शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

१० विकेट मिळवत द्रवीड गुरुजींच्या शाळेत जाणारा कोण हा मणिपुरी रेक्स?

By meghana.dhoke | Updated: February 19, 2019 12:07 IST

भारतीयत्वाची ओळख सांगणार्‍या क्रिकेटनं अखेर मणिपुरपर्यंत मजल मारली आणि मणिपूरला आपला पहिला क्रिकेट पोस्टर बॉय मिळाला. रेक्स राजकुमार सिंग. एका ट्रक ड्रायव्हरचा हा मुलगा. तो आता भारतीय संघाचं दार ठोठावतोय. क्रिकेटची ही यशोगाथा मणिपूर ला भारताशी जोडणारी क्रिकेटपलीकडची गोष्ट सांगतेय..

ठळक मुद्देकर्फ्यू- बंद आणि बॉम्बस्फोटाने पोळलेल्या मणिपूरमध्ये जन्माला आलेला क्रिकेट स्टार!

- मेघना ढोके

इम्फाळ. जेमतेम दुपारचे 2 वाजले तरी अनेकदा सूर्य हाफ-डे घेऊन लवकर निघाल्यासारखा अंधार दाटून येतो.तसा ईशान्य भारतात  हा अनुभव नेहमीचा.पहाटे 4 वाजत नाही तोच सूर्य महाराज जागे होऊन कोंबडे आरवायला लागतात आणि दुपारी 3 वाजता वाजता संध्याकाळ रांगायला लागते.एकदा इम्फाळला हॉटेलात चेक इन करून बाहेर पडले तोर्पयत सगळी सामसूम झाली होती. पाऊसही शिंतडून गेल्यानं हवेत गारठा वाढला होता. अंधार जरा जास्तच गडद झाला होता. तेवढय़ात कानावर एकच गलका पडला. आपण एखाद्या स्टेडियममध्ये उभे आहोत असं वाटावं इतका गोंगाट.आवाजाच्या दिशेनं चार पावलं पुढं टाकायला सुरुवात केली तसा विमानतळावरून हॉटेलर्पयत घेऊन आलेला ड्रायव्हरपाठोपाठ चालू लागला. थोडं पुढं गेलं तर डेडएण्ड. एक तीन मजली कळकट, रंग उडालेली इमारत पाठमोरी उभी. मी विचारलं, ‘ये शोर कैसा, यहाँ स्कूल है.?’तो म्हणाला, ‘नहीं किसी जमाने में ये इम्फाल का सबसे बडा सिनेमाघर था, जब से ¨हदी पिक्चर लगना बंद हो गया, ये बंद ही पडा है. अब यहाँ बच्चे फुटबॉल खेलते है. लेकीन कुछ दिन में ये जगह भी नहीं रहेगी. सुना है ये हॉल तोडकर यहाँ कुछ शो¨पग मोल होनेवाला है.!’थिएटरच्या जागी शॉ¨पग मॉल.?मल्टिप्लेक्सचं कल्चर झिरपत इम्फाळर्पयत पोहचलं असं वाटलं क्षणभर. पण ते तेवढंच.कारण त्या सिनेमाघराच्या वास्तूतून सिनेमा कधीच हद्दपार झाला होता, आता बांधले जाणार होते फक्त कोरडय़ा व्यवहाराचे शॉम्पिंग कॉम्प्लेक्स.‘‘तो पिक्चरे.? वो कोई नहीं देखता.?’ - मी न राहवून विचारलंच तर ड्रायव्हरच्या ओळखीचा शेजारी उभा तरुण चटकन म्हणाला, ‘यहाँ जिंदगी का भरोसा नहीं, और क्या पिक्चर देखना.?’इम्फाळमधल्या अन्य कामांच्या गडबडीत हा सिनेमा आणि मनोरंजनाचा विषय तसा मागेच पडला. पण रोज उठून एक प्रश्न मात्र छळत होता.कशी जगत असतील इथली माणसं.?सकाळी भल्या पहाटे उजाडतं; पण हाताला काम नाही. संध्याकाळी 5 वाजत नाही तोच सगळं चिडीचूप. काळोख. मणिपुरात इलेक्ट्रिसिटी नावाची गोष्ट गेली काही वर्षे हरवली आहे. त्यामुळे घरात ना उजेड असतो ना मनोरंजनासाठी शंभर चॅनलचा टीव्ही. त्यात रस्त्यावर चोवीस तास सैन्याचा कडा पहारा. सैन्याला स्पेशल अधिकार, अर्थात अ‍ॅफस्पा म्हणजेच विशेष अधिकार कायदा. कुणालाही चौकशीसाठी कधीही उचलण्याची आणि दिसताक्षणी गोळी घालण्याची ताकद हा कायदा सामान्य  जवानाच्या बंदुकीला देतो. