शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

शिकायचं काय?, कुठे?

By admin | Updated: May 21, 2015 20:10 IST

ग्रामीण भागात उद्योग करायचाय ना, त्याच्यासाठी कशाला हवं प्रशिक्षण, असं काही तुमच्या डोक्यात चुकूनही आलं असेल, तर ते पटकन काढून टाका!

ग्रामीण भागात उद्योग करायचाय ना, त्याच्यासाठी कशाला हवं प्रशिक्षण, असं काही तुमच्या डोक्यात चुकूनही आलं असेल, तर ते पटकन काढून टाका!
कारण ग्रामीण उद्योजकतेला वाव देताना ती पूर्णत: प्रोफेशनल असावी, त्या उद्योगांना बाजारपेठ मिळावी आणि शहरी उद्योगांइतके ग्रामीण उद्योगही भरभराटीस यावे, अशी ही नवीन कल्पना आहे!
सोपं करून सांगायचं तर, ग्रामीण उद्योजकता हे नवं अत्यंत स्मार्ट आणि तितकंच पोटेन्शियल असलेलं एक भराभराटीस येणारं क्षेत्र आहे. असं क्षेत्र ज्या क्षेत्रत संधी अपार असतील पण त्यासाठी लागेल प्रशिक्षण. कच्च माल-प्रक्रिया-उत्पादन ते बाजारपेठ हा प्रवास शिकवून पूर्णत: प्रशिक्षित मनुष्यबळानंच ग्रामीण उद्योग करावेत, असा हा नवीन विचार आहे.
जसे लोक एमबीए करतात आणि बिझनेस मॅनेजमेण्टचं प्रशिक्षण घेतात, एका कार्पोरेट जगात शिरकाव करण्यासाठी एमबीए नावाचा एण्ट्री पास घेतात तसंच हे नवीन क्षेत्र आहे.
नुस्त्या व्यवहार ज्ञानावर न जाता, ग्रामीण भागात उद्योग कसा करायचा, त्यासाठी काय आवश्यक आहे याचं प्रशिक्षण आता देशभरातील अनेक संस्था देत आहेत. नवनवीन संस्थात हे कोर्सेस सुरू होत आहेत.
आज देशातील काही नामांकित संस्था ग्रामीण उद्योजकता आणि ग्रामीण विकास यांचे र्कोसेस चालवत आहेत.
अर्थात तिथं प्रवेश मिळणं सोपं नाही, त्यांची स्वत:ची प्रवेश परीक्षा असते, ती उत्तीर्ण झाली तरच पुढे प्रवेश मिळतो!
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातलीच नाही तर शहरी, सामाजिक जाणीव असलेली आणि ग्रामीण भारतात संधींची कवाडं शोधणारी काही मुलंही आता या कोर्सेसकडे वळू लागली आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, इंजिनिअर, बीटेक झालेली, विविध विषयांतल्या मास्टर्स डिग्य्रा असलेली मुलं या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.
त्यामुळे आपल्याला काहीच जमलं नाही, म्हणजे हे तरी जमेल, असा विचार असेल तर या वाटेनं न गेलेलंच बरं!
मात्र ज्यांना खरंच एक नवीन वाट हवी आहे, त्यांच्यासाठी ग्रामीण उद्योजकता शिकवणा:या काही प्रमुख संस्थांची ही एक ओळख.
 
 
टाटा समाज विज्ञान संस्था
(http://campus.tiss.edu/)
 
 
टाटा समाज विज्ञान संस्थेच्या शाखा मुंबईसह हैद्राबाद, गुवाहाटी येथेही आहेत. या संस्थेत एमएची पदवी देणारा रुरल डेव्हलपमेण्ट अॅण्ड गव्हर्नन्स हा कोर्स चालवला जातो. 
कुठल्याही शाखेचा पदवीधर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. हा फुल टाइम कोर्स आहे. शेवटच्या वर्षाला असलेले आणि बीएची परीक्षा दिलेलीही प्रवेशासाठी अर्ज करू शकतात;
मात्र त्यासाठी प्रवेश परीक्षा देणं आवश्यक असतं.
ग्रमीण भागाची योग्य माहिती, त्याविषयीची समज आणि विकासासाठी आवश्यक सरकारी मदतीसह काम करता यावं म्हणून या अभ्यासक्रमात अनेक गोष्टी शिकवल्या जातात. 
मे महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात त्यासाठी प्रवेश परीक्षा असते.
 
इडीआय
(http://www.ediindia.org)
 
 इडीआय म्हणजेच  Entrepreneurship Development Institute of India. उद्योजकता शिकवणारी ही देशातली अत्यंत अग्रगण्य संस्था आहे. अहमदाबाद स्थित या संस्थेत सामाजिक क्षेत्रत काम करण्यासाठी अनेक कोर्सेस शिकवले जातात. देशभरात प्रशिक्षित उद्योजक तयार व्हावेत, म्हणून ही संस्था अत्यंत प्रोफेशनल कोर्सेस शिकवते. 
या संस्थेत प्रवेश मिळणं हेच एक मोठं मानाचं यश! 
ग्रामीण उद्योजकतेसाठी तिथं एक स्पेशल कोर्स चालवला जातो. त्याचं नाव आहे रुरल आंत्रप्य्रुनरशिप डेव्हलपमेण्ट प्रोग्रॅम्स. ग्रामीण भागात कसे उद्योग उभारावेत याचं प्रशिक्षण तर इथं मिळतंच, पण उद्योग सुरू करायला बीजभांडवलही बिनाभांडवल दिलं जातं! तसंच संस्थेत शिकलेल्या तरुणांना विविध स्वयंसेवी संस्थात कामाचा अनुभवही दिला जातो.
कुठल्याही विषयाची पदवी ही इथं प्रवेशाची अट. 
प्रवेश परीक्षा अत्यंत कठोर असते. आणि निवडप्रक्रियाही जटील. देशभरातून मुलं इथं शिकायला येतात.
 
किट स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेण्ट 
(http://www.ksrm.ac.in) 
 
ही संस्था भुवनेश्वरला आहे, ओडिशामध्ये!
या संस्थेत ग्रामीण भागासाठी आवश्यक विविध प्रोफेशनल कोर्सेस शिकवले जातात.
एमबीए इन रुरल मॅनेजमेण्टही करता येतं. ग्रामीण उद्योजकता शिकवणाराही कोर्स इथे करता येऊ शकतो.
ज्यांना ग्रामीण उद्योजकता या विषयाची आवड आहे, त्यांनी या संस्थेच्या वेबसाइटवरची माहिती जरूर पहावी. 
पदवी हिच इथल्याही प्रवेशाची पूर्वअट आहे.
एमबीएसाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
 
 
इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेण्ट
http;//www.irma.ac.in
 
गुजरातमधल्या आणंदमध्ये ही संस्था आहे. प्रमाणपत्र, पदवी ैआणि पदव्युत्तर अभ्यासक्रम या संस्थेत शिकवले जातात. सूत्र एकच ग्रामीण व्यवस्थापन. याच अंतर्गत ग्रामीण उद्योजकतेचेही धडे दिले जातात.
ग्रामीण व्यवस्थापन आणि उद्योजकता याचं उत्तम प्रशिक्षण या संस्थेत दिलं जातं.