शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

यशाचं हे कोणतं नवीन रहस्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 06:00 IST

हुशार आणि मेहनती आहात? उत्तम काम करता, पण कंपनीत कुणाशीच पटत नाही, मग तुमचं करिअर ढपलंच समजा.

ठळक मुद्देकौशल्य आणि मेहनत यांच्या जोरावर फक्त 15 टक्के यश मिळतं, यशस्वी व्हायचं असेल तर हवेत 85 टक्के सॉफ्ट स्किल्स!

- निशांत महाजन

आपण जिथं काम करतो, तिथं आपणच बेस्ट आहोत. आपल्यासारखं कुणीच नाही. आपल्याइतकं स्कील कुणाकडे नाही. आपण फार स्मार्ट आहोत, आपण फार हुशार आहोत, आपलं काम आपल्याला चोख येतं, आपल्या कामातलं तांत्रिक आणि अन्य कौशल्यं आपल्याला उत्तम येतात. याचा अर्थ आपण करिअरमध्ये यशस्वीच होवू आणि सगळ्यात टॉप पोझिशनवर पोहचूच.हे असं सगळं वाटतं तुम्हाला? वाटत असेल, तर चुकताय तुम्ही! हे सारं असूनही तुमच्या करिअरची गाडी सायडिंगला लागून तुमच्या करिअरचा खटारा होवू शकतो. हार्वर्ड विद्यापीठ, कार्नेज फाऊण्डेशन, स्टॅण्डफर्ड रीसर्च सेण्टर यांनी केलेला एक अभ्यास म्हणतो की नोकरीत मिळणारं यश मुख्यतर्‍ म्हणजे 85 टक्के प्रमाणात हे सॉफ्ट स्किल्स आणि मुख्य म्हणजे तुम्ही सहकार्‍यांशी, इतरांशी कसं वागता यावर अवलंबून असतं. बाकी फक्त 15 टक्के यश तुमची कौशल्य आणि कामातलं नैपूण्य आणि तुमची मेहनत यावर अवलंबून असतं!विश्वास नाही ना बसत या अभ्यासावर? मात्र 1918 मध्ये स्थापन झालेलं कार्नेज फाऊण्डेशन गेली किमान 100 वर्षे माणसांच्या सॉफ्ट स्किल्सचा आणि त्यांच्या यशाचा अभ्यास करतं आहे. आणि अलिकडे तर तमाम बडय़ा कंपन्यातील मनुष्यबळाचा अभ्यास करुन त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. ज्या माणसांकडे कामाची कौशल्यं तुलेनंनं कमी, नैपूण्य कमी पण मेहनत आणि लोकांशी जमवून घेण्याची कला, इतरांशी उत्तम संवाद हे गूण असतात ती माणसं गुणी आणि हुशार माणसांपेक्षा पुढे निघून गेलेली दिसतात. जे तुलनेनं हुशार पण माणसांशी जमवून घेता येत नाही, ते मागे पडतात.  स्वतर्‍सह इतरांच्या भावनांची जपणूक करता यायला हवी, माणसं समजून घेता यायला हवी, ते जमवून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे.आणि त्यासह हवीत आणखी काही स्किल्स. तरच तुमच्या करिअरची फ्लाईट टेकऑफ करेल, नाहीतर टायर पंर, हवा गुल व्हायला वेळ लागणार नाही.म्हणून या काही गोष्टी विसरु नयेत आणि जमलं तर शिकून घ्याव्यात.

1) आपल्या कल्पना थेट स्पष्ट शब्दांत मांडायला शिका. लाजू नका.2) आत्मविश्वासानं बोला. असंही करता येईल, तसंही करू असं बोलू नका. त्यापेक्षा थेट मला असं असं करावंसं वाटतं, मी अमूक करतो असं ठाम बोला. ते करा.3) ग्रुपमध्ये काम करायला शिका. मात्र स्वतर्‍ची वेगळी ओळख त्यातही दिसेल असा प्रय} करा. तो करताना त्यात टीमचं हीत दिसलं पाहिजे, व्यक्तिगत हीत नव्हे.4) कंपनीचं आर्थिक वास्तव नक्की काय आहे हे समजून घ्या, पैसा कुठून येतो, येवू शकतो याचं आपलं आकलन पक्कं पाहिजे.5) समस्या असेल, अडचणी आल्या तर त्यापासून पळू नका. उलट ती संधी आहे असं समजून पुढाकार घ्या, माहिती गोळा करा. त्यातून सोल्यूशन द्या. तुमच्या कामापेक्षा हे काम जास्त बोलकं ठरेल.6) पुढाकार घ्या, कल्पना सुचवा, संधी कुठली हे ओळखा, प्रो अ‍ॅक्टिव्ह व्हा, म्हणजेच स्वतर्‍हून स्वतर्‍ला हवं तेच काम अंगावर घ्या. ते तडीस न्या. 7) गोष्टी मेहनतीनं करा, पण स्मार्टपणे करा. कामं वाटून द्या, इतरांकडून करुन घ्या, स्वतर्‍चं काम बॉसच्या नजरेत येईल इतपत ठळक करा. काम उत्तमच करायचं आहे, पण आपलं काम दिसणं महत्वाचं आहे, हे ही विसरु नका.8) उत्तम इमेल लिहायला शिका. कामाविषयीच्या परिणामकारक आणि प्रभावी इमेल लिहिणं हे एक स्किल आहे.9)  टाइम मॅनेजमेण्ट शिकून घ्या. प्रायॉरिटी ठरवा. डेडलाइनच्या आत काम संपवा.10) सगळ्यात महत्वाचं ऑफिसमध्ये, कुणाही कलीगच्या संदर्भात वाईट बोलू नका, कागाळ्या करू नका. दुसर्‍याला मेसेज करताना काळजी घ्या. स्पर्धा असलीच तरी व्यक्त करू नका. शांतपणे काम करा. आपल्याविरुद्ध रेकॉर्ड क्रिएट होईल असं वागू नका.