शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमची प्रेरणा कोणती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 08:32 IST

तुम्ही एखादं काम भीतीपोटी करता की आनंदाने? काय जमलं नाही हे सांगता, की काय जमलं हे तपासता?

- चिन्मय लेले

अमुकतमुक माझी प्रेरणा आहे, ढमुक गोष्टीमुळे मला प्रेरणा मिळाली ही वाक्यं आपण किती सहज म्हणतो. पण खरंच अशी काही बाह्य प्रेरणा असते की आपण आपल्याच अंतस्थ प्रेरणांमुळेच आयुष्यात पुढं पुढं सरकत असतो आणि रोजच्या जगण्यात अशा प्रेरणा काम करतात. फक्त त्या आपल्याला ओळखता आल्या तर आपल्या जगण्याचं सुकाणू आपल्या हातात राहतं. तेच कळत नाही म्हणून आपण जे ठरवतो ते होतं किंवा होत नाही.असं सांगणारा एक अभ्यास आहे. अमेरिकेतील विनिपेग विद्यापीठातल्या ओलिया बुलर्ड यांनी केलेला. त्या म्हणतात, माणसाच्या मेंदूत दोन प्रकारच्या प्रेरणात्मक व्यवस्था कार्यान्वित असतात. पहिली असते तिला म्हणायचं प्रोत्साहनपर यंत्रणा. ही यंत्रणा आपल्याला मिळालं काय, मिळवलं काय याच्या जोरावर माणसाला पुढं पुढं जायला मदत करते. दुसरी असते प्रतिबंधात्मक यंत्रणा. जी माणसाला सतत शिक्षेची भीती दाखवते. म्हणजे काय तर सतत आपलं काय नुकसान होईल या धास्तीत जगवते. दोन्हीही यंत्रणा माणसाला कामालाच लावतात. मात्र जो यशस्वी होतो, ज्याची स्वप्नं आणि लक्ष्य पूर्ण होतात त्या माणसांच्या शिक्षेपेक्षा बक्षीसाधारित प्रेरणाच अधिक प्रबळ असतात. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षा होईल या भीतीनं काम न करता, आपल्याला जमेल, जमतेय या इच्छेनं काम केलं तरच यशाचे टप्पे जास्त पटकन दिसतात.हा अभ्यास प्रेरणांचा हा प्रकार जास्त सोप्या भाषेत उलगडून सांगतो.एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या टीमला एक लाख वस्तू विकायच्या आहेत. आणि त्यांच्या बॉसने रोज आरडाओरडा केला की, किती हळू काम करता, ही एवढी विक्री झाली नाही तर नोकरीवरून काढून टाकीन. तर लोक विक्री वाढवतात, प्रयत्न करतात, पण त्यांच्या मनात नोकरी जाण्याची धास्ती असते; आपलं लक्ष्य गाठण्याची, टार्गेट पूर्ण करण्याची आनंदी भावना नसते.त्याउलट एखादा बॉस म्हणतो की, आपण शून्यातून सुरू केलं, हळू प्रगती करतोय पण आठ दिवसांत पाच हजार वस्तू विकल्या म्हणजे जमेल आपल्याला. प्रयत्न करा. तर आपण काहीतरी केलं, मिळवलं याचा आनंद टीमला होतो आणि ते अधिक जिद्दीनं लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करतात.मुद्दा काय, परिस्थिती तीच पण आपली प्रेरणा काय यावर आपला काम करण्याचा आनंद आणि त्यानंतरचा निकाल अवलंबून ठरतो. भीतीपोटीही काम होतंच, पण त्यात आनंद नसतो तर राग किंवा चीड असते. या नकारात्मक भावनांसह जगणं जास्त क्लिष्ट होतं.हा अभ्यास म्हणतो की, आपली प्रेरणा अशी प्रोत्साहनस्नेही आहे की भितरी हे समजलं तर ती बदलूनही घेता येते. आपण आपल्या प्रेरणांना सकारात्मक आयाम दिला तर आपली ध्येयप्राप्ती सहज आणि आनंददायी होऊ शकते. त्याला बुलर्ड मोटिव्हेशनल अ‍ॅप्रोच म्हणतात. तो योग्य असेल तर गोष्टी सोप्या हातात.त्यासाठी करायचं काय?त्यावर एक छोटा उपाय म्हणजे, पुढे नाही तर मागे पाहायचं.म्हणजे काय तर?उदाहरणार्थ आपण १० किलोमीटर चालत निघालोय तर आपण सतत अजून ८ किलोमीटर राहिले, मला काही वेगच नाही असं म्हणून चालणार?की, माझा वेग कमी आहे तरी मी दोन किलोमीटर चालत आलो. मस्त वाटतंय असं म्हणणार?दुसऱ्या टप्प्यातल्या प्रेरणेत तुम्ही स्वत:ला प्रोत्साहन देता आणि पुढे ८ किलोमीटर सोपे होतात.तेच करायचं. आपण ज्या शून्यातून सुरुवात केली, त्याकडे पाहिलं तर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ती सकारात्मक प्रेरणा.ठरवायचं आपण, आपल्याला आनंद हवा की भीती?