शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

आपण इतके का भीत भीत जगतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:51 IST

कशाचाच भरवसा का वाटत नाही?

ठळक मुद्देकसली भीती वाटते?

- रवींद्र पुरी

ािसमसच्या सुटय़ा लागायला फक्त तीन दिवस उरले होते. माझ्या मित्रांचं अजून हो-नाही चाललंच होतं. आमचं रोडट्रीपचं ठरलेलं होतं; पण तरी ठरत काही नव्हतं. शेवटी वैतागून मी माझी बॅक पॅक केली. गॅस स्टोव्ह, टेण्ट, कपडे, सगळं व्यवस्थित पॅक करून कारच्या बुटमध्ये टाकलं. फोटो काढून मित्रांना पाठवला आणि सांगितलं, तुम्ही या किंवा नका येऊ मी 24 डिसेंबरला रात्री निघतोय. सिडनीहून ब्रीसबेनला की मेलबर्न जायचं ते त्याच दिवशी सकाळी ठरवेल. आणि काय, पुढच्या दहा मिनिटात सगळ्यांचं कन्फर्मेशन आलं. सिडनी मेलबर्न रोडट्रीप करायचं ठरलं. सिडनीहून जाताना कोस्ट्रल वे आणि परत येतान इन लॅण्ड रूट असं ठरलं. माझी या रुटवरची पहिलीच ट्रीप त्यामुळे मी ही अगदी एक्सायटेड होतो. 24 डिसेंबरला दुपारी 3 वाजता एका रेल्वे स्टेशनजवळ भेटलो आम्ही चौघे. कारच्या बुटमध्ये सगळ्यांचं सामान कोंबल्यानंतर मला माझ्या कारची जरा कीवच आली. केवढं ते सामान? हे कमी होतं की काय, कारच्या आतमधेही खूप सारी स्नॅक्सची पाकिटं. पण त्यातही मजा होती. दोन चायनीज एक लीथुनियन आणि मी एक भारतीय असे आम्ही चौघे. त्यामुळे स्नॅक्सही चार वेगळ्या प्रकारचे. कारचा बुट फुल केला आणि निघालो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर कडक ऊन होतं. पण 110ची स्पीड, मोकळे रस्ते, स्नॅक्स, सुंदर गाणी यामुळे त्या उन्हाचं काहीच वाटत नव्हतं. जारव्हीस बे व्हाइट सॅण्ड बिचेससाठी प्रसिद्ध आहे. तिथून निघाल्यानंतर मेरू हेड कॅम्पिंग साइटवर कॅम्प करायचं ठरवलं. जीपीएस फॉलो करत हायवेवरून मेरू हेड नॅशनल पार्कवर जाण्यासाठी एका कच्च्या रस्त्यावर टर्न घेतला. थोडंसं घाबरल्यासारखं झालं कारण थोडासा अंधार पडलेला आणि तो कच्चा रस्ता अक्षरशर्‍ जंगलात जात होता. तेवढय़ात आमच्या मागे अजून एक कार आली. वुई हॅव अ कंपनी म्हणत आम्हाला थोडंसं हायसं वाटलं. दहा-पंधरा मिनिटांनी कॅम्प साइटवर पोहोचलो पाहतो तर काय पार्किग फुल. कॅम्पिंग स्लॉट मिळेल की नाही या धास्तीने मी माझ्या मित्रांना कारमधून उतरून लवकर शोध घ्यायला सांगितला. आपल्याकडे जसं बसच्या सीटवर हातरूमाल टाकून जागा पकडतो काहीसं तसंच. लकीली एकाने एक रिकामा असलेला कॅम्पिंग स्लॉट सुचवला. लगेच हातात टेण्ट घेतले आणि त्या स्लॉटवर पोहोचलो, जागा पकडली. बर्‍यापैकी अंधार झालेला. हेडटॉर्चेस ऑन केल्या आणि मस्ती सुरू झाली. एका मित्राने हातातील स्नॅक्सचे पॅकेट जवळच खाली ठेवलेले, कोणीतरी उचलतोय असं वाटले सगळ्यांनी तिकडे टॉर्च वळवल्या. एका मुंगसासारखा प्राणी तो पॅकेट लंपास करायच्या प्रयत्नात होता. टॉर्चच्या प्रकाराने त्याचे डोळे मांजरासारखे चमकत होते. प्राणी कुठला आहे कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही हिंमत करून त्याला हाकलून लावायचा प्रयत्न केला तर तो भराभर जवळच्या झाडावर चढला. तो आम्हाला घाबरतोय हे समजल्यावर आम्हाला तर सुपरमॅनसारखं वाटलं. तो प्राणी होता पॉसम. थोडावेळ शिवनापाणीचा खेळ त्याच्या सोबत खेळला. मेरू हेड म्हणजे समुद्राच्या किनार्‍यावर उंच टेकडीवर असलेली कॅम्पसाइट चांगला व्ह्यू असलेला वेगळा स्लॉट मिळतो का म्हणून मी एकटा निघालो. जंगल, चंद्रप्रकाश, पायवाट आणि हेडटॉर्च असलेला मी. काय रिलॅक्सिंग वाटत होतं. कसला तरी विचारात मी एकटा चालत होतो. तेवढय़ात एक सर्रùù. असा आवाज झाला. समोरचं दृश्य बघून चेहर्‍यावर मुंग्या आल्यासारखं झालं श्वास लांब झाला पायवाटेच्या मध्येच एक दोन वीत लांब काळा साप घुटमळत होता. रेड बेलीड ब्लॅक स्नेक इज वन ऑफ द मोस्ट पॉइझनस स्नेक इन ऑस्टेलिया हे आठवलं. घामच फुटला.  मी ऑलमोस्ट त्यावर पाय दिला होता.  प्रसंग अटळ होता. स्वतर्‍ला सावरलं आणि  शांत उभा राहिलो तो साप हळूहळू आपल्या मार्गाने निघाला मागून एक लहान मुलगा येत होता. त्याला मी सापाकडे बोट दाखवत सावध केलं.  तो सापाच्या बाजूने अगदी सहजपणे निघून गेला. साप पूर्ण दिसेनासा झाल्यावर मी निघालो. पण विचारात पडलो की, माझ्या मनात सापाची भीती निर्माण झालीच कशी, माझा आणि सापाचा कधीच संबंध आला नाही. कदाचित ती सेल्फ मेड होती किंवा इतर कोणी तरी माझ्या मनात निर्माण केली होती. नंतर कळलं की, अशा कितीतरी भीती माझ्या मनात आहेत, काहीही कारण नसताना, भीती ही कदाचित आयुष्यात काहीही महत्त्व नसलेली एक कल्पनाच आहे, किंवा आयुष्य आनंदाने जगण्याच्या मार्गातील एक ब्लॉकर आहे.त्या लहान मुलासारखं भीतीसह किंवा भीतीच नसलेलं जगणं, विश्वासानं जगणं किती छान ठरावं.