शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

ते तिघे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 08:00 IST

दिशा. निकिता. शांतनू. तिघे पर्यावरण कार्यकर्ते. दिशाला टुलकिट प्रकरणात अटक झाली तर निकिता आणि शांतनूच्या पोलीस शोधात आहेत. कोण हे तीन तरुण-तरुणी.

-कलिम अजीम

दिशा रवी. ती पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे.

बंगळुरूमधील अनेक पर्यावरण बचाव आंदोलनात ती सक्रिय होती. दोन-तीन वर्षापूर्वी झाडे वाचवा म्हणणाऱ्या मोहिमेतून एक तरुण चेहरा म्हणून पुढे आली. गेल्या चार-पाच वर्षांत स्थानिक पातळीवर तिने अनेक चळवळी राबवल्या. पर्यावरण या विषयात ती कामही करते.

बंगळुरूच्या ‘माऊंट कार्मेल कॉलेज’मधून तिनं शिक्षण घेतलं, नेमकं किती व कुठले शिक्षण झालं, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी. शेतकरी कुटुंबात वाढलेली. पर्यावरण, जलसंधारण व अन्य विषयावर तिने अनेक आजवर लेख लिहिले आहेत. वोग सारख्या प्रतिष्ठित मासिकाने तिचं व्यक्तीचित्रणं प्रसिध्द केलं होतं.

२०१८ पासून ती पर्यावरणसाठीच्या कामात सक्रिय आहे.

एक प्रामाणिक व कटिबद्ध संघटक म्हणून जनचळवळीत २२ वर्षांच्या दिशाची ओळख आहे. तिच्या सहकाऱ्याच्या मते तिने कधीही कायदा मोडला नाही किंवा कधीही असंविधानिक वर्तन केलेलं नाही.

“बेंगलुरू सिटिजन मॅटर्सला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, “आमचा ग्रूप म्हणजे आंदोलकांचा, घटनात्मक मार्गाने पर्यावरणावर काम करणारा गट आहे. दर रविवारी, शुक्रवारी शहरातील रस्त्यावर सिग्नलला उभे राहून लोकांना वृक्षारोपण व पर्यावरणासंबंधी जनजागृती करतो.”

‘फ्रायडे फॉर फ्यूचर इंडिया’ चीही तिनं स्थापना केली होती. ग्रेटा थनबर्ग ज्याचं नेतृत्व करते, तीच ही संस्था. २०१८ मध्ये ज्यावेळी ग्रेटा जगभरात चर्चेला आली त्यावेळी दिशा या कॅम्पेनची भारतीय कॉर्डिनेटर आहे.

पर्यावरण संदर्भात जनजागृती व भाषणे देण्यासाठी तिने परदेशवाऱ्या देखील केलेल्या आहेत. पर्यावरणावर काम करत असताना तिने मांसाहार सोडला. पूर्णपणे शाकाहारी झाली. मानवी अन्नासाठी प्राण्याची हत्या करणं तिला मान्य नाही. वनस्पतींपासून ‘वीगन दूध’ बनवणाऱ्या गुड मिल्क नावाच्या एका स्टार्ट अपमध्येही ती काम करते.

बंगळुरू शहरातील रस्ता रुंदीकरणात झाडे कापण्यात येणार होती. ही झाडे कापू नये, अशी जाहीर भूमिका घेतली होती. पर्यावरण याच विषयात दिशा गेली दोन वर्षे काम करत होती.

फ्रायडे फॉर फ्यूचर या संघटनेने केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये जारी केलेल्या इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, (EIA) अधिसूचनेला विरोध दर्शवत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना मेल पाठवली होती. त्यानंतर जुलै 2020मध्ये सरकारने फ्रायडे फॉर फ्यूचर वेबसाईला ब्लॉक करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले होते

.............

निकिता जेकब.

मुंबई हायकोर्ट प्रॅक्टिस करणारी वकील. मुंबईतील एका ख्रिश्चन कुटुंबात ती जन्मली. राजकीयदृष्ट्या सजग व तडफदार असं तिचं व्यक्तिमत्त्व. ३० वर्षीय निकिताने २०१४ साली पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केली.

सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या तिच्या ट्विटर अकाऊंटच्या स्क्रीन शॉटवरून कळतं की, पर्यावरण चळवळीत तिला रस आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी ती संबंधित नाही, असंही तिनं स्वत:विषयी लिहिलेलं आहे. कोर्टात फक्त नागरी प्रकरणं ती हाताळते. कोर्टातील तिच्या सहकाऱ्यांच्या मते पर्यावरण संदर्भात ती मात्र अधिक सजग असते.

निकिता सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण प्रकरणी आवाज उठवणारी कार्यकर्ती आहे. लेखिका आणि गायक म्हणून ही ती स्वत:ची ओळख सांगते. फोटोग्राफी व कुकिंग तिचे छंद आहेत असंही कळतं.

एका कायदाविषयक फर्मसोबत ती काम करते. ही फर्म मुंबई हायकोर्टात नागरी व दिवाणी दावे स्वीकारण्याचे काम करते. दिल्ली पोलिसांनी दावा केलेला आहे की, ती आम आदमी पक्षाशी संबंधित आहे. परंतु पक्षाच्या मुंबई प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी आपशी तिचा कुठलाही संबंध नसल्याचे जाहीर केले.

 

दिल्ली सायबर सेलने निकिताचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले आहेत. निकिताचे नातेवाईक व मित्रांच्या मते तिने काही दिवसापूर्वी तक्रार केली होती, तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलचा ट्रोलर्सकडून गैरवापर केला जात आहे. आता दिल्ली पोलिसांना बहुचर्चित टुलकिट प्रकरणात ती वाॅन्टेड आहे, पोलिसांच्या मते तीही टुलकिटची एडिटर आहे.

.....................

शांतनू मुळूक

 

दिल्ली पोलिसांचा दावा आहे की, बीडचा शांतनू मुळूक हा देखील टुलकिटचा एक एडिटर आहे. शांतनू हा उच्चशिक्षित तरुण आहे. बीडमधील एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे. त्यानं बी. ई. मॅकेनिक केलं आहे. अमेरिकेत एमएसची पदवीही त्यानं घेतली आहे.

अमेरिकेत असताना तो नोकरी करत होता. दोन वर्षापूर्वी भारतात परतला होता. त्याला ओळखणाऱ्या बीडच्या काही मित्रांच्या मते इथे आल्यानंतर त्याने इन्व्हायरमेंट सायन्सचं शिक्षण घेतलं. औरंगाबादमध्ये एका कंपनीत काही दिवस नोकरी केल्यानंतर तो पुण्यात आला. बीड शहरात राजकीय वर्तुळात त्यांचा वावर आहे. त्याच्या वडिलांच्या मते शांतनू पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट आहेत. शहरातील डोंगर, वृक्ष तोडीच्या विरोधात तो होता. शेतकरी आंदोलनाला त्याने पाठिंबा दिला होता.

दिल्ली पोलिसांच्या मते शांतनू पुण्यात राहतो. पोलिसांचा दावा आहे की, तो पुण्यातील एसआर चॅप्टर संघटनेत कार्यरत आहे. केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणासंदर्भात तो नाराज होता. शेतकरी आत्महत्या हा त्याच्या चिंतेचा विषय.पर्यावरण संबंधी अनेक संघटनांमध्ये त्याच्या मताला मान आहे.

टुलकिट प्रकरणात दिल्ली पोलीस शांतनूच्या शोधात आहेत.

( कलिम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com