शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तुम्ही कसले अँडिक्ट?

By admin | Updated: June 19, 2014 21:45 IST

आजाराचं नीट निदान झालं तरच योग्य उपचार करता येतात, तोच विचार याही व्यसनासंदर्भात करायला हवा. म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्यायला हवं की आपण नक्की कशाचे अँडिक्ट झालो आहोत.

कबूल करून टाकू की आपल्याला तलब लागतेच, पण ती तलब नक्की कसली असते हे समजून घेणंही फार गरजेचं आहे. आजाराचं नीट निदान झालं तरच योग्य उपचार करता येतात, तोच विचार याही व्यसनासंदर्भात करायला हवा. म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्यायला हवं की आपण नक्की कशाचे अँडिक्ट झालो आहोत.
------------------
1) सायबर सेक्शुअल अँडिक्शन
‘सायबर सेक्स’ किंवा ‘व्हच्यरुअल सेक्स’ हे शब्द कदाचित तुमच्या कानावरून गेलेही नसतील. पण अनेक मुलांना (मुलींना तुलनेनं कमी) या प्रकारचं अँडिक्शन असतं. पोर्नोग्राफिक साईट्स तासन्तास पाहणं, ‘तसले’ व्हिडीओ पाहत राहणं, ते शेअर-फॉरवर्ड करणं, ईल जोक्स शेअर करणं, ते पुन्हा पुन्हा वाचणं हे सारं या ‘सायबर सेक्शुअल अँडिक्शन’ या प्रकारात मोडतं.  रोजच्या आयुष्यात अत्यंत सरळ-सभ्य दिसणारी व्यक्ती ऑनलाइन असताना तासन्तास हे सारं ‘पाहत’ असते. ते पाहण्याची इतकी चटक लागते की, नेट जरा स्लो झालं तरी अनेक जण पॅनिक होतात. विशेष म्हणजे ते पाहताना आपल्याला कुणाचा त्रास नको म्हणून एकलकोंडेही होत जातात.
 
२) सायबर रिलेशनल अँडिक्शन
याला कौतुक क्लब असंही म्हणता येईल. सतत फेसबुक-व्हॉट्स अँपवर रहायचं. आपले फोटो टाकायचे, ते इतरांनी लाईक करावेत म्हणून आपण त्यांचे लाईक करायचे. थोडंस फ्लर्ट केल्यासारखं सतत बोलत रहायचं. परस्परांचं कौतुक करायचं. त्यातून जी कौतुक करून घ्यायची हौस भागते त्या हौसेतून हे सायबल रिलेशनल अँडिक्शन तयार होतं. आजूबाजूचे लोक काही सतत आपल्या आरत्या करत नाहीत, मग स्वत:ची आरती करून घ्यायची हौस भागवत अनेक जण हे नेटवर चॅटिंगचा आधार घेतात. त्यातून त्यांचा इगो सुखावतो आणि मग प्रत्यक्ष नात्यापेक्षा हे असं व्हच्यरुअल नातं जास्त जवळचं वाटू लागतं.
 
३) गेम अँडिक्शन
हातात स्मार्टफोन आल्यामुळे तर हे अँडिक्शन अधिकच वाढलेलं आहे. ऑनलाइन किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळणारे अनेक जण आता आपल्या मोबाइलवरच तासन्तास गेम खेळतात. इतके त्यात हरवून जातात की आपण कुणाबरोबर जेवायला आलोय, घरात पाहुणे आलेत, आपला अभ्यास आहे, कुणाचं लग्न-समारंभ आहे याचंही त्यांना भान उरत नाही. ते आणि त्यांचे गेम, बाकी जगच संपतं.
 
४) अँप अँडिक्शन
दिवसाकाठी किमान ६0 वेळा तरी अनेक जण आपल्या फोनमधले अनेक अँप्स उघडतात, बंद करतात. ज्यांना हे अँडिक्शन कमी आहे तेसुद्धा सरासरी १0 वेळा आपले अँप्स चेक करतात. बराच वेळ आपल्या अँप्सवर एकही नोटिफिकेशन आलं नाही तर अस्वस्थ होत चिडचिड करणारे अनेक जण आहेत.
 
