- कलीम अजीम
थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये हजारो युवक रस्त्यावर आहेत. सोमवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. रविवारी आंदोलकांनी मेणबत्त्या हातात घेत प्रतीकात्मक ‘फ्लॅश मॉब’ केला. वीकेण्डची रात्र हजारो मेणबत्त्यांनी उजळून गेली. प्रदर्शनात हजारो थाई नागरिक सहभागी झाले.राजेशाहीविरोधात हे आंदोलन, त्याचा चेहरा तरुण आहे. ‘रिपब्लिक ऑफ थायलंड’ असे ध्वज घेऊन तरुण आंदोलक रस्त्यावर आले. पंतप्रधानांचा राजीनामा आणि राजेशाहीवर अंकुश ठेवण्याची मागणी ते करत आहेत.सरकार आणि लोकशाही सर्मथकांत झालेल्या या संघर्षात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फेब्रुवारीपासून सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. कोराना आणि लॉकडाऊन काळात शांतता होती; पण ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढली.गेल्या बुधवारी राजधानी बँकाकमध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं. ज्यात फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करत हजारो नागरिकांनी गव्हर्नमेंट हाऊसला विळखा घातला. भर पावसात छत्र्या घेऊन आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं.जनतेचा वाढता आक्रोश आणि सरकारविरोधाची लाट पाहून शासनानं देशात त्वरित आणीबाणीची घोषणा केली. निदर्शनं रोखण्यासाठी राजधानीत चारपेक्षा अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घातली. सरकारनं जाहीर सूचना दिली, की जर रॅली काढली आणि त्याचे सेल्फी पोस्ट केले तर दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल.
( कलीम मुक्त पत्रकार आहे.)
kalimazim2@gmail.com