षमतांचा, बुद्धिमत्तांचा उपयोग होतो. आपण कुठलंही काम करत असू, कुठलीही नोकरी करणार असू तरी आपल्याला त्या क्षमतांचा वापर करावाच लागतो. ज्या क्षमता आपल्यात मुळातच जास्त असतात त्यागोष्टी करणं आपल्याला सोपं जातं आणि आवडतंही! ते करून त्या कामात जास्तीत जास्त यश मिळवणंही आपल्याला सोपं जातं!
अभ्यास असं सांगतो की, जसा कल असेल तो कल ओळखून त्याच क्षेत्रत काम करणारी माणसं नुस्ती यशस्वीच होत नाहीत तर ती जास्त आनंदी आणि समाधानीही असतात.
कारण आपलं करिअर हे काही फक्त पैसे कमवण्याचं साधन नसतं, पैसा तर कमवावा लागतोच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ते त्या कामात मन रमणं, छान वाटणं, त्या कामात अनेक प्रयोग करून पाहता येणं!
म्हणून जॉब सॅटीसफॅक्शनचा आपल्या जॉब प्रोफिशियन्सीशी म्हणजेच आपल्या कामातल्या गुणवत्तेशी संबंध असतो. आणि जर आपला कल असेल त्या कामाचा तर ती गुणवत्ता जास्त चांगलं काम करते, काम करायला भाग पाडते.
ज्याला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं त्याचा तसा कल पाहिजे. त्याला जागा, यंत्रतंत्र, मशिनरी यासा:यात मुळात रस पाहिजे. गणिताची आवड पाहिजे, तर त्याला ते इंजिनिअरिंग मनापासून आवडेल.
 ज्याला डिझायनिंग करायचं आहे त्याला नुस्ती चित्रकला येते हे पुरेसं नाही तर क्रिएटिव्ह क्षमताही पाहिजे. कल्पनाशक्ती चांगली पाहिजे!
आणि हे सारं आपल्यात आहे की नाही, हे शोधता यायला हवं! 
ते शोधलं तर आपण आपल्यासाठी उत्तम आनंददायी करिअर निवडू शकतो.
मात्र ते शोधताना तत्त्व एकच, आपण प्रामाणिकपणो शाोधायचं, आपल्याला जे आवडतं ते आवडतं हे मान्य करायचं. जे आवडत नाही ते नाही असं म्हणून जी क्षमता आहे, त्यानुसार काम निवडायचं!!
 
करिअरसाठी आवश्यक क्षमता कोणत्या?
 
आपल्याला आपला कल तपासून पहायचा, आपल्याला त्यातल्या त्यात जास्त काय आवडतं, हे सांगणारी ही चाचणी. त्यात तुमचे कल तपासले जातात. सगळ्या क्षमता सगळ्यांमध्ये असतात. पण काहीजणांमध्ये काही क्षमता जास्त असतात काही कमी!
जी क्षमता जास्त तिचा आपल्या करिअर निवडीसाठी उपयोग कसा करता येईल हे तपासले जाते.
त्या क्षमतांची ही ओळख.
 
मुख्यत्वे करिअर निवडीसाठी लागणा:या क्षमतांची ही एक ओळख..
 
1) भाषिक क्षमता
भाषेचा जिथं वापर येतो, शब्द येतात, शब्दातून अर्थ येतात आणि त्यातून एक्स्प्रेशन येतं त्याला भाषिक क्षमता म्हणतात. भाषा, कायदे, पत्रकारिता अशा क्षेत्रसाठी ही क्षमता महत्त्वाची ठरते.
2) गणितीय क्षमता
गणिताचं ज्ञान कसं आहे हे यात मोजलं जातं. आकडय़ांवर किती प्रभुत्व ते त्यातून कळतं. 
3) अवकाशीय क्षमता
व्हिज्युअलाईज करून वेगवेगळ्या जागा भरण्याची कल्पनाशक्ती, थ्री डायमेन्शन विचार करण्याची ताकद म्हणजे ही क्षमता.
4) विश्लेषणाची क्षमता
एखाद्या गोष्टीचं विश्लेषण किती तातडीनं करता येतं. मिळालेल्या माहितीतून काही शोधता येतं का, हेही क्षमता पाहते.
5) यांत्रिक क्षमता
मशिनरी, साहित्य, त्याचा वापर याबाबतची क्षमता. त्यांच्यावरचं प्रेम, आणि त्यातून नवीन काहीतरी उभं करणं.
 
 
 
निकालानंतर  निर्णयासाठी 1 सूत्रं
 
मुलांसमोर आणि पालकांसमोरही अनेक ऑप्शन्स आहेत.
यातून निवडायचं काय हा प्रश्न.
अनेकांना वाटतं की, टेस्टनंतर पण आपल्याला काही पटकन कळलं नाही.
त्यातून निवडायचाही घोळच!
हा घोळ सोडवण्याचं एक सूत्र.
1) आपला कल जिथं जास्त, त्या क्षमता कोणत्या क्षेत्रत सर्वाधिक वापरल्या जातात हे आधी लक्षात घ्या. त्या क्षेत्रपैकी कुठल्या क्षेत्रत आपल्याला काम करायला आवडेल हे निवडा!
करिअर ऑप्शन्स टोकाचे दिसत असले तरी त्यातून तुमची निवड तुमच्या इच्छेप्रमाणं सहज करता येईल!