शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

घरी जाणाऱ्या मजुरांसोबत काही पाऊलं चाललो तेंव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:20 IST

ते पाच जण अस्वस्थ होते, मजुरांचे पायी चालणारे तांडे दिसत होते, आणि त्यांना प्रश्न पडला होता, आपण काही मदत करु शकतो का? - मग सुरू झालं सर्चमध्ये त्यांचं काम.

ठळक मुद्देवेदनेचं जग जवळून अनुभवलं.

  पराग मगर 

लॉकडाउनमुळे आलेला बंदिस्तपणा खूप अस्वस्थ करत होता. कोरोनाच्या बातम्या पहात वेळही चालला होता. बाहेर जाण्याची सोय नव्हती. सायंकाळी सगळं शांत झाल्यावर आम्ही कधी कधी शोधग्रामच्या गेट बाहेर पडून मुख्य मार्गावर जायचो. तेव्हा पहिल्यांदाच टीव्हीवर जसे स्थलांतरित पाहिले तसेच या मार्गावर दिसले. हा रस्ता छत्तीसगढला जातो हे माहिती असल्याने हे लोक तिकडेच जात असतील हे लक्षात येत होतं. चार चार-पाच पाच जणांचा गट खाली मान घालून चालत राहायचा. केवळ चालतच राहायचा. लहान मुलंही सोबत असायची. आमचे रिकामे हात आणि प्रश्नार्थक चेहरा पाहून सरळ चालू लागायचे.  त्यांच्याकडे पाहताना आपण यांना काही मदत करू शकतो का हा प्रश्न गौरवला रोज पडायचा. समाजकार्य या विषयात तो पदवी घेतोय. दुसरी अपेक्षा. निसर्गाचं शिक्षण घेतेय, लॉकडाउनमुळे ती सध्या शोधग्राममध्येच आहे. परीक्षा केव्हा होईल हे निश्चित नाही. वैद्यकीय सेवेशी संबंधित असतानाही कोरोना संसर्गामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी आपण काहीच करत नाही ही खंत तिला सतावत होती. पण काय करायचं, सुरुवात कशी करायची हा प्रश्न होता. एकेकटय़ाने काही करण्यासारखं शक्यही नव्हतं. परीक्षा रद्द झाल्यामुळे गौरी, आराध्य आणि धम्मदीप हेदेखील आपण या लोकांसाठी काय करायचं याच विचारात होते. स्थलांतरितांचे पायी जाणारे जत्थे समोर दिसत होते.बांधकाम, गिट्टी फोडण्याची कामं, कंपनीत मजूर अशा अनेक कामासाठी तेलंगणामध्ये गेलेल्या मजुरांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला.महिना-दीड महिन्यात परिस्थिती पूर्व पदावर येईल या आशेवर  ते होते. पण तसं झालं नाही, त्यात घरी जाण्यासाठी काहीच सोय नव्हती. ठेकेदारांनी हात वर केले आणि या मजुरांचे खायचे वांधे झाले. तुम्हाला घरी जाण्यासाठी गाडीची सोय करून देऊ असं सांगणारे रातोरात गायब झाले होते. त्यामुळे छत्तीसगढ, ओरिसा, प. बंगाल या राज्यातील मजुरांना पायी निघाण्याशिवाय पर्याय नव्हता. मिळेल त्या वाटेने सिरोंचा, आष्टी, चामोर्शी मार्गे राष्ट्रीय महामार्ग 63क् पकडून गडचिरोली मार्गे ही माणसं बाया मुलांना घेऊन पायी निघाली. या लोकांना अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला. सर्च संस्थेने या मार्गाने जाणा:या लोकांच्या जेवणाची सोय केली आणि त्यांना छत्तीसगढच्या सीमेवर पोहोचवून देण्याचा निर्णय घेतला. या पाच जणांवर हे काम सोपवण्यात आलं. कामं आणि वेळ वाटून देण्यात आली. सोबतीला प्रेरणा, जैनेत्नी, गुंजन, तृप्ती आणि इतरही कार्यकर्ते मित्र होतेच. पण पुढाकार या पाच जणांचा. पायी येत असलेल्यांना आधी ओआरएसचं पाणी आणि जेवणाची सोय असं नियोजन करण्यात आलं. अपेक्षा सांगते, पायी चालून चालून या लोकांचे पाय बधिर होऊन गेलेले असायचे. त्यांना आम्ही लावायला बर्फ द्यायचो. तब्येतीची विचारपूस करायचो. प्रवासात खाता येईल असे पदार्थ देऊन वाहनानं त्यांना छत्तीसगढ सीमेवर सोडायचो. रस्त्यात साधं पाणी त्यांना चटकन मिळत नव्हतं. त्यांना काहीही करून घरी जायचं होतं.’ गौरव म्हणतो, लोकांना मदत करताना वाटलं, आपण देशासाठी काहीतरी केलं.  भावना म्हणते, कालर्पयत आपल्या सारखीच सुखी-समाधानी होती ही माणसं. पण आज अचानक त्याचं जीवनच बदललं. सुट्टय़ा असल्याने निवांत झोपत पडणारा आराध्य कुणी पायी येत आहे का हे पाहण्यासाठी पहाटेच रस्त्यावर जाऊन थांबत असे. गौरी, धम्मदीप यांची स्थितीही वेगळी नाही.  या सगळ्या मुलांनी फक्त मदतीचा ध्यास घेतला होता. वेदनेचं जग जवळून अनुभवलं.

  (पराग सर्च संस्थेत कार्यरत आहे.)