शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

सरकारी अधिकार्‍यांना ‘साहेब’ का म्हणायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:25 IST

केबिनमधल्या साहेबाला आपण का घाबरायचं? त्याचे काही अधिकार आहेत, तसं त्यानं कामही करायचं असतं, मग त्याला साहेब तरी का म्हणायचं?

ठळक मुद्देसरकारी माणसाला साहेब म्हणायचं नाही. त्याला आदरपूर्वक भाऊ, दादा, किंवा नावापुढं ‘जी’ लावून बोलायचं. 

- मिलिंद थत्ते

मागच्याच आठवडय़ात दुसर्‍या एका तालुक्यांत गेलो होतो. वयम् चळवळीचे पहिलेच प्रशिक्षण त्या तालुक्यातील युवकांनी आयोजित केले होते. अनेक गावांमधून तरुण आणि वयस्क माणसेही कायदा शिकायला म्हणून आली होती.त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या. ते सांगत होते. जमिनी आम्ही कसतो, त्यावर मालकी मिळवून देऊ असे साहेबांनी आम्हाला सांगितले होते. म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो. त्यांच्या पक्षाच्या पावत्या फाडल्या, मोर्चे केले, तरी हातात काही आले नाही. मग सरकारी साहेबांना भेटलो. फारेष्टचे साहेब, प्रांत साहेब यांना भेटलो. एका साहेबानी भेटच दिली नाही. दुसरे साहेब भेटले, ऐकून घेतले, लवकरच नियमानुसार कारवाई करू म्हणाले. आता एक वर्ष होत आले. ते साहेब बदली होऊन गेले. आता पुन्हा दुसर्‍या साहेबांना भेटायला गेलो, तर ते म्हन्ले - आता ते सगळं मला बघावं लागेल. असं लगेच काही सांगू शकत नाही. मग आम्ही एक महिन्याने पुन्हा गेलो, तर रावसाहेब म्हन्ले की साहेब मीटिंगमध्ये आहेत. उद्या या. अशेच नेहमी सांगतात हो ते!  एक तर आमची पोरं बाहेरगावी शाळेत आहेत, घरी बैल चारायला कोणी नाही, एकसारखं तालुक्याला खेटे मारायचे तर कसं परवडणार आपल्याला?’त्यांचं ऐकून तुम्हाला काय वाटलं? काय करायला हवं त्यांनी?शासनात तीन प्रकारचे साहेब आढळून येतात. भाऊसाहेब, रावसाहेब, अन् साहेब! भाऊसाहेब म्हंजे आपल्यासारख्या सामान्य खेडूताला जे एकसारखे दिसतात-भेटतात ते. रावसाहेब म्हन्जे त्यांच्या वरचे, त्यांना केबिन असते, दरवाजा लोटताना विचारावं लागते ‘यिऊका’ म्हनून! पन त्यांच्या केबिनला एसी नसते. एसी आणि बाहेर बसलेला शिपाई म्हणजे समजावे की आत ‘साहेब’ आहे. तिथं आत जायला चिठ्ठी द्यावी लागते. शासन चालवण्यासाठी काही व्यवस्था लागते, अधिकारांची उतरंड लागते हे मान्य. पण त्या उतरंडीची नागरिकांना भीती वाटण्याचे काय कारण? जसं की पोलिसांचा धाक असला पाहिजे; पण आपण जर गुन्हेगार नसू तर पोलिसांना घाबरण्याचे काय कारण? तसेच सरकारी नोकरांनी अधिकार्‍यांना भ्यावे; पण नागरिकांनी घाबरायचे काय कारण?ही भीती घालवण्यासाठी आम्ही एक साधा उपाय केला. सरकारी माणसाला साहेब म्हणायचं नाही. त्याला आदरपूर्वक भाऊ, दादा, किंवा नावापुढं ‘जी’ लावून बोलायचं. आम्ही म्हणतो, ‘साहेब 1947 साली देश सोडून गेले’. आताही ज्यांना वाटतं आपण साहेब आहोत, त्यांनीही त्याच वाटेला जावं. शाळेतल्या प्रति™ोत आपण सर्वानी हजारदा म्हटलंय, आम्ही सारे भारतीय बांधव आहोत.. आणि त्यातले काहीकाही साहेब आहेत’’ - असे तर नाही ना म्हटले?आता साहेब गेले आणि आपण सारे समान दर्जाचे नागरिक आहोत. नागरिक म्हणून माझे काही कर्तव्य आहे, तसेच कलेक्टरचेही नागरिक म्हणून वेगळे कर्तव्य आहे. पगार वेगळा असला तरी नागरिक म्हणून आमचे नाते बंधुत्वाचे आहे. मग साहेब कशाला म्हणायचं?हा प्रयोग आम्ही केला, एक-दोनदा नाही हजार वेळा केला. आमच्या गावांमधले सामान्य नागरिक ग्रामसेवकापासून आयुक्तांर्पयत सर्वाशी निर्भय होऊन बोलू लागले. एका गावातली आजी हसत हसत मला म्हणाली, ही शिकलेली पिढीच फार घाबरते रे, त्यांना सांग तू, आपली कुटं नोकरी जानारै का? आपन कशाला भ्यावं?