शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

व्यायाम करू कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

व्यायाम केल्यानं शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. स्ट्रेसफुल हार्मोन्स कमी होतात. पण हा व्यायाम करायचा कधी? केव्हा आणि कोणता?

- डॉ. यशपाल गोगटेव्यायाम म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल. ज्यामुळे आपलं आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. मग ती घरातील दैनंदिन कामं असो, आवरा-सावर असो, मैदानी खेळ किंवा जिममधील व्यायाम असो. हा व्यायाम करायला हवा हे सगळ्यांना कळतं. पण व्यायाम का करावा, केव्हा करावा व कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा याविषयी आपण आज तपशिलानं बोलू..लाइफस्टाइल डिसीज अर्थात जीवनशैलीशी निगडित आजार हा सध्याचा परवलीचा शब्द. जसं की स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे. हे आजार झाल्यानंतर ‘व्यायामाला सुरुवात करा’ हा सल्ला मिळतो. मात्र व्यायामाकडे असं एक उपाय म्हणून न पाहता तो दिनचर्येचा एक अविभाज्य भाग असायला हवा. आजार झाल्यावर सुरू केलेला व्यायाम मदत करतोच; परंतु काहीही आजार नसताना केलेला व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी संरक्षक फळीचं कार्य करतो. म्हणूनच प्रत्येकानं नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.व्यायामामुळे वजन आटोक्यात राहतं, दिवसभराच्या कामांसाठी उत्साह टिकून राहतो, काम करण्याची क्षमता वाढते व नैराश्य न येता सकारात्मकता वाढते. एकूणच जीवन जगण्यातील आनंद वाढतो. कारण व्यायामामुळे शरीरात हॅपी हार्मोन्स ज्याला एण्डोरफीन असं म्हणतात. ते तयार होतात. व्यायाम केल्यानं शरीरातील स्ट्रेसफुल हार्मोन्स जसं की कॉर्टिसॉल हे कमी होतात.व्यायामामुळे चयापचयाच्या आजारांनादेखील फायदा होतो. बीपी नॉर्मल राहते. रक्तातील साखरेवर नियंत्रण येते. कॅलरी बर्न झाल्यामुळे कमी झालेलं वजन टिकवून ठेवायला मदत होते. शरीरात स्नायूंचं प्रमाण वाढतं, हाडांना बळकटी मिळते व चरबीचं प्रमाण कमी होते. फुप्फुसाची दमश्वासाची क्षमता वाढते.व्यायामाचे अनेक प्रकार असतात.पण त्याला मुख्यत्वे तीन वर्गांमध्ये विभाजित करता येतं.१. ऐरोबिक व्यायाम प्रकार : यात दमछाक होणारे व्यायाम येतात. जसं चालणं, पोहणं, मैदानी खेळ, सायकलिंग, आवरासावर, केर काढणं, जिन्याची चढउतार, नृत्य इ.२.. रेजिस्टन्स ट्रेनिंग : या प्रकाराला काही वेळेस एनएरोबिक व्यायामही म्हटलं जातं. या प्रकारात मोडणारे व्यायाम हे स्नायूंना ताण देणारे असतात. जसं जिममधील वजनाचे व्यायाम, अंग मेहनतीचे व्यायाम, वजन उचलायला लावणारं कार्य.३. स्ट्रेचिंगचे व्यायाम : या व्यायाम प्रकारात शरीराला ताण पडतो व शरीराची लवचिकता वाढते. उदा. योगासनं, ताईची.आपण कुठला व्यायाम करायचा हे कसं ठरवायचं. तर त्याचं उत्तर असं की, प्रत्येकानं आलटून-पालटून हे तिन्ही प्रकारचे व्यायाम करण्याचा सराव ठेवावा. एक कायम असलेला प्रश्न म्हणजे यातील उत्तम असलेला व्यायाम कोणता? सर्वच व्यायाम उत्तम आहेत. ते नियमित केल्यास नक्कीच फायदा होतो. रेजिस्टन्स ट्रेनिंग हा तुलनात्मकरीत्या अधिक फायद्याचा ठरतो. तरीही प्रत्येकानं आपल्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामाचं स्वरूप ठरवावं.खरं तर काही दैनंदिन कामांमुळेदेखील व्यायाम आपोआपच घडत असतो. म्हणून घर कामाचा आळस सोडून, लाज न बाळगता त्यातून होणाऱ्या व्यायामाचा लाभ घ्यावा. आपण कुठला व्यायाम करतो याला फारसं महत्त्व नसतं तसंच कधी व्यायाम करतो यामुळेही व्यायामातून मिळणाºया फायद्यावर फारसा फरक पडत नाही. व्यायाम करण्याला अधिक महत्त्व आहे मग तो सकाळी असो दुपारी असो वा अगदी मध्यरात्री !त्यामुळे व्यायाम करा.

dryashpal@findrightdoctor.com