शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ये वेट घटता क्यूं नही?

By admin | Updated: May 12, 2016 15:04 IST

सेलिब्रिटींचं वजन घटतं-वाढतं मग आपल्या वजनाचा काटा का हलत नाही?

त्याचं उत्तर एकच- व्यायाम नाही, सातत्य नाही, धड खाणं नाही!
 
‘अंबानींच्या मुलानं वजन उतरवलं, 
तर त्यात काय एवढं नवल?’
वाढलं तसं उतरलं.
- असे तिरकस शेरे मारून सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या ‘वेट लॉस’बद्दलच्या चर्चाना गेल्या महिन्यात उधाण आलं होतं. आपला कुठं बाप अंबानी आहे, हे असलं काही असं इम्पॉसिबल करून दाखवायला, असंही अनेक जणांचं मत होतं आणि आहेही! हाताशी प्रचंड पैसा, जगप्रसिद्ध ट्रेनर्सची फौज, म्हणाल ती सोय असं सारं सोबत असेल तर कुणीही वजन कमी करून एकदम डॅशिंग आणि हॅण्डसम होईल! आपल्याकडे काय आहे, पळायचं म्हटलं तर धड बूट नाही पायाला! अशी असूयाही अनेक जणांनी व्यक्त केली,
तर काहींना वाटलं कुतूहल!
अनंत अंबानी, राज्याचे मुख्यमंत्री ते थेट गोलमटोल परिणीती चोप्रा या सा:यांनी आपापल्या वजनाचा काटा इतका कसा खाली उतरवला याचं अनेकांना अप्रूप वाटलं. आणि आपल्या वाढत्या वजनाला वेसण घालत त्याचाही नक्षा कसा उतरवायचा हा विचार डोक्यात वळवळू लागला.
त्यात आता उन्हाळ्याची सुटी. पूर्ण रिकामपण. जीम तर काय सगळीकडेच झालेत.
आता कॉलेज सुरू होण्यापूर्वी जरा स्वत:च्या फिटनेसवर काम करावं आणि कॉलेजात गेलं की एकदम बाकीच्यांना चकितच करून सोडावं असं अनेकांना वाटतं!
प्रश्न एवढाच की ते जमावं कसं?
आणि आपल्याला जमेल का?
- तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच की, जमेल! आपल्यालाही जमेल!
मात्र त्यासाठी कसल्याही कृत्रिम, झटपट उपायांच्या मोहाला बळी न पडता स्थूलपणाविरुद्ध लढाईच उभारत ती लढाई अत्यंत शास्त्रशुद्ध, काटेकोर शिस्तीत लढत स्वत:लाच टप्प्याटप्प्यानं जिंकावी लागेल!
आणि ती लढाई सुरू कशी करायची, आपलं वजन कसं उतरवायचं हेच सांगणा:या या काही पाय:या..
त्या सोप्या नाहीत, पण अवघड नाहीत, अशक्य तर नाहीच नाही, हे नक्की!
 
