शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जे रोबोटला येतं, तेवढंच तुम्हालाही येतं, मग तुमची नोकरी जाणार..

By admin | Updated: February 8, 2017 15:46 IST

रोबोट ट्रक चालवू लागले, बातम्या लिहू लागले, बॅँकांचे व्यवहार करू लागले, कर्जप्रकरणात तगादा लावू लागले, लोकांचे दरमहिन्याचे पगार काढू लागले, आॅफिस कामाचे हिशेब ठेवू लागले, लोकांवर देखरेख करू लागले तर माणसं काय करणार? त्यांच्या तर नोकऱ्या जाणारच.. त्या जात आहेतच आजही कारण आॅटोमायझेशन नावाचा एक मोठा शब्द आपल्या आयुष्यात दाखल झाला आहे..

- विनोद बिडवाईकगेल्या महिन्यात एका बातमीनं उद्योगजगतात बरीच खळबळ उडाली..इन्फोसिसच्या एचआर विभागानंच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांनी ९,००० कर्मचारी कामावरून कमी केले. जे कमी कौशल्याआधारित काम करायचे, ज्याला लोअर एण्ड जॉब्ज म्हणतात असे हे कर्मचारी..दर तीन महिन्यांनी त्यांनी २००० लोक कमी केले. अर्थात कमी करताना त्यांना अन्य काही स्किल्स शिकवले गेले, ज्यातून त्यांना बाहेर रोजगारसंधी मिळतील याची काळजी त्यांनी घेतली.पण एवढे कर्मचारी त्यांनी वर्षभरात कमी केले त्याचं कारण काय?-आॅटोमायझेशन!जगभरातल्या उद्योग-व्यवसाय-रोजगार विश्वात सध्या आॅटोमायझेशन हा परवलीचा शब्द आहे. आणि कंपन्या भराभर आॅटोमायझेशन स्वीकारत असल्यानं येत्या काळात बरेच रोजगार माणसांच्या हातून जाणार आहेत अशी चर्चा आहे.अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रकची चर्चा आहे. आॅटोमॅटिक ट्रक, आपलेआप यंत्रानं धावतील, ट्रक ड्रायव्हरची गरजच नाही. नुकत्याच झालेल्या रिओ आॅलिम्पिकच्या वार्तांकनाच्या कामाचा प्रयोग म्हणून वॉशिंग्टन पोस्टने रोबोटकडून बातम्या लिहून घेतल्या. अनेक बॅँकांनी तर कर्जप्रकरणं निकाली काढण्यासाठीचं काम आधीच रोबोटकडे देऊन टाकलं आहे. जे तिकडे दूर घडतं आहे ते आपल्याकडेही घडतं आहे. अनेक नवीन सॉफ्टवेअर्स आल्यानं त्याचप्रकारची एकसाची काम करणाऱ्या माणसांचं काम जातं आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसारत २०२१ पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षांत भारतातले आयटी क्षेत्रातले ६.४ लाख लो स्किल जॉब जाणार आहेत. कारण ती कामं यंत्र करायला लागतील. पण हाच अहवाल असंही म्हणतो की उच्च कौशल्य आधारित ५६ % जॉब्ज याच काळात वाढतील.वॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राच्या ताज्या लेखानुसार आॅटोमायझेशन जगाचा चेहराच बदलून टाकत आहे. सगळ्या रोजगारांचा, नोकऱ्यांचा, कामांचा चेहरा बदलेल. त्यातून कामगार आणि कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकावी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचं उत्पादन वाढेल. यांत्रिकीकरण झाल्यानं रिपिटेटिव्ह कामांमधल्या चुका संपतील. उत्पादन, अचूकता, नेमकेपणा वाढेल.आणि या काळात जे टिकतील, काम बदलतील, नवीन कौशल्य स्वीकारतील ते टिकतील. जे विशेष कौशल्य दाखवून नवीन कामगिरी करतील त्यांचं करिअर भरभराटीला येईल. पण ज्यांना एकच एक काम येतं, मी तेवढंच काम करीन असं जे लोक म्हणतील त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते.म्हणजे काय तर जी कामं यंत्र करायला लागतील त्या कामांसाठी माणसांची गरजच उरणार नाही. आणि जी कामं यंत्र करू शकणार नाहीत त्या कामांना सुगीचे दिवस येतील..या प्रश्नाकडे आपण कसं पहायचं?संधी म्हणून की संकट म्हणून?त्याचीच एक चर्चा...