५) इन्फॉर्मेशन अँडिक्ट
हा गट जरा वेगळाच. त्यांना वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे, आपण प्रत्येक विषयात बोललंच पाहिजे. मत नोंदवलं पाहिजे. अगदी देशाच्या पंतप्रधानाला धारेवर धरण्यापासून ते जातीधर्म, समाज, फॅशन, नाते या सगळ्यावर आपण बोललंच पाहिजे. जगाला ज्ञान दिलं पाहिजे. कारण आपण ‘बेस्ट’ आहोत. स्वत:च्या इगोला असं बटर लावून घेण्यासाठी अनेक जण ऑनलाइन मत मांडत राहतात. त्याचं त्यांना इतकं व्यसन लागतं की नेटचा अँक्सेस नसलेल्या जगात ते पाय ठेवायलाही तयार नसतात.
 
हे व्यसन की व्याधी?
इंटरनेट अँडिक्शनला व्यसन म्हणायचं की मानसिक व्याधी हा सध्या जगभरातल्या तज्ज्ञांत वादाचा विषय आहे. आजवरचे अभ्यास असं सांगतात की, ज्या मुलांचं लक्ष एकाग्र होत नाही, मन थार्‍यावर राहत नाही, ज्यांना मुळातच काही काम करण्याची इच्छा नसते, अनेक जण डिप्रेशनमध्ये असतात, एकेकटे असतात, आत्मविश्‍वासाचा अभाव, लाजाळूपणा आणि त्यातून येणारं लेफ्ट आऊट फिलिंग असे बरेच प्रॉब्लेम्स असतात ते लवकर इंटरनेट अँडिक्ट होतात.
मात्र काही तज्ज्ञ असंही म्हणतात की, इंटरनेटच्या जास्त आहारी गेल्यामुळेच अनेक जणांमध्ये हे सगळे प्रॉब्लम्स मोठय़ा प्रमाणात निर्माण होत जातात. चिडचिड वाढते, लक्ष लागत नाही आणि त्यातून त्यांचा परफॉर्मन्स घसरतो.
विशेषत: पुरुषांमध्ये या अँडिक्शनचं प्रमाण जास्त असतं असं अनेक अभ्यास सांगतात. मात्र  आशियाई देशात पुरुषांपेक्षा महिलांचं नेट अँडिक्शनचं प्रमाण जास्त आहे. इतकी वर्षं मुस्कटदाबी सहन करणार्‍या, घरात बोलायची सोय नसलेल्या बायका फेसबुकावर अधिक मोकळ्या होत असाव्यात आणि त्यातून हे व्यसन बळावत असावं, असाही एक अंदाज आहे.
 
इंटरनेट अँडिक्शन म्हणजे काय?
मानसोपचार तज्ज्ञ इव्हॅन गोल्डबर्ग यांनी ‘इंटरनेट अँडिक्शन’ हा शब्द सर्वप्रथम वापरला, ही फ्रेज सर्वात आधी वापरत या आजाराची पहिली निरक्षणंही त्यांनीच नोंदवली. इंटरनेट अनेक माणसांच्या आयुष्यात जादूची कांडी घेऊन आली. ‘कनेक्टिव्हिटी’ आल्यानं जगण्याला आकांक्षांचे पंख लाभले. प्रत्यक्षात मात्र काही माणसं इंटरनेटच्या इतकी प्रेमात पडली की स्वत:लाच हरवून बसली. इंटरनेटवर माहिती वाचण्यापासून सुरुवात झालेला हा प्रवास आता स्वत:ची माहिती शेअर करण्यापर्यंत येऊन पोहचला. त्या प्रवासात इंटरनेट शाप की वरदान हा विषयच बाजूला पडला आणि गरज जीव की प्राण कधी बनत गेली हेच लक्षात येईनासं झालं. इंटरनेटवरची डिपेण्डन्सी वाढू लागली. नेट कनेक्टच झालं नाही किंवा जरासं जरी स्लो झालं तरी भली माणसं एकदम हायपर होऊ लागली. त्यांचा पारा चढू लागला. व्यसनी माणसाला त्याचं व्यसन हवं त्या वेळेस मिळालं नाही की तो जितका अस्वस्थ होतो तितकाच आणि तसेच ही माणसं वागू लागली. आणि हे सारं म्हणजे इंटरनेट अँडिक्शन ठरू लागलं.
जोपर्यंत इंटरनेट केवळ कॉम्प्युटरवर मिळत होतं तोपर्यंत तरी आयुष्य सोपं होतं, पण आता जसे मोबाइलवर नेटचे पॅक मारले जाऊ लागले तसतसे तर अँडिक्शन जास्तच वाढले. नेट अँडिक्शन, सेलफोन अँडिक्शन बनलं आणि या सगळ्यात प्रत्यक्ष जगण्याची रीतच बदलून जाऊ लागली.
 