वजन घटवायचं काय करू? कष्ट
 
 
‘स्लीम अॅण्ड ट्रीम’ राहण्यासाठी सध्या यंगस्टर ‘काहीपण’ करायला तयार आहेत.
आणि ते करतानाही त्यांना लवकरात लवकर ‘स्लीमट्रिम’ व्हायचं असतं. अंगावरची अतिरिक्त चरबी कमीत कमी दिवसात कमी करण्यासाठी लोक हवी ती किंमत मोजायला तयार होतात. सजर्री, सप्लीमेंटचा अतिरेक, नको नको ते स्लिमिंग बेल्ट्स आणि अजून बरंच काही करण्याची त्यांची तयारी असते. पण शरीराला मेहनत नको असते. आणि मग तरुण मुलंही सांगतात, ‘पटकन जमेल असं काहीतरी सांग, नको रे बाबा ते जिम. तेवढा वेळही नाही.
खरंतर व्यायामाला वेळ न देणं आणि त्यात सातत्य न ठेवणं हा खरा प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे अज्ञान आहे.
समतोल आहार आणि व्यायाम यात सातत्य राखलं तर आपल्या शरीरात व  आपल्या आयुष्यातही खूप सकारात्मक बदल घडू शकतो.
खरंतर वजन घटवायचं असो, वाढवायचं असो किंवा नुस्तं फिट राहायचं असो, या तीन गोष्टींना दुसरा काही पर्यायच नाही.
1) समतोल आहार.
2) व्यायाम.
3) सातत्य.
 या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी जे काही आहे किंवा असेल असं आपण म्हणतो ते म्हणजे निव्वळ पळवाट. बाकी काहीही नाही.
डोक्यात हुक्की येते, चला वजन कमी करू. मग काही दिवस काहीतरी करायचं असं करू नये. फिटनेस ही गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. नुस्त्या आहारातून भात, मैदा, गोड कमी केलं आणि व्यायाम म्हणून चालायला लागलं म्हणजे आपण फीट होऊ असं होणार नाही.
त्यासाठी मुळात समतोल आहार म्हणजे काय हे आपल्याला माहिती हवं. त्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटिन, फॅट,  फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स, आणि पाणी यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर व्यायाम. शरीराला कष्ट. कार्डियोरेसपिरेटरी एण्डय़ुरन्स, मस्क्युलो स्केलेटल स्ट्रेन्थ, मस्क्युलो स्केलेटल स्ट्रेन्थ, मस्क्युलर एण्डय़ुरन्स, फ्लेक्ङिाबिलिटी, बॉडी कॉम्पोङिाशन यासाठी विशिष्ट पद्धतीचा शारीरिक व्यायाम करावा लागतो, जो प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळा असतो.
आपल्यासाठी काय योग्य हे योग्य मार्गदर्शकाकडून समजून घेऊन जर व्यायाम सुरू केला, त्यात सातत्य ठेवलं तर  फिटनेसचं लक्ष्य दूर नाही.
पण कष्ट आणि सातत्याला पर्याय नाही.
 
 
5  पॉइण्ट फॉर्म्युला
 
 
चला व्यायाम करू, पहाटे उठू असं एका वाक्यात ठरवून काही होत नाही. त्यासाठी आपल्याकडे निश्चित अजेण्डा हवा आणि रोज आपल्याला व्यायाम करायला भाग पाडील असं काहीतरी हवं.
त्यासाठीच हा 5 पॉइण्ट फॉम्यरुला.
 
1) व्यायाम कशाला?
या प्रश्नाचं उत्तर देईल असं काहीतरी स्ट्रॉँग कारण आपल्याकडे हवं. आपलं ते ध्येय. नुस्तं वजन कमी करणं नव्हे, तर त्यापलीकडे काहीतरी लक्ष्य हवं आपल्या फिट होण्याचं.
 
2) जीम दोस्ती
जीमला जाताना कुणी दोस्त सोबत हवा. तोही हवाहवासा म्हणजे जीमला दांडी मारण्याचं कारण उरत नाही. आणि तिथं गेलं की रोज एकच एक व्यायाम न करता वेगवेगळा व्यायाम करून त्यातली गंमत शेअर करता येते.
3) जास्त वेळा, कमी खा.
थोडं थोडं पण आठवेळा खा. अगदी थोडं, एकदाच भरपूर, पोटाला तडस लागेर्पयत कधीही जेवायचं नाही.
 
4) टेक इट स्लो
एका आठवडय़ात, एका महिन्यात काही आपल्यात बदल दिसत नाही. तेव्हा वेळ द्या. धीर धरा. धीर सुटला की संपलंच सारं.
 
5) अॅप-ट्रॅक
एखादं स्मार्ट अॅप वापरा फोनवर म्हणजे मग ते तुमच्या रोजच्या अॅक्टिव्हिटीचं रिपोर्ट कार्ड देत राहील!
 
- समर माळी
फिटनेस एक्सपर्ट