शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही

- किरण पवार

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही. आणि घेतला तरी आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येत नाही. या विषयावर चित्रपट तयार झाले पण त्यामध्ये मुळ कारणं बाजुलाच राहिली.विद्यार्थी का आत्महत्या करतात याची कारणं मी मांडू शकत नाही पण एक महत्वाचं कारण मला यामागे दिसतं. ते म्हणजे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. निर्णय घेता येत नाहीत किंवा घेतलेच जात नाही. त्यात मानसिक शिण बराच येतो. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण कराल तर अशी मुलं नेहमी दडपणात जगत असतात. सतत त्यांच्या मनात काही ना काही विचार सुरूच असतात. अशा मुलांना पालकांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेवू द्यायला हवेत. त्यांच्यावर आपला निर्णय लादण्याची घाई करू नये. किंवा त्यांना सतत दुसऱ्या मोठ्या, यशस्वी मुलांची उदाहरणं दिली जातात ती थांबवली पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते यशस्वी झालेले असतात कारण त्यांनी त्यांच्या करिअरचे निर्णय स्वत: घेतलेले असतात. पालक सतत तुलनाच करत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते डिप्रेशनच्या गर्तेत फेकले जातात.