शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

परीक्षेचं टेन्शन काय घेता?

By admin | Updated: February 15, 2017 18:04 IST

वर्षातून एकदाच तर येते परीक्षा. ती ही महत्त्वाची. तिची तयारी हसत खेळत आणि ध्येय निश्चित केली तर कशाला येईल टेन्शन?

 - प्राची पाठकवर्षातून एकदाच तर येते परीक्षा.ती ही महत्त्वाची.तिची तयारी हसत खेळत आणि ध्येय निश्चित केली तरकशाला येईल टेन्शन?ते येतं कारण आपलं नियोजन गडगडतं,मेहनत कमी पडते आणिअ‍ॅटिट्यूड चुकतो.तो दुरुस्त करून टाका.क्रि केटच्या खेळात कशी उत्सुकता असते,तशा उत्सुकतेने आपण परीक्षेला सामोरे जाऊ.बॅट आपल्या हातात आहे. येऊ द्या प्रश्न, मारतोच सिक्सर, असा आत्मविश्वास पाहिजे... ! फेब्रुवारी निम्मा उलटला. आता परीक्षा हा शब्द जोर धरणार.जसजशा परीक्षा जवळ येतात, तसतशी घालमेल वाढते. आता मोबाइलमध्ये चटचट नोट्सचे फोटो काढून, पीडीएफ पुस्तकं डाउनलोड करून अभ्यास करायचा जमाना आहे. काही ठरावीक नोट्सच्या झेरॉक्स काढल्या जातात. कुणाला लोड शेडिंगमुळे मोबाइलमध्ये अभ्यास करताना बॅटरी डाउनचं टेन्शन असतं तर कुणाला अमुक नोट्स आपले मित्र मैत्रिणी देतील की नाही, याची काळजी असते. इतरांकडे भारीतली पुस्तकं आहेत, वेगळ्या नोट्स आहेत. त्यांचा खूप अभ्यास झालाय, आपला नाही झालाय, असं सगळं मनात सुरू असतं. त्यात प्रॅक्टिकल असतात. सबमिशन्स असतात. कुणाला वाटतं आपल्यालाच अमुक शिक्षक ओरडतात. दुसऱ्यांना जास्त मार्क देतात. वगैरे... वगैरे. दुसऱ्याचा अभ्यास जास्त झालाय की नाही, याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. शिक्षक काय करतात, ते ही बाजूला जाऊ द्या. आपण आपल्यासाठी काय करू शकतो, तोच फोकस या काळात महत्त्वाचा आहे. आपल्या डोळ्यापुढे फक्त आपण, आपल्याकडे अभ्यासासाठी काय काय मटेरिअल आहे, नक्की अभ्यासक्र म काय आहे आणि परीक्षेसाठी किती वेळ हातात आहे, इतकंच दिसलं पाहिजे. आपण काढलेल्या झेरॉक्स पुरेशा वाचनीय आहेत का? पुरेशी पुस्तकं आपल्याकडे आहेत का, सिलॅबसशी सुसंगत मटेरिअल आपण गोळा केलंय का, किती दिवस अथवा आठवडे परीक्षेला राहिले आहेत, त्याचा मस्त चार्ट मांडून बसा. मोबाइलमध्ये अभ्यास करणार असाल, तर वाचनाचा स्पीड त्यात मिळेल का, मोबाइलची बॅटरी चार्ज असणं, छोटा स्क्रीन त्यानं डोळ्यांवर पडणारा ताण असे सगळे मुद्दे असतील. मोबाइलमध्ये स्टोअर केलेल्या इमेजेसमधून, पुस्तकांमधून नेमकं काय काय आपल्याला लागेल, याची यादी तयार ठेवा. अभ्यासक्र मावर टिकमार्क करत जा. काहींना मोबाइल स्क्र ीनपेक्षा प्रत्यक्ष पुस्तकातून किंवा झेरॉक्स नोट्समधूनच वाचन करायला बरं पडतं. हार्ड कॉपी हातात असते. त्यावर हायलाइट्स करता येतात. खुणा करता येतात. नेटवरून अभ्यास करणार असाल, तर निदान काही मुद्दे कागदावर लिहून काढा. ऐनवेळी नेट मिळाले नाही, स्पीड कमी होता, लाइट्स नव्हते, अशी भीती राहणार नाही. प्रॅक्टिकल परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रोजेक्ट सबमिशन, असाइन्मेंट्स वगैरे लेखी परीक्षेआधी किंवा नंतर असतील, तर त्याचा एक अंदाज असतो आपल्याला. कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत, जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये कसे प्रश्न विचारले गेले आहेत, याचाही थोडा विचार आवश्यक आहे. आजकाल क्र ेडिट सिस्टीममध्ये कोणताच टॉपिक आॅप्शनला टाकता येत नाही. प्रत्येक टॉपिकमधल्या उपमुद्द्यावरदेखील चार ओळी लिहिता, सांगता आल्या पाहिजेत, इतका अभ्यास आवश्यक असतो. प्रश्नदेखील असेच सगळा अभ्यासक्र म कव्हर करतील असे असतात प्रामुख्याने. त्यामुळे, विषयांची संख्या, हातातले दिवस आणि दर दिवशी आपण किती अभ्यास करू शकतो, याचा विचार केला पाहिजे.टेन्शन घेतलं तर जो अभ्यास नीट व्हायचा आहे, तोदेखील होणार नाही. त्यामुळे आपलं जेवण, झोप, रोजची ठरावीक कामे आणि हातातला वेळ यांची सांगड घालावी लागेल. अचानक काही कामे, इमर्जन्सी उद्भवू शकते. एखाद्या दिवशी रात्री लाइट्स जाऊ शकतात. तर थोडा जास्तीचा वेळ हातात ठेवला पाहिजे. त्यामुळे, परीक्षेच्या आधी जागरण करून अभ्यास होईलच, होतोच, असं नेहमीचं गणित मांडून बसू नका. जितकं जागरण कराल, तितकं लवकर लक्ष विचलित होईल. ‘माझा सगळा अभ्यास झाला होता, पण ऐनवेळी आठवलंच नाही’, ‘सगळा अभ्यास झाला होता, पण वेळच पुरला नाही’ या अगदी नेहमीच्या तक्र ारी आहेत. अभ्यासाचं, वेळेचं नीट नियोजन नसल्यानंच असं घडतं. ते नियोजन केलं आणि जरा आपला अ‍ॅटिट्यूड बदलला ना तर परीक्षाही ‘इझी’ वाटेल! ( की कशी, यासाठी नियोजनाला मदत करणारी सोबतची चौकट पहा!०वर्षातून एकदाच तर येतो, म्हणून आपण व्हॅलेण्टाइन्स डे, रोज डे, चॉकलेट डे किती उत्साहात साजरा करतो. तसंच वर्षातून इतकी महत्त्वाची अशी परीक्षा एकदाच तर येते. तिची तयारी हसत खेळत आणि ध्येय निश्चित ठेवून झाली पाहिजे. इतकं इझी करून टाका हे! टेन्शन यूं पळून जाईल! क्रिकेटच्या खेळात कशी उत्सुकता असते, तशा उत्सुकतेने आपण परीक्षेला सामोरे जाऊ. बॅट आपल्या हातात आहे. येऊ द्या प्रश्न, मारतोच सिक्सर, असा आत्मविश्वास पाहिजे... !