शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

भिंग स्वत:वर कधी रोखणार?

By admin | Updated: February 22, 2017 15:02 IST

इतर लोक, मित्र-मैत्रिणी आपल्या लूक्सबद्दल काय म्हणतात याचं किती बर्डन घेऊन आपण फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली.

इतर लोक, मित्र-मैत्रिणी आपल्या लूक्सबद्दल काय म्हणतात याचं किती बर्डन घेऊन आपण फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मतं वाहणारी! आपलं आपल्याविषयी काही मत असतं की नाही? 

 

मी दिसायला चांगला नाही.मी बुटकी आहे. तो गोरा आहे. ही कसली मस्त सावळी आहे. नाहीतर मी पांढरीफटक.तिच्याकडे फॅशन करायला पैसे आहेत. माझ्याकडे नाहीत. मी पण पार्लरला गेलंच पाहिजे. मित्राने हेअर स्टाइलवर किती पैसे खर्च केले. मला पण अशीच हेअर स्टाइल पाहिजे. माझं वजन खूपच कमी आहे. तो किती लठ्ठ आहे. मला हे कपडे सूट होतात का? माझ्याच चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. रंग, उंची, वजन, पैसे, कपडेलत्ते.... आपलं भिंग कायम दुसऱ्याकडे काय बरं आहे आणि त्यात काय खोट काढता येते, यावरच रोखून धरलेलं असतं. त्यामुळे, दुसऱ्याचं सुख आहे त्यापेक्षा मोठं होऊन आपल्यावर आदळतं. त्यात आपण दुरून ते बघत असतो. ज्याला आपण दुसरा सुखात आहे असं म्हणतोय ते खरंच तसं नसूही शकतं. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचं आहे की काय? समजा केलं, तर उपयोग काय? याच्या त्याच्यात खोट काढायचा चाळाच लागतो आपल्याला. म्हणजे फोकस सगळा दुसऱ्यावरच! असं का होतं? कारण आपल्यातली कमतरता आपण जाणून घेत नाही. तिच्यावर काम करत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या यशावर, सुखावर ताशेरे ओढणे सोपे असते. मला एखादा विषय नीट कळत नाही, मी त्यावर हवी तितकी मेहनत घेत नाही म्हणून मार्क्स कमी मिळतात, हे सत्य असतं. पण दुसरा कसा वशिल्याने पुढे गेलाय, याचं गॉसिप केलं की त्याला आपल्या रांगेत आणून बसवता येतं. तुम्ही गुप्तहेर आहात का? कसा शोधला त्याचा वशिला? की मनाचा खेळ आहे हा आपल्याच? मान्य आहे, असं होतंही कधी. पण आपण आपली रेषा मोठी करण्यात वेळ घालवावा. दुसऱ्याच्या बऱ्या- वाईटावर भिंग लावून बसून आपले प्रश्न सुटणार नसतात. तुलना कुणाशी नक्की?आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास न येण्याचं, छान न वाटण्याचं मूळ कारण आपण आपल्याला नीट समजून घेत नाही, हेच असतं. सततची तुलना सुरू असते. मनापासून आनंदी राहणं, स्वच्छतेचे बेसिक भान असणं, आरोग्य जपणं इतकंसुद्धा आपला लूक मस्त एनहान्स करू शकते. त्यासाठी डिझाइनर कपड्यांची गरज नाही की येता-जाता पार्लरवारीची आवश्यकता नाही. आपलं आयुष्य आपल्या हिमतीवर मार्गी लावलं की करू की ही पण मजा. पण आता मी अमक्याच घरात जन्माला आलो आणि माझी परिस्थितीच अशी आहे इथपासून कशाला सुरू करायचं रडगाणं? त्यात एकही गोष्ट चांगली सापडत नाहीये का? आपल्यावर स्वत:वर हे भिंग कधी रोखणार? तुम्ही जे काही आहात, त्याहीबद्दल जेलस वाटणारं कोणी ना कोणी असणार. या भिंग प्रकारात एक त्रुटीपण असते. दुसऱ्याचे केवळ एकाच गोष्टीतले चांगले अथवा वाईट खूप मोठे होऊन दिसते. ती एकच गोष्ट म्हणजे सगळं आयुष्य नसतं. त्या एका गोष्टीसाठी त्याने बरेच काही गमावलेले देखील असू शकते. खूप कष्ट घेतलेले असतात. आपण फक्त एण्ड प्रॉडक्ट बघत बसतो. तुलनेनेच बेजार होतो. दिसण्याचं काय?