शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

हुंडा का घ्यावा लागतो?

By admin | Updated: February 25, 2016 21:51 IST

एक साधा प्रश्न. एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नात

एक साधा प्रश्न.एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नातमुलीकडून हुंडा का घेतात?‘आॅक्सिजन’ला आलेलीपत्रं आणि ई-मेल्समध्ये बारीक नजरेनं शोधून पाहिलं,तर सापडतातचक्रावून टाकणारीकाही उत्तरंमुलीकडच्यांना शहरातलाच पोरगा हवा,तोही शक्यतो सरकारी नोकरीवाला.त्यातही पोलिसांत, महसूल खात्यात,एरिगेशनवाला असेल तर सोन्याहून पिवळं.नाहीतर बॅँक/एलआयसी त्यातल्या त्यात बरं,अशी पोरं गाठायची म्हणून मुलींचे वडीलपैशाच्या पोत्यांची तोंडं उघडतातआणि जास्त हुंडे देऊन का होईनासुपारी फोडतात.शहरी/नोकरीवाला मुलगाच पाहिजे,हा आग्रह हुंड्याच्या रकमा वाढवतो आहे.हुंडा नको असं म्हणणाऱ्या मुलालाखेड्यापाड्यात कुणी मुलगी देत नाहीत,असाही अनुभव येतो म्हणतात.कारण ‘अशा’ मुलाबद्दल शंका येतात.याचं आधी लग्न झालेलं असलं पाहिजे,काहीतरी शारीरिक दोष असणार,काहीतरी कमी असणार असं म्हणतमुलींचे वडील हुंडा नको म्हणणाऱ्यांनाबाहेरचा रस्ता दाखवतात.‘शिक्षण संस्था, बॅँका,खासगी कंपन्यांमध्ये मुलालापर्मनण्ट नोकरी मिळेल, त्यासाठीफक्त काही लाख द्या,पगार तर काय मरेपर्यंत तुमची मुलगीच खाणार,’असं म्हणत मुलीच्या वडिलांकडूनकाही लाख घेतले जातात.ते दिलेही जातात,पुन्हा कारण तेच, शहरी-नोकरीवाला मुलगा हवा.आपण किती हुंडा घेतला,हे सांगणंच नव्हे तरआपण किती हुंडा दिला हे सांगणंही समाजातसध्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे.थेट रोख रकमेचा हुंडा आता मागितला जात नाही,त्याऐवजी आलिशान लग्न, दागिने, गाड्या, घर,नोकरीसाठी पैसा ते देश-विदेशातील हनिमून पॅकेजया स्वरूपात देवाणघेवाण होते आहे.घरच्या मुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करून हुंडा दिलेला असतोच, त्याची भरपाई म्हणूनमुलांच्या लग्नात हुंडा घेणं हे जनमान्य!‘दिला, मग घ्यायचा का नाही?’- हे तर्कट सांगून नव्या विचारांच्यामुलांना हुंड्यासाठी तयार करूनइमोशनल ब्लॅकमेल करण्याचंही प्रमाण बरंच मोठं असावं, असं ही पत्रं सांगतात.अनेक मुलांना हुंडा ही आपल्या गुणवत्तेची सामाजिक पत आहे असं वाटतं.जितका हुंडा जास्त,तितका आपल्याला समाजात मान जास्त,असं त्यांचं मत बनतं आहे.हुंड्यापायी होणारा छळ पाहून मुलींचा हुंड्याला विरोध असतो,पण तो विरोध व्यक्त केला तर आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती मोठी असते.घरच्यांचा धाक आणि हुंडा देऊन,लग्नाचा खर्च करण्याची अपरिहार्यता.कर्ज काढून, शेती विकून लग्नासाठी पैसा उभा करणारे हतबल वडील पाहूनअनेकींना मनस्वी त्रास होतो.त्याउलट वडिलांनी आपलं लग्न थाटामाटात करून द्यायला हवं,सगळा संसार, दागदागिने, हवी ती वस्तू द्यायलाच हवी,तो आपला हक्कच आहे, असं वाटणाऱ्याही काही मुलीया पत्रांमध्ये भेटतात.हुंडा घेऊ नये,हुंडा ही अत्यंत वाईट परंपरा आहे, यावरवैचारिक एकमत म्हणावं इतकी सहमती आहे.मात्र तो ‘नाईलाज’ म्हणून घ्यावा लागतो,असा बहुसंख्य तरुण मुलांचा सूर!