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि मणिपूर एकसंध ठेवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे असं केंद्रासह सैन्याचंही मत. मणिपुरात दहशतवादी संघटना सरकारच्याच नाही तर एकमेकांच्या विरोधातही ‘बंद’ पुकारत असतात. सतत स्फोट, सतत कारवाया. त्यांना काबू करायचं तर हा कायदा हवाच असं एक मत. सैन्याचे कोम्बिंग ऑपरेशन सतत सुरू असते. गेली अनेक वर्षे मणिपूर ‘डिस्टर्ब एरिया स्टेट्स’ घेऊन चोवीस तास सैन्याच्या पहार्‍यात जगते आहे. शहर-गावंच काय; पण एकूण एक पहाड, पहाडातली खेडी-वस्ती तिथंही सैन्य उभं. सामान्य माणूस काहीही करो, संशयाची बंदूक रोखलेलीच.इथं एकदा बंद पुकारला गेला की सगळी माणसं घरात चिडीचूप बसतात. घराबाहेर पडायचीच सोय नाही. कामावर जाण्याची परवानगीच नाही. फारतर मेडिकल स्टोअर्स शटर अर्धी करून उघडी, बाकी सगळं बंद. चिमणी कोकलून गेली तरी काही मिळू नये इतका सन्नाटा. टीव्ही-मनोरंजन-खेळ काहीच करायची सोय नाही. त्यात वीज नाही, दिवस लहान. आणि बंद किती दिवस चालेल याची काही खात्री नाही. त्यात निसर्ग निष्ठुर, थंडी अशी की हाडं गोठून जावीत, पाऊस पडतोच मिट्ट काळोख करून. त्यात पहाडात चालायला धड रस्ते नाहीत, पहाडंच कशाला इम्फाळ नावाचं राज्याच्या राजधानीचं शहरसुद्धा आपल्या एखाद्या तालुक्याच्या गावाहून लहानखुरं दिसतं. रस्ते नाहीत, आहेत तिथे खड्डे आणि उठणारे धुळीचे लोट.अशा वातावरणात जगण्याची इच्छाच उरू नये. ती नाहीच उरत. म्हणून तर अनेक तरुण-तरुणी ड्रग जवळ करतात. अत्यंत स्वस्तात मिळणार्‍या कोकेनचा 50 रुपयाचा एक ‘पीस’ म्हणजेच चिमूटभर कोकेन सिरींजने शिरेद्वारे टोचून घेतात शरीरात. त्या नशेत पडून राहतात दिवसभर. त्यातून एचआयव्ही शरीरात शिरतो आणि पोखरून टाकतो सगळं तारुण्य. नशा आणि एचआयव्हीच्या विषाणूंनी आज मणिपुरातलं तारुण्यच धोक्यात आलंय.अशा वातावरणातून एक आनंदाची बातमी येते... खरंच असं काही मणिपूरमध्ये घडू शकतं?***मणिपूरचा रेक्स राजकुमार सिंग हा 18 वर्षाचा तरुण सध्या चर्चेत आहे. त्याची अण्डर 19 भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. तसं या बातमीत फार काही विशेष आता नाही; पण मणिपूरचा एक तरुण, तोही क्रिकेट खेळतो आणि अण्डर 19 म्हणजे पुढे जाऊन थेट भारतीय क्रिकेट संघात आपली दावेदारी सांगतो हे नवीन आहे. नव्हे आश्चर्य आहे.कारण मणिपूर तसं फुटबॉलवेडं. दिवस दिवस बंद पुकारलेला असतानाही मणिपुरी तरुण फक्त फुटबॉल खेळताना दिसतात. फुटबॉल आणि म्युझिक यासह कोरिअन सिनेमाचं वेड मोठं. तिथला एक तरुण थेट क्रिकेट संघात पोहचतो हे खर्‍या अर्थानं क्रिकेटचं लोकशाहीकरण आहे.भारतीयत्वाची ओळख सांगणार्‍या क्रिकेटनं अखेर मणिपुरपर्यंत  मजला मारली आणि मणिपूरला आपला पहिला क्रिकेटटिंग पोस्टर बॉय मिळाला.रेक्स राजकुमार सिंग.

