शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक

By admin | Updated: February 22, 2017 14:52 IST

पाहा जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...

समुद्रातला बर्फाळ कल्लोळजेम्स बालोग आणि त्याचे काही सहकारी आर्टिकमध्ये काही क्षणचित्रं टिपण्यासाठी गेले होते. बर्फाच्छादित प्रदेशात कशा पद्धतीचं वातावरण असतं, तिकडचे प्राणी, पक्षी, वातावरण हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यासाठी ते त्यांचे कॅमेरे अनेक दिवस लावून ठेवत. असंच एकदा त्यांचा कॅमेरा लावून ठेवलेला असताना त्यांच्या नकळत एक आश्चर्यकारक घटना टिपली गेली. ही घटना म्हणायला जरी साधीच वाटली तरीही हे आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या भविष्याची नांदी सांगणारी आहे. जेम्स एक अमेरिकन फोटोग्राफर. बरीच वर्षे आर्टिक क्षेत्रात काम करत असे. पण तरीही त्याने वातावरणातले बदल आणि त्याचा आपल्या पृथ्वीवर होणारा परिणाम यावर फारसं लक्ष दिलं नाही. २० वर्षांहून अधिक काळ या विषयावर काम करणाऱ्या लोकांबद्दल त्यांनी टिंगलटवाळीचं केली. त्याच्या मते, माणूस अगदीच चीटपाखरू आहे! एवढ्या महाकाय पृथ्वीचं तो काय करू शकेल. पण २००५ मध्ये त्याचं मत बदललं. नॅशनल जिओग्राफीक बरोबर तो आर्टिकमध्ये निसर्गावर मानवाचा परिणाम टिपण्यासाठी गेला असताना त्याला हे चित्र दिसलं. एक प्रचंड हिमनग. न्यू यॉर्क शहराचा भाग मॅनहॅटन म्हणतात ना, तेवढा प्रदेश. आपल्या मुंबईचा रिक्लेमेशनचा भाग आहे ना साधारण तेवढा. तर तेवढा हिमनगाचा भाग सरळ मुख्य बर्फाच्या थरापासून निखळला. हो, अक्षरश: निखळला आणि समुद्रात जाऊन पडला. आणि तिकडच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि मोठ्ठी लाट तयार झाली. त्यांच्या सुदैवाने ते एका उंचीवर असल्यामुळे त्यांना काहीही झालं नाही. पण निसर्गाचा हा हाहाकार बघून सारेच चकित झाले होते. असं लक्षात आलं की गेल्या दहा वर्षांत तिथलं तपमान २० अंशांनी वाढलं आहे आणि यामुळे हे प्रकार घडत आहेत.हे सगळं वाचूनही पर्यावरणाची काळजी घ्यावी हे पटत नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा. आणि भविष्यात होणाऱ्या परिणामांची नुसती कल्पना करा!!

http://en.newsner.com/man-points-camera-at-ice-then-captures-the-unimaginable-on-film/about/nature''
आइन्स्टाइनला एवढं सुचायचं कसं?आइन्स्टाइन. सर्वात जास्त बुद्ध्यांक असलेला शास्त्रज्ञ. आपल्याला नाव तरी किमान माहिती असलंच हे. पण कधी विचार केला आहे का की आइन्स्टाइन कसा विचार करत असेल? त्याला नव्या नव्या कल्पना कशा सुचत असतील? प्रश्न भारी आहे ना, त्याचं उत्तर तुम्हाला या लेखात सापडू शकेल.आइन्स्टाइन कायम म्हणायचा, मला शिस्तबद्ध विचार करून कोणतंच कोडं सुटलं नाही. मी माझ्या सर्व प्रेरणा बाहेरच्या जगातून घेत असतो.त्याच्या कामामधून मुद्दाम वेळ काढून तो अनेकवेळा व्हायोलीन वाजवायला जायचा. त्याच्या सुरांमध्ये अनेक कोड्यांची उत्तरे त्याला सापडली असं तो म्हणतो. संगीताबरोबर त्याला चालायला जायची आवडही होती. किती व्यग्र दिवस असला तरीही तो रोज, न चुकता जेवण झालं की बाहेर फिरायला जायचा. पक्ष्यांचा आवाज ऐकायला त्याला फार आवडायचं. त्याच्या मते हा त्याच्यासाठी ‘फावला वेळ’ नसून कामाच्या मध्येच किंवा कामाच्या प्रक्रि येचाच एक भाग होता. तो फिरायला बाहेर गेला नसता तर त्याला रिलेटिव्हिटीचा शोध लागला नसता असं तो म्हणतो.एखादा विचार आपल्या डोक्यात सतत शिजत असला तर जरी आपण प्रत्यक्ष त्याचा विचार करत नसलो तरीही आपलं अंतर्मन त्याचा विचार चालू ठेवत असतं. मग जेव्हा आपले मन, बुद्धी नेहमीच्या गोष्टी करत नसते. काही सवयीच्या गोष्टी करत नसते तेव्हा आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी सुचतात. आइन्स्टाइन कसा विचार करायचा, त्याच्या कामाची पद्धत काय, हे जाणून घेऊन आपण आपलं काम कसं करू शकतो, कशा कल्पनाच खेळ करू शकतो हे नक्कीच शिकू शकतो!त्यासाठी वाचा हा लेख- https://blog.evernote.com/blog/2017/01/11/albert-einstein-approach-to-thinking/
डान्सर इंजिनिअरगेल्या आठवड्यात आयआयटी रुकरीच्या इंजिनिअर्सनी एकदम तोडून टाकलं इंटरनेट. पार ब्रेक केलं हो...आयआयटीवाले म्हणजे पुस्तकी किडे. एकीकडे असं एक आपलं टिपिकल इमेजवालं मत.पण आयआयटी रुकरीच्या तरुण इंजिनिअर्सनी एक डान्सिंग व्हिडीओ टाकला व्हॅलेण्टाइन डेच्या निमित्तानं यू ट्यूबवर. तर त्यानं फक्त सहाच दिवसांत २ कोटी ८० लाखांहून हिट्स कमावले. व्हॅलेण्टाइन डे जवळ आलेला आणि हे बिचारे चार इंजिनिअर एका मुलीला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात. गातात. नाचतात. ‘शेप आॅफ यू’ हे ते गाणं. मात्र या चार इंजिनिअर्सनी जो काही अफलातून डान्स केला आहे या गाण्यावर. त्यांच्याच कॉलेजात त्याची कोरिओग्राफी झाली. आणि यू ट्यूबवर टाकताच तरुण जगात त्या व्हिडीओनं खळबळ उडवली. पहायलाच हवा असा हा एक चर्चेतला व्हिडीओ आहे... https://www.youtube.com/watch?list=RDdTMLTCJzYGM&v=dTMLTCJzYGM
 
(- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com )