शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कशाला फॉरवर्ड मारता?

By admin | Updated: November 10, 2016 13:49 IST

..प्लीज फॉरवर्ड. हे वाक्य तसं आता अनोळखी नाही. कारण आजकाल सोशल मीडिया वापरत असताना या पेजवरून त्या पेजवर किंवा दुसऱ्या ग्रुपवर अविरतपणे ‘फॉरवर्ड’ करत असतो

- अजिंक्य अंकुश जाधव..प्लीज फॉरवर्ड.हे वाक्य तसं आता अनोळखी नाही. कारण आजकाल सोशल मीडिया वापरत असताना या पेजवरून त्या पेजवर किंवा दुसऱ्या ग्रुपवर अविरतपणे ‘फॉरवर्ड’ करत असतो. पण आता मात्र या वाक्याचा दिवसेंदिवस त्रास होत चाललाय. कारण आजकाल समाजविघातक तरुणांची डोकी कशी तापतील, भडकतील या उद्देशाने असे फॉरवर्ड फिरवत राहतात. आणि बऱ्याचदा आमची हुशार तरु ण मंडळी विचार न करता असे फॉरवर्ड पुढे ढकलत राहते. आजच्या ज्या माझ्या तरुण मित्रांना पुस्तकं, इतिहास किंवा आपल्या भारताची राजकीय परिस्थिती वाचून समजणार नाही तितकी ती एका फॉरवर्डमधून समजते. ज्यांना देशाच्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ठीक अशी माहितीही नाही ते माझे १९-२० वर्षांचे मित्र अशा फॉरवर्डच्या आधारे देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना दिसतात. बऱ्याचदा त्यात धार्मिक वादाचेदेखील विषय असतात. ‘प्रत्येक धर्म तुम्ही आधी चांगला माणूस बना, माणुसकीनं वागा’ असं सांगत असतो. पण आजच्या पिढीला मात्र स्वत:चा धर्म मोठा दाखवताना दुसऱ्या धर्माचे दोष दाखवणारे फॉरवर्ड पुढे ढकलायचे असतात. आपल्याला कुणीतरी ही ढकलगाडी ढकलायला भाग पाडतंय, हे मात्र ते विसरतात. फार फार वरवरची माहिती वाचून हे दोस्त राजकीय विश्लेषक बनतात आणि चर्चा करत वाद घालतात.म्हणून मला वाटतं मित्रांनो, काहीही फॉरवर्ड करण्याआधी काही सेकंद थांबा. जे वाचलं त्याचा विचार करा आणि विचारा स्वत:ला की, हे फॉरवर्ड करून मी चूक तर करत नाही ना? आणि मगच फॉरवर्ड करा.कुडाळ, सिंधुदुर्ग