****

रेक्स राजकुमार सिंग.

इम्फाळपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सगोलबंद मोइरांग हनुबा नावाच्या गावातला हा तरुण. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर. आई, एक भाऊ, एक बहीण असं त्यांचं पाच माणसांचं कुटुंब. मुलानं काहीतरी खेळावं, त्यात नाव काढावं असं वडिलांना वाटायचं. म्हणून सुरुवातीला हा मुलगा तायक्वांदो खेळत होता. मणिपुरात फुटबॉल तर सगळीच मुलं खेळतात तसा तोही खेळायचा. सुसाट पळायचा. त्याच्या घराजवळ एक छोटं मैदान आहे. तिथं तो टेनिस बॉलनं क्रिकेट खेळायला लागला. त्यादरम्यान रोहिंद्रोसिंग यांनी त्याला पाहिलं आणि क्रिकेटकडे वळवलं. ते सांगतात, आमचं वातावरण तसं स्विंगसाठी पोषक, त्यात हा मुलगा क्विक बॉलिंग करायचा. मग मी ठरवलं, याच्यावर काम करायचं. ते सुरू झालं. रेक्सही शिस्तीत जगणारा होता. वडिलांना हा खेळ आपल्याला नि भावाला खेळू देणं परवडत नाही याची जाणीव रेक्सला होतीच. त्याचा भाऊ निशीही अण्डर 16 बॉलर म्हणून मणिपूरसाठी खेळतो. मात्र कोच रो¨हद्रो आणि शिवसुंदर साद यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर रेक्स बराच वेगात पुढं निघाला. एनसीए म्हणजेच बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत गेल्यावर तर त्यानं स्वतर्‍सह डाएट, बॉलिंग अ‍ॅक्शनवर बरंच काम केलं. तिथं बॉलर बलविंदरसिंग संधूनं त्याला खूप मार्गदर्शन केलं. तिथं तो तयार झाला.आणि आता कुचबिहार स्पर्धेत अरुणाचल विरुद्ध खेळताना त्यानं 10च्या 10 विकेट घेण्याचा विक्रम करून दाखवला. मग माध्यमांनी कान टवकारले की का कोण मणिपुरी मुलगा. त्याच्या स्विंगची ही कसली कमाल?तसं पाहता हा मणिपूरसाठीही एक मोठा स्विंग करणाराच बदल आहे. ज्या राज्याची बंद, जाळपोळ, बॉम्बस्फोट, ड्रग अ‍ॅडिक्शन याचीच कायम नॅशनल मीडियात चर्चा, तिथला एक तरुण क्रिकेटीअर बातमीचा विषय ठरतो..या कामगिरीनंतर अपेक्षेप्रमाणे रेक्सची अण्डर 19 भारतीय संघात निवड झाली. त्याला ही बातमी कळली तेव्हा तो घरीच होता.मणिपुरात नागरिकत्व बिलावरून चाललेल्या गदारोळात कफ्यरु लावण्यात आलेला होता. इकडे कफ्यरु उठला तिकडे त्याच्यार्पयत निवड झाल्याची बातमी पोहचली.दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध चार सामन्यांसाठी त्याची निवड झाली, येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या सामन्यांत खेळणारात तो पहिलाच मणिपुरी.आता तो राहुल द्रवीड गुरुजींच्या शाळेत दाखल झालाय.काय सांगावं, भारतासाठी खेळणारा पहिलाच मणिपुरी म्हणून काही दिवसांनी भेटेलही तो आपल्याला.***रेक्स सांगतो.‘‘वडील म्हणाले खेळ. त्यांनी कधी पैसा कमी पडू दिला नाही. पण आपली परिस्थिती नाही याची जाणीव कायम होती. त्यात आमच्याकडे पाऊस कधीही पडतो. इनडोअर स्टेडिअम नाही. मात्र तरीही खेळायचं हे मनात होतंच. मग खेळत राहिलो. शिकत राहिलो. खूप जणांनी मदत केली. जेम्स अण्डरसन माझा फेवरिट त्याची बॉलिंग यू टय़ूबवर पहायचो. स्वपA आहेच मोठं, खेळायचं देशासाठी, फेमस व्हायचं!’’ 

***

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com