खरे तर, दिसण्याविषयीचा किंवा एकूणच न्यूनगंड आपल्यात सुधारणा करायला कामी लावता आला पाहिजे. न्यूनगंडातून प्रेरणा घेता अली पाहिजे. ते बाजूलाच राहतं आणि आपलं भिंग दुसऱ्याचंच आयुष्य सतत तपासत बसतं! लोक एकीकडे म्हणतात, ‘फर्स्ट इम्प्रेशन, बेस्ट इम्प्रेशन’. दुसरीकडे तेच लोक म्हणतात, ‘का रे भूललिया वरलिया रंगा..’. मग आपण आपल्या सोयीने ‘का रे भूललिया’मध्ये तरी जातो किंवा महागडे कपडे, पार्लरवाऱ्या आणि इतरांचं अंधानुकरण सुरू करतो.‘का रे भूललिया’मध्ये अजून एक लोचा असतो. आपण खरंच जर आहेत त्यात पण बरे राहत नसू, तर आळशीपणाच सोकावतो. आहे ते छान आहे म्हटलं, की सुधारणेला काही वावच राहत नाही. दुसरीकडे, अंधानुकरण केलं तर ते आपल्याला सूट होईलच असंही नसतं आणि पैसे जातात ते वेगळेच. दुसरे लोक, मित्र-मैत्रिणी आपल्या लूक्सबद्दल काय म्हणतात याचंही किती बर्डन आपण घेऊन फिरत असतो. मालवाहक गाडी होऊन जाते आपली. इतरांची आपल्याविषयीची मतं वाहणारी! आपले आपल्याविषयी काही मत असतं की नाही? आपण कमी आहोत हे ‘जाणणं’ आणि आपण कमी आहोत असं वाटणं यात खूप फरक आहे. आपण कमी आहोत, हे जाणलं तर कमी भरून काढता येते. आपण कमी आहोत, असं बसल्या-बसल्या नुसतं वाटतच राहिलं तर त्यानं कमतरता अजून वाढतच राहील.ताठ मानेनं चालणं, प्रसन्न राहणं आणि समोरच्याला नीट ऐकू येईल इतपत आत्मविश्वासाने बोलणं असा प्रयोग करून बघा आठ दिवस. तुमच्या अंगावर कोणते कपडे आहेत, ते किती भारी अथवा बोगस आहेत, तुम्ही केसांची कोणती स्टाइल केलीये, तुम्ही उंच आहात की बुटके आणि गोरे आहात की काळे, सावळे काहीही फरक पडत नाही. लोक तुमचे मुद्दे ऐकू लागतील. तुम्ही तुम्ही म्हणून कसे आहात, ते समजू लागतील. ट्राय तर करा!

मनात टांगलेला फोटोसेल्फी प्रकारामुळे आपण अमुकच अँगलने छान दिसतो, असेही लोक डोक्यात पक्के करून टाकतात. छान हसायची संधी असते. पण फोटोसमोर उभं राहिलं की आपण दात न दिसू द्यायची काळजी घ्यायला लागतो. नाहीतर, खोटंखोटं हसायला तरी लागतो. अमुकच तिरप्या अँगलने उभं राहिलं की आपण बरे दिसतो, असं काहीतरी डोक्यात फिक्स करून टाकतो. मग सगळे फोटो तिरपे तिरपे! प्रत्येकाची एक थिअरी होऊन जाते, आपण कोणत्या अँगलने बरे दिसतो ही. मग ते तसेच उभे राहतात फोटोला. आपल्यापेक्षा अमक्याचे फोटो किती भारी येतात नाही, असंही सुरू होतं मग. आपल्या मनात आपला एक फोटो असतो. तो अभावांनीच नटलेला असतो अनेकदा. 
- प्राची पाठक prachi333@hotmail.com( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)