विकसनशील देशांना धोका जास्त
विकसित देशांचा हा प्रश्न, आपल्याला कशाला हवी चिंता असं म्हणून आपण या नव्या व्यसनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जगभरात सध्या सुरू असलेले अभ्यास कारण सध्या एक वेगळंच वास्तव सांगत आहेत. या नव्या व्यसनांचा धोका वेगानं विकसित होत असलेल्या आशियाई देशांनाच जास्त आहे. दक्षिण कोरिया आणि चीन या देशात तर आजच हा प्रश्न राष्ट्रीय चिंतेचा विषय बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात दक्षिण कोरिया सायबर कॅफेमध्ये १0 तरुण मुलांचा हार्ट अँटॅकने मृत्यू झाला. व्हिडीओ गेम खेळताना उचकावल्यानं गॅंगवॉर भडकल्यासारख्या मारामार्‍या झाल्या आणि त्यातून काही खून पडले अशाही बातम्या आहेत. चीन सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये दर सहा किशोरवयीन मुलांमागे एक मुलगा इंटरनेट अँडिक्ट आहे. या मुलांमध्ये आत्मविश्‍वासाचा अभाव तर आहेच पण त्यातून ही मुलं बेरोजगारीच्या दिशेनं जात आहेत, असंही चिनी सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याचं म्हणणं आहे.
 
टेक अँडिक्शन म्हणजे काय?
टेक्नॉलॉजीचं व्यसन कुणाला कसं काय लागू शकतं? असं आपल्याला वाटत असलं तरी आज जगभरात हा अत्यंत काळजीचा विषय आहे. प्रगत देशात (विशेषत: अमेरिकेत) मोठय़ा प्रमाणात टेक्नॉलॉजी डी-अँडिक्शन सेंटर्स उभी राहत आहेत.
अमेरिकेतले ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. डेव्हिड गारफिल्ड यांनी ‘द सेंटर फॉर इंटरनेट अँण्ड टेक्नॉलॉजी अँडिक्शन’ नावाचं एक विशेष केंद्रच सुरू केलं आहे. विशेष म्हणजे अनेक ‘गंभीर’ पेशंटसाठी त्यांना ‘इण्टेसिव्ह केअर युनिट’ सुरू करत अतिजलद उपचार करावे लागत आहेत.
कुठल्याही टेक्नॉलॉजीची पराकोटीची आवश्यकता भासणं, अन्नपाण्या इतकंच तंत्रज्ञान, त्यासाठीची गॅजेट्स महत्त्वाची होणं आणि ती मिळाली नाहीतर जीवाची भयंकर तकतक होऊन टोकाचं वर्तन करणं हे सारं म्हणजे टेक्नॉलॉजी अर्थात टेक अँडिक्शन. जसं दारुड्या माणसाला दारू न मिळाल्यास तो हैराण होतो, तडफडतो तसंच हे. ज्याला ‘डिपेण्डन्सी’ म्हणतात, ती डिपेण्डन्सी वाढत गेली की माणसाचं स्वत:वरचं नियंत्रण सुटत जातं. तेच आज अनेकांचं तंत्रज्ञानाच्या बाबतीत होताना दिसतं आहे.’
 
डोपामाईन नावाचा केमिकल लोचा
कॉम्प्युटर किंवा मोबाइल फोनचा अतिवापर केला की आपल्या मेंदूत डोपामाईन नावाच्या एका केमिकलचा स्त्राव जास्त होतो. कुठल्याही गोष्टीची सवय लागण्यासाठी, ती वारंवार वापरण्यासाठी या रसायनाचा उपयोग तर होतोच; पण वारंवार वापर वाढला की हे या रसायनाचे स्त्रावही वाढतात. कोकेन किंवा दारू पिणार्‍यांच्या संदर्भात हेच घडते, त्यांच्या मेंदूत डोपामाईनचे स्त्राव जास्त प्रमाणात स्त्रवतात. हेच सारं इंटरनेट, कॉम्प्युटर किंवा सेलफोनच्या अतिवापराच्या संदर्भातही घडतं. आणि मग या गोष्टी मिळाल्या नाही की मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटतो.